आपल्या प्रभावशाली अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राधिका आपटे हिने अलीकडेच मातृत्वाच्या प्रवासाबद्दलचे आपले अनुभव शेअर केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा तिला कळलं की, ती गरोदर आहे, तेव्हाचा तो क्षण खूपच अद्भुत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वोग इंडिया’च्या मुलाखतीत ती म्हणाली, “ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. मी नेमकं काय झालं ते सगळ्यांना सांगू इच्छित नाही. पण, फक्त एवढंच सांगेन की, हा एक अपघात नव्हता; पण आम्ही या प्रेग्नन्सीसाठी प्रयत्नदेखील करत नव्हतो आणि तरीही ही बातमी एक धक्का म्हणून आमच्यासमोर आली”

अभिनेत्रीनं कबूल केलं की, ती आणि तिच्या पतीनं दोघांनीही सुरुवातीला पालकत्वाचा विचार केला नव्हता. “माझ्या मते, जेव्हा लोकांना हे माहीत असतं की, त्यांना मूल हवं आहे किंवा नको आहे, तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या असतात. आमच्या बाबतीत, आम्हा दोघांनाही मूल नको होतं, पण एका टक्क्याचं कुतूहल होतं की, जर आमचं मूल असेल, तर ते कसं असेल? आणि मग जेव्हा हे घडलं, तेव्हा आम्ही विचार केला की, नक्की पुढे जावं का,” असं ती म्हणाली.

हेही वाचा… बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता दररोज ३५,००० पावले चालायचा! चालण्याचा नेमका फायदा काय? वयोवृद्धांनी नेमकं किती चाललं पाहिजे?

हे प्रामाणिक विचार नवीन मातृत्वाचा एक सामान्य; पण कमी बोलला जाणारा पैलू दर्शवितात, जो पैलू म्हणजे मिश्र भावना. मातृत्व म्हणजेच निश्चितपणा आणि आनंदाची भावना, असं मानलं जाणाऱ्या समाजातील आदर्शांना या मिश्र भावना नकार देतात.

नवीन मातृत्वाची मानसिकता

काउन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट प्रियमवदा तेंडुलकर सांगतात की, आई होणं ही एक मोठी बदललेली ओळख असते आणि ती सहसा असमाधानकारक असते. “नवीन आईच्या संमिश्र भावना- आनंद, अपराधीपणा, भीती किंवा निराशा, निर्णय न घेता याचे प्रमाणीकरण करणे खूप निर्णायक आहे,” असं तेंडुलकर म्हणाल्या. “समाजाच्या ‘परफेक्ट, स्वार्थ त्यागणारी आई’ या मानलेल्या गोष्टींना विरोध करीत, आई आधी एक मानव असते— तिच्यात त्रुटी, भावना आणि पूर्णपणे अपूर्णतेचा अनुभव असतो.”

हेही वाचा… तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

पहिल्यांदाच मातृत्व अनुभवणाऱ्या स्त्रीला स्वत:ची ओळख टिकविण्यासाठी सामना करावा लागतो, जिथे त्यांना आपल्या मागील आयुष्यातील स्वातंत्र्य हरवल्याचं दु:ख असतं; तर दुसरीकडे एका जीवाला आपल्या गर्भात वाढविण्याची एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते. तेंडुलकर सांगतात की, या भावना सामान्य मानून, त्यांचं स्वागत करणं ही गोष्ट महिलांना त्यांच्या नवीन भूमिकेत अपराधीपणाला बळी न पडता आणि स्वत:वर टीका न करता, एक खोल उद्देश शोधण्यात मदत करते.

पालकत्वाचं मार्गदर्शन : व्यावहारिक आणि भावनिक उपाय

तेंडुलकर यांनी या अडचणींना सामोरे जाण्यासाठी काही उपाय सुचवले :

भूतकाळाच्या प्रभावांचा विचार करणं : पहिल्यांदाच होणाऱ्या आईचं तिच्या आईसोबतचं नातं पालकत्वाच्या पद्धतीला आकार देऊ शकतं. त्यामुळे नवीन मातांना त्यांची मूल्यं जपत पालकत्वाचा विचार करणं सोपं जातं.

अनिश्चिततेचा स्वीकार करणं : पालकत्व हे अनिश्चित असतं. या सत्याला स्वीकारून चिंता कमी करता येते आणि मानसिक ताकद वाढविता येते.

पूर्णतेला आव्हान देणं : ‘परफेक्ट आई’ हे मिथक हानिकारक असू शकतं. त्याऐवजी मातांनी ‘योग्य होण्याचा’ प्रयत्न करायला हवा; ज्यामुळे वास्तविक मानसिकता तयार होते.

समंजस संवाद : ‘मी रोज शिकत आहे’ किंवा ‘मदतीसाठी विचारणं ठीक आहे’, असे सकारात्मक विचार पहिल्यांदाच होणाऱ्या आईनं स्वत:च्या मदतीसाठी केले पाहिजेत.

राधिकाची तिच्या अनिश्चिततेबद्दलची प्रामाणिकता या चर्चांना सामान्य बनवण्याचं महत्त्व दर्शवते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress radhika apte did not want to become a mother confesses after she gave birth to a daughter dvr