सामोसा, पराठे, आप्पे, कटलेट या भारतीय पदार्थांबरोबर हमखास खाल्ला जाणार चटपटीत पदार्थ म्हणजे ‘केचअप, सॉस.’ आवडती भाजी नसेल तर पर्याय म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. पण, अगदीच आवडतीने खाल्ला जाणारा हा चटपटीत पदार्थ आपल्या शरीरासाठी योग्य आहे का ? दुकानातून विकत घेतलेल्या केचअप, सॉसमध्ये साखरेचा समावेश असतो का? तर आज आपण या लेखातून याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

मसाले पदार्थांची चव वाढवतात. पण, त्यात साखरसुद्धा मिसळली जाते. त्यामुळे लोकप्रिय सॉस आणि केचअपमधील साखरेचे प्रमाण चॉकलेट बार (chocolate bar ) किंवा सोड्याच्या कॅनला (can of soda)सुद्धा टक्कर देऊ शकते. द इंडियन एक्स्प्रेसने योगा इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर हंसाजी योगेंद्र यांच्याबरोबर या विषयावर चर्चा केली आणि हायलाइट केलं की, भारतीय नागरिक नकळत वर्षभरात फक्त सॉस आणि केचअपसारख्या मसाल्यांमधून २० किलोग्रॅम साखर खाऊ शकतात. त्यामुळे शर्करायुक्त मसाल्याचे सेवन करण्याचे धोके आपण या लेखातून जाणून घेऊयात.

सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
zomato swiggy now sell their food products directly to consumer
झोमॅटो, स्विगीकडून आता त्यांच्या खाद्य उत्पादनांची थेट विक्री; हॉटेल व्यावसायिकांचा विरोध, कारवाईची सरकारकडे मागणी 
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

द शुगर स्पेक्ट्रम (The sugar spectrum) –

केचअपपासून सॉसपर्यंतच्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण बदलते. मसाल्यांमध्ये सुमारे १० ते १५ ग्रॅम (२ ते ३ चमचे) साखर प्रति १०० ग्रॅम असू शकते, असे ‘डॉक्टर हंसाजींनी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम यांना सांगितले. अशा पदार्थांमध्ये साखर पांढऱ्या आणि ब्राऊन शुगरपासून ते हाय-फ्रुक्टोज (फ्रुक्टोज ही एक नैसर्गिक साखर असते) कॉर्न सिरप, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि इतर विविध स्वरूपात मिसळलेली असते. त्यामुळे असे पदार्थ खरेदी करताना पदार्थांचे लेबल्स काळजीपूर्वक वाचल्याने ग्राहकांना कोणते पदार्थ खरेदी करायचे आहे हे समजेल, ज्यामुळे मसाल्याच्या बाटल्यांमध्ये साखर लपलेली आहे की नाही हे ओळखणे सोपे जाईल; असे डॉक्टर हंसाजी म्हणाले.

हेही वाचा…भूक लागली तरीही तुम्ही ठरलेल्या वेळेतच जेवता का? जेवणाची योग्य वेळ कशी ठरवायची? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात…

पोर्शन कंट्रोल –

स्टोअरमधून विकत घेतलेल्या पदार्थांचे सेवन करताना संयम राखणे महत्त्वाचे आहे. सॉसचा समावेश तुमच्या पदार्थाला चविष्ट बनवत असला तरीही त्या पदार्थांमध्ये असणाऱ्या साखरेच्या जास्त सेवनाने अनेक समस्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. साखरेच्या ओव्हरलोडला बळी न पडता फ्लेवर्सचा आस्वाद घेताना पोर्शन कंट्रोल म्हणजे कमी प्रमाणात खाणे हे तंत्र प्रभावी ठरले, असे डॉक्टर हंसाजी म्हणाले आहेत.

जास्त साखरेचा परिणाम – अनियंत्रित साखरेचा वापर विविध शारीरिक प्रणालींवर, आरोग्यावर परिणाम करतो व त्याचे परिणाम पुढीलप्रमाणे दिसून येतात.

१. जास्त साखरेचे सेवन केल्याने कॅलरीजचे प्रमाण, वजन वाढणे आणि लठ्ठपणा वाढणे आदी समस्या उद्भवतात.
२. कंबरेच्या वर साखर जमा झाल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स, टाइप २ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी त्रास होतो.
३. शर्करायुक्त मसाले दातांच्या आरोग्याला धोका निर्माण करतात, ज्यात दात किडणे आणि पोकळी वाढणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.
४. साखरेच्या अति सेवनामुळे ऊर्जा क्रॅश होण्यास मार्ग मिळतो, ज्यामुळे एखाद्याला आळशीपणासुद्धा जाणवू शकतो; असे डॉक्टर हंसाजी म्हणतात.

टिप्स अँड ट्रिक्स –

जर तुम्हाला गोड खायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांनी सुचवलेल्या पुढील काही पर्यायांचा उपयोग करून पाहू शकता…

१. औषधी वनस्पती आणि मसाले : एखादा पदार्थ बनविताना पुदिना, धणे, जिरे, मिरपूडपर्यंत अनेक सुगंधी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा उपयोग करा. हे केवळ तुमच्या जेवणाला चव देतात असे नाही, तर या पदार्थांमध्ये असणारे गुणधर्म पाचक सहाय्यापर्यंत आरोग्य फायदेदेखील देतात.

२. व्हिनेगर : तुमच्या चटपटीत पदार्थांमध्ये अ‍ॅपल सायडर व्हिनेगर किंवा राईस व्हिनेगर घाला, त्यांच्या फ्लेवर्समुळे शर्करायुक्त सॉसला तुम्ही विसरून जाल.

३. लिंबूवर्गीय फळे : लिंबू आणि संत्री या पदार्थांची चव वापरून तुम्ही तुमच्या पदार्थांना आणखीन स्वाद देऊ शकता.

हेही वाचा…जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

टीप – शर्करायुक्त मसाले काळजीपूर्वक वापरण्याव्यतिरिक्त एखाद्याने आपल्या शरीराचे, मनाचे आणि पोषण करणारी जीवनशैलीदेखील पाळली पाहिजे व आपल्या दैनंदिन दिनचर्येत पुढील सोप्या पद्धतींचा समावेश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१. पौष्टिक आहार – ताजी, हंगामी, स्थानिक उपलब्ध फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश तुमच्या आहारात करा आणि शरीराला पोषण द्या.

२. नियमित शारीरिक हालचाल किंवा चलनवलन – योगा, खेळ, डान्स किंवा निसर्गाच्या सान्निध्यात चालणे या सवयींना तुमच्या दिनचर्येचा नियमित भाग बनवा.

३. झोप – नियमित आरामदायी झोप घ्या व आपल्या शरीराच्या नैसर्गिक लयीचा आदर करा.

तर अशा काही टिप्सचा उपयोग करून तुम्ही शर्करायुक्त मसाले असणाऱ्या पदार्थांचे सेवन कमी करू शकता.

Story img Loader