Breast Cancer Awareness in Men : स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाचा सर्वांत आक्रमक प्रकार आहे. आता पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. खरे तर पुरुषांमध्ये आढळणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण हे (Male Breast Cancer) स्तनाच्या कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ०.५ – १ टक्का इतके आहे. “हा एक दुर्मीळ रोग आहे; जो पुरुषांसाठी धोकादायक आहे. पण, अलीकडील विविध अभ्यासांनुसार- पुरुषांमध्ये कर्करोग होण्याच्या घटना हळूहळू वाढत आहेत. त्यामुळे याबाबत लोकांना जागरूक करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे ‘न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक सेंटर’च्या मॉलिक्युलर ऑन्को पॅथॉलॉजिस्ट डॉ. किंजल पटेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला माहिती देताना सांगितले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार- “पुरुषांना होणाऱ्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान सामान्यतः वाढत्या वयात केले जाते. कारण- पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये होणारी कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. “ साधारणपणे वयाच्या ६० वर्षांपासून हा कर्करोग उदभवण्याची शक्यता असते आणि मग जसजसे वय वाढत जाते तसतसा हा धोका वाढतो. या रोगाची जास्तीत जास्त प्रकरणे ७०-७५ वर्षे वयोगटात आढळतात,” असे डॉ. पटेल यांनी सांगितले.

Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cancer Radiation Chemotherapy Cancer Free Life Vandana Atre
कर्करोगाला रामराम ठोकताना…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
From fish to reptiles here are 5 that can change their gender
निसर्गाची किमया न्यारी! माशांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपर्यंत, हे पाच प्राणी करू शकतात लिंग परिवर्तन, कसे ते जाणून घ्या?
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
5 government jobs with incredible growth opportunities for women
महिलांनो, सरकारी नोकरी करायची आहे का? तुमच्यासाठी हे ५ पर्याय आहेत सर्वोत्तम, का ते जाणून घ्या…
Once you find yourself, then the energy, the joy, the energy to live will continue to make you happy forever.
अन् मी मला सापडले…

‘Goyal et.al’ यांनी २०२० रोजी केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले, “या वयोगटातील साधारण ८१ टक्के पुरुषांना स्तनांच्या कर्करोगाच्या लक्षणांबाबत आणि लवकर व वेळेवर निदाण करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात याबाबत माहीत नव्हते. डॉक्टर सांगतात, “आपण अशा काळात आहोत की, जिथे कर्करोगाच्या प्रारंभिक टप्प्यात हस्तक्षेप करून, अचूक औषधे देता येऊ शकतात. अशा वेळी पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगामधील जोखीम घटक लक्षात घेऊन, त्याबाबत वेळीच रोगनिदान केले, तर त्यावर लवकर उपाय करता येऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – आवळा-मध-काळी मिरी खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवते का?; सद्गुरुंनी सुचवलेल्या उपायांबाबत तज्ज्ञ काय सांगतात… 

“अहमदाबाद येथील ‘न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन’ (NCGM)ने स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये असे आढळून आले की, २३१ व्यक्तींच्या (स्त्री आणि पुरुष) समूहातील सुमारे ७८ टक्के व्यक्तींना पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत माहीत नव्हते,” असे डॉक्टर पटेल यांनी सांगितले.

पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत जोखीम वाढविणारे घटक काय आहेत?

डॉ. पटेल यांनी सांगितले, “पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाबाबत जोखीम वाढविणारे अनेक घटक आहेत. जसे की, जीवनशैलीचे घटक, व्यावसायिक कारणामुळे कार्सिनोजेन्सच्या (carcinogen) म्हणजे कर्करोगकारक घटकांच्या संपर्कात येणे, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर आणि आनुवंशिकता इ. बहुतेक प्रकरणांमध्ये पुरुषांना होणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाचे कारण कौटुंबिक इतिहास, इस्ट्रोजेनची उच्च पातळी, वाढलेले वय व काही विशिष्ट गुणसूत्र विकृती जसे की, क्लाइनफेल्टर सिंड्रोम(Klinefelter syndrome) हे असू शकते. क्लाइनफेल्टर सिंड्रोम म्हणजे जेव्हा पुरुषांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र येते, त्या स्थितीला ‘क्लाइनफेल्टर सिंड्रोम’, असे म्हणतात. सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन प्रकारची गुणसूत्रे असतात. पण, या स्थितीत पुरुषांमध्ये दोन्ही गुणसूत्रे एक्स हीच असतात.

हेही वाचा – टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

ज्या सुमारे २० टक्के पुरुषांना स्तनाचा कर्करोग होतो, त्यांना BRCA1 किंवा BRCA2 जनुक (gene) किंवा CHECK2, PTEN किंवा PALB2 सारख्या उच्च जोखमीच्या जनुकांमध्ये उत्परिवर्तन (Gene Mutation) होऊ शकते,”

डॉक्टर हेदेखील स्पष्ट करतात, “BRCA2 जनुक उत्परिवर्तन असलेल्या पुरुषांमध्ये BRCA1 जनुक उत्परिवर्तनाच्या तुलनेत (१०० पैकी एक) स्तनाचा कर्करोग होण्याची उच्च शक्यता (१०० पैकी सात) असते. पण हे लक्षात घ्यावे की, BRCA1 व BRCA2 आणि इतर आनुवंशिक कर्करोगाचा धोका असलेल्या स्तन कर्करोगग्रस्त पुरुषांना आनुवंशिक समुपदेशन घेणे आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

“विशेषत: कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल, तर स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला रोग होण्याआधीच त्याचे निदान होण्याची मदत मिळते. परिणामत: त्यामुळे रोगाची प्रगती कमी होण्यास आणि वेळेत योग्य उपचार मिळणे शक्य होते,” असा सल्ला डॉक्टर याबाबत देतात.

Story img Loader