Weight Loss Breathing Technique: एखाद्याला वजन कमी करायचं असेल, तर डाएट व व्यायामावर लक्ष देण्यास सांगितलं जातं. तुमचा आहार योग्य असेल आणि शरीराची किमान हालचाल होत असेल तर तुमच्या मेटाबॉलिज्मचा वेग वाढू लागतो. यामुळे अनावश्यक घटक शरीरातून वेळच्या वेळी बाहेर टाकले जातात. अतिरिक्त फॅट्स शरीरात जमा होणे थांबल्याने साहजिकच वजन सुद्धा कमी व्हायला मदत मिळते. या व्यायाम व डाएटचे अनेक प्रकार हल्ली ऑनलाईन व ऑफलाईन उपलब्ध आहेत पण तुम्ही दीर्घ-श्वास घेऊन करायच्या डाएटबद्दल ऐकले आहे का? जपानी शैलीची श्वासोच्छवासाची पद्धत तुम्ही काय खाता याच्याशी संबंधित नसूनही तुमचं वजन कमी करण्यासाठी या तंत्राची मदत होऊ शकते.

पुण्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग चिकित्सक डॉक्टर सुनील साठे यांनी सुद्धा आपल्या एका भाषणात समान दाखले दिले होते. डॉ. साठे सांगतात की जितका तुमच्या श्वसनाचा वेग कमी तितकी वयोमानाची मर्यादा अधिक असू शकते. उदाहरणार्थ, कासव एका मिनिटात ५ ते ७ वेळा श्वास घेतो, प्रत्येक मिनिटाला त्यांचे हृदयाचे ठोके १० ते १५ इतके असतात, आता तुम्ही कासवांचं आयुष्यमान पाहिलं तर ते १०० ते ४०० वर्षे इतकं जगतात. याच उलट कुत्र्याच्या श्वसनाचे प्रमाण अधिक असते आणि आयुष्यमान १४ ते १५ वर्षे इतकंच असतं. हेच गणित हृदयाच्या ठोक्यांना सुद्धा लागू होतं.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?
How Less Exercise give Better Health Benefits
हिवाळ्यात कमी वर्कआउट करून आरोग्यास कसा फायदा मिळू शकतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

पाठदुखीने त्रस्त असलेला जपानी अभिनेता मिकी र्योसुके याला डॉक्टरांनी आराम मिळण्यासाठी काही व्यायाम सुचवले होते. व्यायाम करत असताना, त्याच्या लक्षात आले की केवळ पाठदुखी कमी करण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याला या व्यायामाची मदत झाली. या व्यायामाने त्याने काही आठवड्यांतच जवळजवळ १३ किलो वजन कमी केलं होतं. अशी ही श्वसनाची पद्धत काय आहे, पाहूया..

या पद्धतीमध्ये तीन सेकंद श्वास घेणे आणि सात सेकंदांसाठी श्वास सोडणे ही प्रक्रिया सामाविषय आहे. Ryosuke च्या माहितीनुसार, फॅट्समध्ये ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन असतं. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन फॅट्समधील पेशींपर्यंत पोहोचतं, तुमचं शरीर जितकं जास्त ऑक्सिजन वापरतं तितके अधिक फॅट्स आपण बर्न करू शकता.

श्वसन कसे करावे?

  • एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवून स्थिर उभे रहा.
  • तुमच्या नितंबांना ताण द्या आणि तुमचे वजन तुमच्या मागच्या पायावर अधिक टाका.
  • आपले हात आपल्या डोक्याच्या वर उचला आणि तीन सेकंद हळूहळू श्वास घेणे सुरू करा.
  • शेवटची स्टेप म्हणजे शरीराच्या सर्व स्नायूंना ताण देऊन सात सेकंदात श्वास सोडा.

हे ही वाचा<< लेकीच्या हृदयात दोन छिद्र झाल्याचा बिपाशा बासूचा खुलासा; पण ‘ही’ स्थिती नेमकी का उद्भवते, लक्षणे काय? 

हा व्यायाम दररोज २ ते १० मिनिटांसाठी करा. वजन कमी करण्याव्यतिरिक्त, हा व्यायाम शरीराच्या स्नायूंना मजबूत करण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader