गोमूत्राचे फायदे तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असतील. हिंदू संस्कृतीत गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभकार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्या वेळी गोमूत्र शिंपडले जाते. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांकडून गोमूत्राचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. मात्र आता एका संशोधनातून असा दावा केला गेला आहे की गोमूत्र मानवासाठी ‘धोकादायक’असून म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर आहे. गोमूत्र मानवांसाठी अजिबात चांगले नाही, असे देशातली प्रमुख संशोधन संस्था भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थानने स्पष्ट केले आहे..

गोमूत्र पिणे हानिकारक ठरू शकते –

मानवाने गोमूत्र पिऊ नये, गोमूत्र प्यायल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. गोमूत्रामुळे अनेक आजार बरे होतात, असा अनेकदा दावा केला जातो. तसेच आजारी व्यक्तींना गोमूत्र प्यायला द्यावे असा सल्ला दिला जातो. मात्र गोमूत्र मानवासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे एखादा आजार बळावण्याचाही धोका असतो. गाईच्या दुधात प्रोटिन्स असतात, मात्र गोमूत्रामध्ये तसे नसते. त्यामुळे गोमूत्राचे सेवन करणे टाळावे.

Man Saves Dog From Bear With Life-Risking
अस्वलाचा कुत्र्यावर हल्ला, जबड्यात पकडली त्याची मान; जीव वाचवण्यासाठी धाडसी माणुस थेट अस्लवाशी भिडला, पहा थरारक Video
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
How often should you bathe your pets in winter Experts weigh in
हिवाळ्यात आपण आपल्या पाळीव प्राण्यांना किती वेळा अंघोळ घालावी? तज्ज्ञ काय सांगतात….
small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून
zoo, wild animals, kill their young
विश्लेषण : वन्य प्राणी त्यांच्या पिल्लांना का मारतात? हे प्रकार प्राणीसंग्रहालयांमध्ये अधिक का घडतात?

म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर –

हायपरटेन्शन आणि किडनीच्या रुग्णांना म्हशीचे मूत्र आयुर्वेदिक पद्धतीने पिण्याचा सल्ला दिला जातो. एका संशोधनात गाय आणि म्हशीच्या मूत्रांची सँपल घेण्यात आली. त्यांमध्ये असे आढळले की, म्हशीचे मूत्र हे अधिक फायदेशीर ठरते. बरेलीस्थित ‘भारतीय पशू चिकित्सा अनुसंधान संस्थान’ या देशातल्या प्रमुख प्राणी-संशोधन संस्थेने या गोष्टीचा खुलासा केला आहे. या संस्थेने केलेल्या संशोधनात ताज्या गोमूत्रात धोकादायक जिवाणू असल्याचे समोर आले आहे. संस्थेतल्या तीन पीएच.डी. केलेल्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार निरोगी गाई आणि बैलांमध्ये कमीतकमी १४ प्रकारचे हानिकारक किटाणू असतात, यामुळे पोटाचे संसर्ग होऊ शकतात. या संस्थेच्या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रकाशित केले गेले आहेत.

दरम्यान, याचप्रमाणे गाईचे दूध उत्तम की म्हशीचे याबाबत अनेक जणांना शंका असते,  गाईचे दूध उत्तम की म्हशीचे याबद्दल जाणून घेऊया…

गाईच्या दुधातील आणि म्हशीच्या दुधातील फरक –

  • गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा कमी फॅट असते. गाईच्या दुधात ३ ते ४ टक्के फॅट असते, तर म्हशीच्या दुधात ७ ते ८ टक्के फॅट असते.
  • गाईच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण कमी असते, तर म्हशीच्या दुधात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते.
  • म्हशीच्या दुधात जास्त कॅलरीज असतात, तर गाईच्या दुधात कमी कॅलरीज असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गाईचे दूध प्यावे.
  • गाईचे दूध पातळ असते. त्यात ९० टक्के पाणी असते, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. याउलट म्हशीचे दूध घट्ट असते आणि पचायला जड असते.
  • दुधात अनेक पोषक तत्त्वे आढळतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीनुसार कोणते दूध प्यायचे हे ठरवावे.

Story img Loader