Camel Milk Benefit : मधुमेह या दोन गंभीर आजारांना जग सामोर जात आहे. यामुळे निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहार, व्यायाम या गोष्टी गरजेच्या झाल्या आहे. निरोगी आहारात गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी आवश्यक पदार्थांचा समावेश हा असलाच पाहिजे. यापैकीच एक पदार्थ म्हणजे दूध. सर्वसाधारणपणे गाय, म्हैस आणि बकरीचं दूध प्यायलं जातं. पण हल्ली बाजारात उंटिणीचं दूध (Camel Milk) मिळतं. गायीच्या दूधापेक्षा उंटिणीचं कच्च दूध हे मधुमेह आणि संधिवाताच्या रुग्णांसाठी गुणकारी आहे. या दूधात अँटिऑक्सिडंट्स, इम्युनोग्लोब्युलिन आणि लॅक्टोफेरिन भरपूर प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते. तसेच इतर आजारांविरोधात संरक्षण कवच म्हणून काम करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उंटिणीचं दूध आणि गाईच्या दुधातील पौष्टिक मूल्य पाहिल्यास त्याच प्रथिने, कॅल्शियम, फॅट आणि लोहाचे प्रमाण अगदी समान आहेत. परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी गाईच्या दुधापेक्षा उंटिणीचे दूध फायदेशीर असल्याचे सांगितले जातेय. गाय, बकरीच्या दुधापेक्षा उंटिणीच्या दुधाची चव वेगळी असते. त्याचा वापर औषधासाठी केला जाते.

किडनी निरोगी ठेवायचीय? हे आहेत सोपे अन् तितकेच प्रभावी घरगुती उपाय

एका अभ्यासानुसार, उंटिणीच्या दूधात कार्बोहायड्रेट्स आणि लॅक्टोजचे प्रमाण कमी असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले असते, टाइप १ आणि टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे दूध अधिक फायदेशीर असते.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ एंडोक्रिनोलॉजी अँड मेटाबॉलिझमने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, उंटिणीच्या दूधाच्या सेवनामुळे मधुमेहावर निश्चितपणे नियंत्रण मिळवता येते.या अभ्यासादरम्यान, मधुमेह असलेल्या २० रुग्णांना २ महिने ५०० मिली उंटिणीचे दूध प्यायला लावले, यावेळी असे आढळून आले की, उंटिणीच्या दुधामुळे इन्सुलिनची पातळी वाढण्यास मदत होते आणि ग्लायसेमिक नियंत्रणात राहते.

तज्ज्ञांच्या मते, उंटिणीच्या कच्चे दूध सेवन करणे शरीरास चांगले असते. कारण उकळलेल्या दूधात शरीरास आवश्यक घटक कमी होतात. दररोज दोन कप (५०० मिली) उंटिणीचे दूध सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते.

अभ्यासानुसार, उंटिणीचे कच्चे दूध शरीरास फायदेशीर आणि सुरक्षित आहे. पण हे दूध पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण यातील व्हिटॅमिन के आणि इतर खनिजांचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camel milk beneficial diabetics blood sugar insulin sjr