स्नायूंची वाढ, वजन नियंत्रण किंवा एकूणच तंदुरुस्त आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहारामध्ये प्रथिने महत्त्वाची भूमिका निभावतात. पण, सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास आणि संप्रेरकांचे संतुलन राखण्यास खरोखर मदत होऊ शकते का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Homoeo Amigo मधील वरिष्ठ सल्लागार डॉ. आकांक्षा द्विवेदी यांच्या मते, सकाळी प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलची पातळी प्रभावीपणे नियंत्रित होते. त्यामुळे रक्तातील साखर स्थिर करून, सकाळच्या इन्सुलिन व कॉर्टिसोलची वाढ कमी करून, हार्मोनलमध्ये समतोल राखणे शक्य होते.
सकाळी जड कर्बोदकांनी युक्त किंवा कॅफिन असलेला उच्च प्रथिनांचा नाश्ता खाल्ल्याने कॉर्टिसोलची पातळी वाढणे थांबते. असा आहार तुम्हाला स्थिर ऊर्जा देतो. न्याहारी वगळण्यामुळे किंवा फक्त कार्बोहायड्रेट खाण्यामुळे स्नायूंचे नुकसान टाळते, जे सहसा नाश्ता न केल्यास किंवा सामन्य कर्बोदकांवर अवलंबून असताना उद्भवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“प्रथिने हार्मोन्स निर्माण करण्यात आणि नियंत्रित करण्यास मदत करून महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मूड, चयापचय आणि बऱ्याच बाबी प्रभावित होतात. उदाहरणार्थ, कॉर्टिसॉल, बहुतेकदा तणावाशी संबंधित, आहाराच्या निवडींवर प्रभाव टाकू शकतो. उच्च प्रथिनांनी युक्त जेवणामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे ग्लुकोजच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो,” असे हेल्थफाइम प्रायव्हेट लिमिटेडमधील नोंदणीकृत आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह शिक्षक आयशा फातिमा यांनी सांगितले.

हेही वाचा –पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे

हा खरचं योग्य पर्याय आहे का?

भारतीय नाश्त्याच्या संदर्भात, फातिमा यांनी नमूद केले की, ३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन करणे आव्हानात्मक असू शकते. “भारतीय नाश्ता साधारणपणे सुमारे १५ ग्रॅम प्रथिने मिळतात. ३० ग्रॅमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक वाढविणे आवश्यक आहे. अनेक व्यक्ती मांसाहारी स्रोतांवर किंवा प्रोटीन सप्लिमेंट्सवर अवलंबून राहू शकतात, जे शाकाहारी लोकांसाठी कमी व्यवहार्य असू शकते. याव्यतिरिक्त दैनंदिन दिनचर्या जसे की, दात घासणे आणि इतर सकाळच्या गोष्टींमुळे ३० मिनिटांच्या कालावधीला चिकटून राहणे कठीण होऊ शकते.

फातिमा हेदेखील अधोरेखित करतात, “अनियमित प्रमाणातील प्रथिनांचे सेवन वजन कमी करण्यात अडथळा आणू शकते. ३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन न केल्यास मूड बदलू शकतो, तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची इच्छा होऊ शकते किंवा तुम्ही सतत काहीतरी खाऊ शकता. त्यामुळे सुसंगतता ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि दिवसभर प्रथिने सतत समाविष्ट करणे हे एकाच उच्च-प्रथिनयुक्त जेवणावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा अधिक टिकाऊ असू शकते.

हेही वाचा –Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

सकाळसाठी उच्च प्रथिनांचा स्रोत

पुरेशा हायड्रेशन किंवा फायबरशिवाय उच्च प्रथिनयुक्त जेवणामुळे बद्धकोष्ठतेसारख्या पाचन समस्या उद्भवू शकतात. फातिमा सावधगिरीचा इशारा देताना सांगतात, “शारीरिक हालचालींनुसार प्रथिनांचे संतुलित प्रमाणात सेवन न केल्यास जास्त प्रमाणात घेतलेल्या प्रथिनांचे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होऊ शकते आणि ते फॅट्स म्हणून साठवले जाऊ शकते. त्यामुळे संभाव्यत: मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. विशेषत: जेव्हा मूत्रपिंडांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रथिनांवर प्रक्रिया करण्याची सवय नसते.

हेही वाचा –दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून…

डॉ. द्विवेदी काही प्रथिनयुक्त आहारासाठी सकाळचा पर्याय सुचवतात. जसे की, अंडा भुर्जी, काजू-बदामसह ग्रीक दही, कॉटेज चीज किंवा प्रोटीन पावडरसह बनवलेले स्मूदी. या निवडी केवळ तुम्हाला तृप्त ठेवतात; पण त्याचबरोबर चयापचय आणि संप्रेरक नियमनालादेखील समर्थन देतात. मूत्रपिंडाच्या समस्या किंवा चयापचय विकार असलेल्यांसाठी, प्रथिनांचे सेवन वाढवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल, अशी शिफारस केली जाते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones snk