व्हेगन (vegan) आहार म्हणजे आहारातून डेअरी (दूध, पनीर, दही) आणि पोल्ट्री (अंडी, चिकन) यांसह कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांपासून मिळणारे अन्न पूर्णपणे काढून टाकणे आणि फक्त वनस्पतींवर आधारित पदार्थांचे सेवन करणे. यालाच वनस्पती-आधारित आहार, असेही म्हणतात. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, व्हेगन (vegan) किंवा वनस्पती-आधारित आहार खराब कोलेस्ट्रॉल किंवा कमी घनता असलेले लिपोप्रोटीन (LDL – कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार), इन्सुलिन व वजन कमी करतो.

स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटी आणि इतर कॅलिफोर्निया संस्थांमधील संशोधकांनी आठ आठवड्यांच्या आणि २२ जुळ्या (Identical Twins) मुलांमध्ये व्हेगन आहाराची तुलना सर्व प्रकारच्या आहाराबरोबर (omnivorous diet) केली. Omnivorous diet मध्ये वनस्पती, दूध, अंडी, मांस, मासे अशा सर्व प्रकारचा आहाराचा समावेश होतो. संशोधनात जुळ्यांपैकी एका मुलाला हेल्दी व्हेगन आहार देण्यात आला; तर दुसऱ्याला हेल्दी असा सर्व प्रकाराचा आहार देण्यात आला. जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार व्हेगन गटामध्ये कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिनची पातळी अधिक चांगली होती; ज्यांनी अधिक वजन कमी केले.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क

वनस्पती-आधारित आहारामध्ये नसते कोणतेही हानिकारक कोलेस्ट्रॉल

“असाच निष्कर्ष दर्शवणाऱ्या बाबी इतर अनेक अभ्यासांतूनही समोर आल्या आहेत. वनस्पती-आधारित आहारामध्ये कोणतेही हानिकारक कोलेस्ट्रॉल नसते. त्यामुळे तर्क लावणे अगदी सोपे आहे; पण हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण- जुळ्या मुलांची चाचणी केल्यामुळे या समीकरणातील आनुवंशिकता हा मुद्दा वगळून मिळणारे परिणाम हे अगदी अचूक असतात” असे नवी दिल्ली येथील फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्युटच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे प्रिन्सिपल डायरेक्टर,डॉ. निशिथ चंद्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

हेही वाचा – दूध आणि मासे एकत्र खाऊ नये, मध खाल्यानंतर गरम पाणी पिऊ नये; विरुद्ध आहार म्हणजे काय? …

वनस्पती-आधारित आहारामुळे LDL पातळी किती कमी होते?

“व्हेगन आहार असलेल्या लोकांसाठी सरासरी किमान LDL पातळी ११०.७ मिलिग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) आणि सर्व प्रकारचा आहार सेवन करणाऱ्या सहभागींसाठी ११८.५ mg/dL (सर्वांत जास्त अनुकूल पातळी १०० mg/dL पेक्षा कमी) होती, असे डॉ. चंद्रा यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले, “अभ्यासाच्या शेवटी व्हेगन आहार असलेल्या लोकांसाठी हे प्रमाण ९५.५ mg/dL (सुमारे १३ टक्के कमी) आणि सर्व भक्षकांसाठी ११६.१६ mg/dL वर घसरले. सर्वांत जास्त हेल्दी LDL कोलेस्ट्रॉल पातळी १०० mg/dL पेक्षा कमी आहे. व्हेगन आहार असलेल्या सहभागींमध्येदेखील उपवासाच्या वेळी इन्सुलिनमध्ये २० टक्के घट झाली आणि त्यांचे सरासरी दोन किलो वजन कमी झाले.”

मे महिन्यात युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरमध्ये हे दाखवण्यात आले होते की, वनस्पती-आधारित आहार एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि अपोलीपोप्रोटीन बीच्या पातळीत अनुक्रमे सात टक्के, १० टक्के व १४ टक्क्यांनी सरासरी घट झाली.

वनस्पती-आधारित आहार कोलेस्ट्रॉल नियंत्रण आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

वनस्पती-आधारित आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स नसते आणि त्यात आहारातील फायबर जास्त असते; जे शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर काढू शकते. “प्राण्यांपासून बनवलेल्या अन्नातील सॅच्युरेटेड फॅट्समुळे जळजळ होऊ शकते; जे हृदयरोगाचे लक्षण आहे. आहारात फायबर, विशेषत: विरघळणाऱ्या फायबरचा समावेश केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. कारण- ते जेलप्रमाणे आतड्यांला चिकटून जाते; परिणामी पचनशक्ती मंदावते. हे फायबर रक्तप्रवाहातीलल एलडीएल कोलेस्ट्रॉल अडवतात आणि शरीराला ते पुन्हा शोषून घेण्यापासून रोखते,” असे डॉ. चंद्रा स्पष्ट करतात.

पण, पौष्टिकतेच्या बाबतीत वनस्पती-आधारित वादाचा मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “अशा आहारांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह व व्हिटॅमिन बी १२ यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा अभाव असतो. अशा वेळी सप्लिमेंट्सचे सेवन करून तूट भरून काढावी लागू शकते,” असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

हेही वाचा – Winter Blues : हिवाळ्यात उदासपणा का जाणवतो? ‘या’ गोष्टी असू शकतात कारणीभूत; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात 

अभ्यासातील आव्हाने कोणती? तज्ज्ञांचे मत काय आहे

बेंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे, एचओडी व सल्लागार डॉ. रंजन शेट्टी यांच्या मते, अभ्यास अद्याप पुरेसा निर्णायक नाही. “हा एक सुनियोजित अभ्यास आहे; परंतु एलडीएल कोलेस्ट्रॉलची टक्केवारी १० टक्क्यांहून थोडी कमी आहे. उच्च प्रमाणात कोलेस्ट्रॉल असलेल्या बहुतेक लोकांनी एलडीएल कोलेस्ट्रॉल ४० टक्के कमी करणे आवश्यक आहे आणि तेही अल्प कालवधीत. त्यासाठी त्यांना स्टॅटिन नावाच्या औषधाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याशिवाय त्यांनी असेही सांगितले की, “आठ आठवड्यांमध्ये अभ्यासलेले बदल क्लिनिकल प्रभाव ठरवण्यासाठी पुरेसे नव्हते आणि अभ्यासाने नुकताच किरकोळ बदल नोंदवला असावा.”तसेच, कोणताही निरोगी आहार आणि व्यायाम हे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू शकतात परंतु कोलेस्टेरॉलची संख्या खूप जास्त असलेल्या प्रकरणांमध्ये केवळ आहारात बदल करणे फायदेशीर ठरू शकत नाही. चाचणी केलेले विषय सामान्य श्रेणीपेक्षा किरकोळ होते, याचा अर्थ आहारातील बदल कोलेस्टेरॉलची कमाल पातळीच्या अनुकूल आहे. त्यांनी १९० mg/dL पेक्षा जास्त एलडीएल संख्या असलेल्यांच्या आहाराची चाचणी केली पाहिजे,”

त्याशिवाय अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, “आहारातील कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलवर इतका परिणाम होत नाही. रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होणारा परिणाम म्हणजे अन्नातून मिळणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नव्हे, तर तुमच्या आहारातील फॅट्स व कर्बोदकांचे एकत्रितपणे प्रमाण होय. त्याशिवाय उच्च एलडीएल कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांना स्टॅटिनची आवश्यकता असते; जे यकृतामध्ये त्याचे उत्पादन कमी करून, एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करते. ते रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याची यकृताची क्षमतादेखील वाढवते,” असे डॉ. शेट्टी सांगतात.

Story img Loader