सकाळच्या कॉफीमध्ये एक चमचा तूप टाकणे हे प्रसिद्ध आणि फिटनेसप्रेमींना खूप आवडते. दरम्यान, सोशल मीडियावर काही पोषण तज्ज्ञ आणि कन्टेंट क्रिएटर चहामध्ये तूप टाकून सेवन करण्यामुळे आरोग्यदायी फायदे कसे मिळतात याविषयी गुणगान करताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चहामध्ये तूप टाकून पिणे खरेच फायदेशीर आहे का, याबाबत नोएडा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड हॉस्पिटल (NIIMS) मधील आहारतज्ज्ञ डॉ. प्रीती नागर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे. “तुपात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात; जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. हे पॉवरहाऊस सुपरफूड पोषक घटकांचे शोषण वाढवते आणि पोटातील पीएच संतुलित करण्यास मदत करते,” असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – एका महिन्यापेक्षा जास्त काळ अंतराळात राहिल्यास शरीरावर काय परिणाम होईल?

विशेषत: रिकाम्या पोटी चहा घेतल्यास कधी कधी आम्लपित्त (ॲसिडीटी) होऊ शकते. नागर यांनी निदर्शनास आणले, “तूप दुधातील अम्लीय गुणधर्मांचा प्रतिकार करते. तसेच जळजळ आणि अपचनाचा धोकाही कमी करते. तुपाचा आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि हळदीबरोबर ते एकत्रित सेवन केल्यास मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीशी लढण्यास मदत मिळते.

ज्यांना आम्लपित्त होण्याची शक्यता आहे, त्यांच्यासाठी नागर यांनी एक उत्तम पर्याय म्हणून कोमट पाण्यात तूप मिसळण्याची शिफारस केली आहे. “त्यामध्ये नैसर्गिक रेचकाचे (मलोत्सर्जनास मदत करणारे) गुणधर्म आहेत; जे आतड्यांसंबंधीच्या हालचालींना चालना देतात आणि आतड्यांशी संबंधित समस्या (irritable bowel syndrome) असलेल्यांसाठी हे फायदेशीर ठरते. दूध आणि तूप हे मिश्रण बद्धकोष्ठता दूर करते,” असे नागर म्हणाल्या.

हेही वाचा – पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहन कसे बाहेर काढावे? या महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करा

युरिक अॅसिडची पातळी कमी करण्याव्यतिरिक्त तूप आणि दुधाचे मिश्रणदेखील हट्टी फॅट्स काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे चहाबरोबर तूप प्यायल्याने आरोग्याला भरपूर फायदा होतो.

पण, नागर यांनी जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ लोकांनी तुपाचे सेवन करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. कारण- त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्यांनीही काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can adding a dollop of ghee in your chai improve your gut health heres what an expert says snk
Show comments