Incense Sticks Causing Cancer: देवासमोर अगरबत्ती, धूप लावली की घरात प्रसन्नता पसरते हे आपण वर्षानुवर्षे ऐकत व कदाचित अनुभवत सुद्धा आलो आहे. पण ही पारंपरिक पद्धत तुमच्या आरोग्यसाठी सर्वोत्तम असेलच असे नाही. लेखक व कॉन्टेन्ट क्रिएटर केथ बिशॉप यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अगरबत्ती पेटवण्याच्या काही संभाव्य धोक्यांबाबत भाष्य केलं आहे. बिशॉप म्हणतात की, ” घरात अगरबत्ती जाळल्याने अनेक विषारी केमिकल्स जसे की, PAHs, पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स पसरू लागतात. काही अभ्यासांमध्ये असेही दिसून आले आहे की धूप जाळल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.” ही रील सध्या अनेकांची चिंता वाढवत असल्याने आम्ही सुद्धा तज्ज्ञांचे याविषयी काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात सविस्तर माहिती पाहूया ..

डॉ सुषमा सुमीत, बीएएमएस, एमडी, पीएचडी, आयुर्वेद चिकित्सक आणि आयसीटीआरसी पुणे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ संशोधन फेलो यांनी सुद्धा बिशॉप यांच्या दाव्याला समर्थन दिले. इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना डॉ. सुषमा म्हणाल्या की, “घरात दररोज धूप जाळल्यास, यातून पॉली ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, कार्बोनिल, बेंझिन सारखी हानिकारक रसायने तयार होतात जी कर्करोगाचा धोका वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. “

Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

धूप जाळल्यावर कोणती रसायने हवेत सोडली जातात?

डॉ सुमीत सांगतात की, “अगरबत्तीची रचना उत्पादक कंपनीप्रमाणे बदलत असते. नैसर्गिक किंवा सेंद्रिय अगरबत्ती ताजं शेण, कोळसा, वाळलेल्या औषधी वनस्पती आणि फुलांपासून बनवल्या जातात, कॉमिफोरा मुकुल एक्झ्युडेट (गुग्गुलु), वेटेरिया इंडिका एक्झ्युडेट (राल), लैव्हेंडर, रोझमेरी, गुलाबाच्या पाकळ्या (रोसा), सेंटीफोलिया), आणि सँटलम अल्बम हार्टवुड (चंदन) पावडर सारख्या घटकांसह एक आनंददायी सुगंध देतात. यामध्ये शक्यतो तूप किंवा गूळ यांसारखे नैसर्गिक घटक अगरबत्तीला आकार देण्यासाठी वापरले जातात. अगरबत्तीसाठी वापरली गेलेल्या काड्या सुद्धा बांबूच्या असतात. तसेच या नैसर्गिक उदबत्त्यांना सौम्य सुगंध असतो.”

पण अधिक काळ टिकण्याची क्षमता या अगरबत्तीमध्ये नसते. याउलट कृत्रिम उदबत्ती म्हणजे ज्यात विशेषतः टाकाऊ लाकूड, प्लायवुड पावडर, भूसा किंवा रंगीत पावडर तसेच चिकट गोंद, कृत्रिम सुगंधी तेल वापरले जाते, या तुलनेने अधिक वेळ सुगंध देऊ शकतात. सिंथेटिक अगरबत्ती जाळल्याने एरोसोल, सेंद्रिय संयुगे, कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पॉलीआरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, टोल्युइन, कार्बोनिल्स, बेंझिन, ॲल्डिहाइड्स आणि इतर संभाव्य हानिकारक रसायने बाहेर पडतात,

अशाप्रकारची अगरबत्ती किंवा धूप दीर्घकाळ घरात जाळण्यामुळे डोळ्यांत पाणी येणे, ऍलर्जीक त्वचारोग आणि कर्करोगासारखे अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टचे आजार होऊ शकतात.

हे ही वाचा<< तुमच्या शरीराला ‘इतकी’ ग्रॅम साखर आवश्यक! यापेक्षा जास्त खाल्ल्यावर ही साखर शरीरात कुठे जाते, काय बदलते? पाहा

धूप जाळणे व कर्करोग यांचा संबंध अभ्यासणारी संशोधने काय सांगतात?

डॉ सुमीत पुढे सांगतात की जगभरात अनेक अभ्यास केले गेले आहेत. Yu IT तर्फे २०११ मध्ये चीनमधील १२०८ फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे संदर्भ असलेल्या अभ्यासात असा निष्कर्ष काढला गेला होता की धुपाच्या धुराच्या संपर्कामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, रेडॉनच्या संपर्कात आल्याने जोखीम आणखी वाढते. तर रुचिरावात तर्फे २००८ मध्ये थायलंडमधील मंदिरातील कर्मचाऱ्यांसंदर्भात झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळून आले की धूप जाळल्याने कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. जेव्हा घरांमध्ये योग्य व्हेंटिलेशन होत नसते तेव्हा या धुराचा अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते असेही २०११ च्या Yu IT अभ्यासात आढळून आले होते.

Story img Loader