डॉ. वैभवी वाळिम्बे

अल्गोफोबिया म्हणजे शारीरिक वेदनेची अवास्तव भीती. असा फोबिया असलेले लोक केवळ वेदनेच्या कल्पनेनेही घाबरून जातात. ही सततची वेदनेबद्दलची चिंता त्या व्यक्तींच्या मनात वेदनेबद्दल तीव्र भीती निर्माण करते. त्याची माहिती आपण गेल्या लेखात घेतली. आता आपण त्या अल्गोफोबियाच्या उपचारांबाबतची माहिती समजून घेणार आहोत.

poor sleep make your brain age faster
कमी झोपेमुळे मेंदू वेळेआधी वृद्ध होतो? नवीन अभ्यास काय सांगतो?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
what happens to the body if you brisk walk 2 kms every day
जर तुम्ही दररोज २ किलोमीटर वेगाने चालल्यास शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
ICICI Lombard Travel Insurance Plan detail in marathi
आयसीआयसीआय लोम्बार्डकडून नवीन प्रवास विमा योजना
Sale of panati by female prostitutes thane news
देहविक्री व्यवसायातून बाहेर पडत साकारले “स्वयंरोजगाराचे प्रकाशपर्व”; देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पणत्यांची विक्री
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
In sambhajinagar minor girl is caught driving scooty shocking video
“मुलांआधी पालकांना शिकवा” संभाजीनगरमध्ये चिमुकलीच्या हातात गाडी देऊन वडील निवांत; VIDEO पाहून संतापले लोक
Standing Desks Is Good For Health Or Not
Standing Desks Not Good For Health : तुम्हीसुद्धा उभं राहून काम करता का? मग थांबा! तुम्हालाही होऊ शकतात या आरोग्य समस्या

शारीरिक व्यायाम आणि क्रियाकलाप:

यामध्ये पेशंटला अनुसरून व्यायाम (पेशंट स्पेसिफिक एक्सरसाइजेस) डिजाइन केले जातात आणि ते योग्य त्या फ्रिक्वेन्सी, इन्टेंसिटी, टाइम, टाइप च्या व्याख्येत बसवून पेशंटकडून करवून घेतले जातात. व्यायामामुळे तुमच्या मेंदूतील मूड सुधारणारे हॅप्पी हॉर्मोन्स वाढतात आणि तुम्हाला वेदनेचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यात मदत होते.

कोग्निटीव बेहवीअरल थेरेपी (CBT):

ही उपचार पद्धती व्यक्तीला वेदनांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलण्यात मदत करते. वेदना कशामुळे होतात आणि तुमचा मेंदू वेदनेची प्रक्रिया कशी करतो याबद्दल व्यक्तीला सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. ही माहिती वेदनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते.

एक्सपोजर थेरपी:

ज्या हालचालींची व्यक्तीला भीती वाटते अशा हालचाली किंवा क्रिया क्रमशः करायला सांगितल्या जातात, उदाहरणार्थ कंबरदुखी मध्ये खाली वाकण्याची भीती वाटते, रूग्णाला आरशासमोर उभे राहून रोज थोडं खाली वाकण्यास सांगितलं जातं अशाप्रकारे खाली वाकण्याचं प्रमाण क्रमश: वाढवलं जातं.

अल्गोफोबिया टाळता येतो का?

अल्गोफोबियाला प्रतिबंध करण्याचा कोणताही मार्ग नाही, पण पुढील काही सवयींमुळे आपण वेदनेबद्दलची अवास्तव काळजी किंवा चिंता निश्चित कमी करू शकतो:

१. कॅफीन, ड्रग्ज किंवा अल्कोहोल यासारख्या चिंता वाढवणाऱ्या गोष्टी टाळणं.

२. धूम्रपान न करणं, ठराविक वेळांमध्ये भरपूर झोप घेणं .

३. नियमित आणि फिजिओथेरेपिस्टने ठरवून दिलेला व्यायाम करणं.

४. निरोगी, संतुलित आहार घेणं याद्वारे

५. कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा समवयस्कांशी मोकळेपणान बोलणं

६. वेदनेच्या अवास्तव भीती बद्दल डॉक्टरांना सखोल माहिती देणं.

अल्गोफोबिया इतकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त आढळणारा प्रकार म्हणजे कायनेसिओफोबिया (Kinesiophobia). याची व्याख्या एक किंवा अनेक शारीरिक हालचालींची अत्यधिक अतार्किक आणि दुर्बल करणारी भीती म्हणून केली जाते. यामध्ये व्यक्ती पुढील दुष्टचक्र म्हणजे ती एका अव्याहत चालणार्‍या चक्रात अडकते, वेदनेमुळे अजिबात हालचाल न करणं त्यामुळे शरीराच्या एका विशिष्ट भागाची विशिष्ट क्रिया (जसं की कंबर- कंबरेतून समोर वाकणे, गुडघा- गुडघा मोडून खाली बसणे, उकिडवे बसणे कधी कधी अतिशय साध्या क्रिया जसं पायर्‍या चढण-उतरण किंवा रस्त्याने चालणं)
जवळजवळ पूर्ण बंद होणं. योग्य प्रमणात हालचाल न झाल्यामुळे स्नायूंची शक्ती कमी होणं, (काही स्नायू ओव्हर अ‍ॅक्टिव होतात तर काही अन्डर अ‍ॅक्टिव राहतात, यालाच मसल इम्बॅलन्स असं म्हणतात.)

हेही वाचा… Health Special: पचनक्रियेत पेप्सिनला एवढे महत्त्व कशासाठी?

त्यामुळे आधीच असलेली वेदना आणखी उग्र होत जाते, व्यायामाचा आणि हालचालीचा अभाव असल्यामुळे वेदनेच प्रोसेसिंग आणि नियमन करणार्‍या मेंदूतील रसायनांमद्धे बिघाड होतो. मग वेदना अधिकच तीव्रपणे जाणवते आणि म्हणून व्यक्ती हालचालीला अजूनच घाबरते आणि हे चक्र असंच सुरू राहतं.

कायनेसिओफोबिया विकसित होण्याची दोन प्रमुख कारणे:

१. भूतकाळातील वेदना किंवा आघाताचा अनुभव: भूतकाळातील वेदनांशी संबंधित वेदनादायक अनुभव आणि तेव्हा विशिष्ट हालचाली केल्यामुळे झालेली वेदना

२. सामाजिक शिक्षण आणि निरीक्षण: वेदनादायक अनुभव असलेल्या इतरांचे निरीक्षण (अंधानुकरण!) करून हालचाली संबंधित वेदनांचा विचार विकसित करणं. दुर्दैवाने यापैकी दुसरं कारण हे कायनेसिओफोबिया साठी जास्त जबाबदार आहे, ते कसं, त्यावरील उपाय आणि प्रतिबंध पाहूया पुढच्या लेखात.