Side Effects of Antacids: धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अपचनाचा त्रास वाढला आहे. त्यामुळे आजकाल सर्वच वयोगटांतील नागरिकांमध्ये अँटासिड म्हणजेच अ‍ॅसिडिटीविरोधी औषध वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अँटासिड या औषधाचे आरोग्यावर घातक परिणाम होत नाहीत; परंतु त्याचा अतिवापर आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास तुमच्या हृदयावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कार्डिओलॉजिस्ट डॉ. बलबीर सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

पोटात गॅस, अ‍ॅसिडीटी किंवा अपचन यांच्यासारख्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. डॉक्टरांच्या मतानुसार प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला पोटात अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे आणि त्याच्या प्रतिबंधासाठी अँटासिड घेणे सामान्य बाब झाली आहे. मसालेदार वा पचायला वेळ लागणाऱ्या अन्नाचे सेवन, कोणत्याही अन्नाची अ‍ॅलर्जी किंवा कोणत्याही रोगाचा किंवा औषधाचा साईड इफेक्ट अशा अनेक कारणांमुळे पोटात गॅससह अ‍ॅसिडिटी होऊ शकते, असा दावा संशोधक करतात. नागरिकांमध्ये अँटासिड्स आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा समज आहे. तसेच ते विकत घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. परंतु, अँटासिड्सचा दीर्घकाळ वापर केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे बऱ्याच नागरिकांना माहीत नाही.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

वाढवा कॅल्शियमचे प्रमाण

“कॅल्शियम खूप जास्त किंवा अगदी कमी असणे हृदयासाठी वाईट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम गेले पाहिजे. हृदयाच्या प्रत्येक ठोक्यादरम्यान कॅल्शियम तुमच्या हृदयातील स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करते आणि तुमचे हृदय किती वेगाने धडधडते हे नियंत्रित करते, तसेच शरीराच्या इतर भागांना रक्त पोहोचवण्यासाठी ते मदत करते. अँटासिड्समध्ये प्रोटॉन पंप असतात जे पोटातील आम्ल तयार होण्यापासून थांबवतात. अँटासिड्स आणि सप्लीमेंट्सच्या अतिवापरामुळे कॅल्शियम कमी झाले, तर ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोका निर्माण करू शकतात.

येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

हृदयविज्ञान वरिष्ठ सल्लागार डॉ. प्रदीप कुमार सांगतात, एंडोथेलियल डिसफंक्शन म्हणजे रक्तवाहिन्यांची झीज होऊ शकते आणि त्यामुळे रक्तप्रवाह रोखला जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. छातीत जळजळ झाल्यावर नेहमी नेहमी आपण औषधे घेत असू, तर त्यामुळे मूत्रपिंडाचे (किडनी) गंभीर नुकसान होऊ शकते; अगदी मूत्रपिंडाच्या समस्या नसलेल्या लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. जास्त मॅग्नेशियमयुक्त अँटासिड्स घेतल्यानेही मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जुलाबाचा त्रास होऊ शकतो. शरीरातील लोहाच्या शोषणावर परिणाम होऊन, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही कमी होऊ शकते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, मूत्रपिंड हृदयावर दबाव टाकते आणि त्यामुळे हृदयावर ताण येतो.

हृदयविकाराचा धोका वाढवतात कॅल्शियम सप्लीमेंट्स

काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, कॅल्शियम सप्लीमेंट्स हृदयविकाराचा धोका वाढवतात. विशेषतः हा धोका निरोगी, रजोनिवृत्तीनंतर महिलांना होऊ शकतो. “म्हणूनच कोणतेही ओटीसी औषध; मग ते अँटासिड असो किंवा कॅल्शियम सप्लीमेंट ते वैद्यकीय सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे. हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आहारातील स्रोतांमधून शक्य तितके कॅल्शियम मिळवण्याचा प्रयत्न करा; पण त्याचे प्रमाण डॉक्टरांना विचारा, असा सल्ला डॉ. सिंग देतात.

दीर्घकाळापर्यंत अँटासिड्स घेतल्याने पचनसंस्थेवर आणि त्यामुळे मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन शोषण्यात समस्या उदभवू शकतात; परिणामी हाडांच्या समस्या, विशेषतः ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होऊ शकतो.

हेही वाचा – Heart Health: दिल धडकने दो…! तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी करा ‘हे’ व्यायाम

अँटासिड्सचे दुष्परिणाम –

  • चक्कर येणे
  • श्वासोच्छवासाच्या समस्या
  • शरीरात वेदना होणे आणि ती हातांपासून खांद्यावर किंवा जबड्यापर्यंत पसरणे
  • मान आणि पाठदुखी
  • उलट्या किंवा मळमळ
  • बद्धकोष्ठता
  • अतिसार
  • गॅस
  • पायांना सूज येणे किंवा दुखणे इ.

Story img Loader