भारतात पुरुषांमध्ये पोटाजवळील चरबी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळी-अवेळी खाणे, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे पोटाजवळील चरबी वाढतेय. यातील बहुतांश लोकांना केसगळतीचाही सामना करावा लागत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, पोटाची वाढती चरबी आणि केसगळती यांचा अप्रत्यक्ष संबंध आहे.

कॅलिफोर्नियास्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. पलानिअप्पन मणिकम यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमधून वाढते पोट आणि केसगळती यांचा संबंध स्पष्ट करून सांगितला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इन्सुलिन हा शरीरात सतत वाढणारा हार्मोन आहे, जो इन्सुलिनमुळे प्रभावित होतो, यामुळे केसगळतीची समस्या वाढते.

9-year-old man dies from choking on idlis during Onam celebrations
इडली खाताना श्वास गुदमरून ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; तुमच्यासमोर एखाद्याचा घास अडकल्यास काय करावे, तज्ज्ञांकडून जाणून घ्या..
Mahendra Singh Dhoni Health news
…म्हणून धोनी महिनाभर शाकाहारी झाला; मांसाहारी व्यक्तीने आहारात…
Sleeping Tips: Here’s how to sleep well like athletes healh tips in marathi
उद्या खूप दमछाक होणार आहे? मग आजच ‘अशी’ पूर्ण करा झोप; खेळाडूंचा हा फंडा एकदा वापरून पाहाच
urfi javed chemical reactions
उर्फीने दात पांढरेशुभ्र करण्यासाठी वापरला टॉयलेट क्लिनर, तर मुरूमांसाठी वापरलं हे औषध; तज्ज्ञांनी सांगितले याचे दुष्परिणाम
Is it necessary to constantly change the toothbrush
सतत टूथब्रश बदलणं गरजेचं आहे का? काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ..
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
Which foods take longer to digest Dont eat these foods for dinner
कोणते अन्नपदार्थ पचायला जास्त वेळ लागतो? डॉक्टरांच्या ‘या’ टिप्स फॉलो करा अन् रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
How does your menstrual cycle affect your skin We asked a dermatologist
तुमच्या मासिक पाळीचा तुमच्या त्वचेवर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा….

IGF-1 हा इन्सुलिनसारखा एक हार्मोन आहे, जो केसांच्या बल्बच्या मुळापर्यंत रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो. ज्यामुळे केसांची वाढ होते आणि केसगळतीची समस्या रोखली जाते. हार्मोन इन्सुलिनसारखे कार्य करते. यामुळे जेव्हा इन्सुलिनचे कार्य थांबते तेव्हा हार्मोन्सदेखील कमी-जास्त होतात, यामुळे केसांची वाढ खुंटते, असे डॉ. मणिकम यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

इन्सुलिन हा स्वादुपिंडातून स्रवीत होणारा शरीरातील एक महत्त्वाचा संप्रेरक आहे. जो रक्तप्रवाहातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करतो. यातून यकृत, चरबी आणि स्नायूंमध्ये ग्लुकोज पोहचवण्याचे काम केले जाते. यामुळे शरीरातील कार्बोहायड्रेट्स, चरबी आणि प्रथिने चयापचय नियंत्रित राहते.

आयजीएफ हे रक्तामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे हार्मोन आहे, ज्याचे मुख्य कार्य ग्रोथ हार्मोन (GH)चे परिणाम व्यवस्थापित करणे आहे. त्यात पेशी आणि हाडांची वाढ समाविष्ट आहे. ज्यामुळे केसांच्या कूपांच्या विकासादरम्यान सेल्युलर प्रसारित करतात.

जर पुरुषांच्या कंबरेचा घेर ९० सेमी आणि महिलांमध्ये ८० सेमीपेक्षा जास्त असेल तर त्यामुळे पोटाची चरबी वाढते. जर एखाद्याचे पोट वाढलेले दिसत असेल तर त्या व्यक्तीला ९० टक्के केस गळण्याची समस्या भेडसावत असते, असेही डॉ. मणिकम म्हणाले. यामुळे पौष्टिक आहाराव्यतिरिक्त, दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे तुमचे इन्सुलिन कार्य सुरळीत राहते.

याच विषयावर ‘इंडिया टुडे’शी बोलताना नवी दिल्लीतील प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे त्वचारोगतज्ज्ञ आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. नवीन हांडा यांनी सांगितले की, निरोगी जीवनशैलीचा अभाव हे पोटाची चरबी वाढण्याचा मुख्य कारण आहे, ज्यामुळे केसगळतीची समस्याही जाणवते.

केस गळण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे हार्मोन्समधील असंतुलन. पोटाच्या अतिरिक्त चरबीमुळे डायहाइड्रोटेस्टोस्टेरोन (DHT) हार्मोनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे केसांचे कूप आकुंचन होत केसगळतीची समस्या जाणवण्याची शक्यता असते, असेही डॉ. नवीन हांडा म्हणाले.

हेही वाचा : डावा किंवा उजवा डोळा फडफडणे शुभ किंवा अशुभ नाही तर ‘हे’ आहे त्यामागचे वैज्ञानिक कारण…

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जंक फूड खाण्याचे वाढते प्रमाण, अनिरोगी जीवनशैली यामुळे केसांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेल्या लोह आणि बायोटिनसारख्या पोषक तत्त्वांची कमतरता होऊ शकते. या कमतरतेमुळे केस कमकुवत होत गळण्याची शक्यता असते.

याशिवाय तणाव हे देखील केस गळण्याचे एक सामान्य कारण आहे, सतत ताणतणावात असल्यानेही पोटाजवळील चरबी वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही सतत जास्त तणावात असता तेव्हा केसवाढीच्या चक्रात व्यत्यय येतो, ज्यामुळे केसगळतीची समस्या वाढते. त्यामुळे पोटाचा वाढत्या चरबीचा केसगळतीसाठी थेट संबंध नसला तरी ते अनिरोगी जीवनशैलीचे लक्षण असू शकते, जे केसगळतीस कारणीभूत ठरू शकते. यामुळे नेहमी निरोगी राहा, वजन नियंत्रणात ठेवा, संतुलित आहार खा आणि तणावाची पातळी नियंत्रित ठेवा, ज्यामुळे केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होऊ शकते, असेही डॉ. हांडा म्हणाले.