आजकाल बऱ्याच जणांना उच्च रक्तदाबाचा त्रास होताना दिसतो. अयोग्य जीवनशैली अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव अशा अनेक घातक सवयी उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या समस्येचा सामना करणाऱ्यांना डॉक्टर जीवनशैली सुधारण्याचा, चौरस आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाचा सल्ला देतात. अभ्यासानुसार, भारतात चारपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे म्हटले आहे. असे देखील आढळून आले आहे की, ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांच्यापैकी फक्त १२% लोकांमध्येच नियंत्रणात आले आहे. लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता ३.५ पटीने जास्त असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. तणावग्रस्त जीवनशैली आणि संतुलित, पोषक आहाराचा अभाव यामुळे लाईफस्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास त्याचा परिणाम हृद्यावर आणि मेंदूवर होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. 

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात, कोविड संसर्गाचा संबंध उच्च रक्तदाबाशी जोडला गेला आहे. खरं तर, संशोधकांना असे आढळून आले की, इन्फ्लूएंझा असलेल्या रुग्णांपेक्षा कोविड-19 च्या रूग्णांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नल, हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित, संशोधकांनी ४५,००० हून अधिक लोकांचा मागोवा घेतला ज्यांना COVID-19 आहे. त्यांना आढळले की, व्हायरससाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २१ टक्के आणि नसलेल्या ११ टक्के लोकांना नंतर उच्च रक्तदाब झाला. हे निष्कर्ष पूर्णपणे आश्चर्यकारकच आहेत.

(हे ही वाचा : “चिमूटभर आले अन्…”, हंगामी आजारांपासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ डाएट प्लॅन )

तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. करोनानंतर जगभरातील लोकांनी वाईट काळ पाहिला. कोरोनाने लोकांच्या मानसिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम केला आहे. करोना होऊन गेलेल्या लोकांना अजूनही वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  त्यापैकीच एक उच्च रक्तदाब आहे.

अनेक संशोधनातून समोर आले की, लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या महामारीनंतर वाढली आहे. एका प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोविड महामारीनंतर सर्व वयोगटातील लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचा आजार वेगाने वाढला आहे, जो चिंताजनक आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल तरुणाई अनेक आजारांना बळी पडली आहे, हे ही तितकचं खरं आहे.

रक्तदाब शरीराच्या दाहक परिस्थितीशी संबंधित आहे ज्याचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो, जसे की मधुमेह आणि स्वयंप्रतिकार विकार. “COVID-19 च्या दीर्घकालीन परिणामांवर अजूनही संशोधन चालू आहे. असे पुरावे आहेत की, अशा रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याची अधिक शक्यता असते, जे सूचित करतात की, व्हायरस रक्तवाहिन्यांवर परिणाम करू शकतो. नव्याने निदान झालेला उच्च रक्तदाब हा रक्तवाहिन्यांवर आणखी एक परिणाम होऊ शकतो ज्यासाठी बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे, असे डॉ. विजय नटराजन, हृदयरोग सर्जन आणि भारती हॉस्पिटल, पुणे येथील सर्जिकल सर्व्हिसेसचे संचालकांचे म्हणणे आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमधील २०२१ च्या अभ्यासात साथीच्या आजारादरम्यान ४,६४,५८५ सहभागींच्या रक्तदाब पातळीची त्यांच्या मागील वर्षाच्या पातळीशी तुलना केली होती. २०१९ आणि मार्च २०२० दरम्यान, साथीच्या रोगाचा प्रसार होण्यापूर्वी कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत. तथापि, एप्रिल ते डिसेंबर २०२० पर्यंत, मासिक रक्तदाबात लक्षणीय वाढ झाली. मागील वर्षाच्या तुलनेत, सरासरी मासिक सिस्टोलिक पातळी १.१ आणि २.५ मिमी एचजी दरम्यान वाढली आणि डायस्टोलिक पातळी ०.१४ आणि ०.५३ मिमी एचजी दरम्यान वाढली. २०२२ मधील टर्की अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविड-19 ने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी दोन्ही वाढवले आणि नवीन उच्च रक्तदाबही वाढला.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can covid 19 cause a spike in blood pressure covid triggers blood pressure in people with no history heres know information pdb