Exercise Before Sleeping: चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.अंथरुणावर पडलं तरी बराच वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होण्यातच त्यांची मध्यरात्र उलटून जाते. त्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण मध्येच वारंवार जाग येते. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी काही सोपे व्यायाम केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. यामुळे स्नायूंना आराम देण्यासोबतच शरीर लवचिक होण्यासही मदत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा