Irritable bowel syndrome: इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य विकार आहे, जो मोठ्या आतड्याला प्रभावित करतो. महिलांना फारसं याबद्दल माहिती नसेल, मात्र हा विकार सामान्यत: जास्त प्रमाणात महिलांमध्ये आढळतो. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे काय? तर, पोटाच्या आजारांपैकी आढळणारा आजार म्हणजे ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’. आयबीएस ही एक जुनाट स्थिती आहे, जी तुम्हाला दीर्घकाळ जाणवू शकते. आयबीएस असणाऱ्या काही लोकांमध्येच गंभीर चिन्हे आणि लक्षणे असतात. मात्र, नवीन अभ्यासात नियमितपणे कॉफी प्यायल्याने महिलांना इरिटेबल बोवेल सिंड्रोम टाळता येण्याची शक्यता आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मनोज गुप्ता यांनी “द इंडियन एक्स्प्रेस”शी बोलताना यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.

डॉ. मनोज गुप्ता यांच्या मते, कॉफीमुळे आपल्या आतड्यांना आराम मिळतो. तसेच पचनास मदत आणि आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते. दरम्यान, तुम्हाला प्रश्न पडला असेल की इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे काय आणि हा विकार कसा होतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
youth dies due to hot milk pot fell Shocking video viral
दारूची नशा बेतली जीवावर! मद्यधुंद तरुणाचा उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन्…; वेदनादायी VIDEO

इरिटेबल बोवेल सिंड्रोम म्हणजे हा एक आतड्यांसंबंधीचा विकार आहे. या विकारात मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरमुळे आतड्याच्या संवेदनशीलतेमध्ये बदल होतात. या आजाराची सुरुवात तरुणाईतच होते. वयाच्या ४५ नंतर या आजाराची सुरुवात होताना क्वचितच आढळते. अर्थात, प्रौढ आणि वृद्धांनासुद्धा आयबीएसचा त्रास होत राहतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराची लागण अधिक होते. आयबीएसच्या रुग्णांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एकामध्ये रुग्णांना पोटदुखीच्या त्रासाबरोबरच वारंवार जुलाब होतात.

नियमितपणे कॉफी प्यायल्याने महिलांना आयबीएस टाळण्यास कशी मदत होते?

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा विकार असलेल्या महिलांना कॉफीची शिफारस केली आहे. नियमितपणे कॉफी प्यायल्याने महिलांना आयबीएस टाळण्यास मदत होण्याची शक्यता आहे. नवीन अभ्यासानुसार कॉफी पिणाऱ्यांमध्ये हा विकार होण्याची शक्यता १६ टक्के कमी असते. ज्यांना अतिसाराचा वारंवार त्रास होतो, त्यांच्यासाठी याची शिफारस केलेली नाही.

कोणते पदार्थ खाणे टाळावे?

ब्रेड, चिप्स आणि कुकीज, अल्कोहोल यांसारखे जे पदार्थ आपल्याला पचत नाही, तो टाळणेच इष्ट असते; हा उपचारातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो.

पुरुषांपेक्षा महिलांना आयबीएसचा जास्त त्रास का होतो?

गर्भावस्थेदरम्यान स्त्रियांच्या शरीरातले हार्मोन्स बदलत असतात, त्यामुळे महिलांना याचा जास्त त्रास होतो. स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी चालू असताना हे त्रास वाढतात.

हेही वाचा >> मोबाइलच्या अतिवापरामुळे मानेचे आजार दिवसेंदिवस वाढताहेत; कोणत्या वयोगटात मानेचे आजार जास्त दिसतात?

या विकाराची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ओटीपोटात, पोटात उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या पोटात दुखते. पोट अधूनमधून दुखते. पोटात कळ येते. काहीही खाल्ल्यानंतर वेदना वाढते, मानसिक ताणांमुळे दुखणे अधिक जाणवते. भूक न लागणे, वजन कमी होणे आणि उलट्या होणे ही चिंताजनक लक्षणे असू शकतात. मात्र, ज्यांना या विकाराचा जास्तच त्रास होत असेल, त्यांनी वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे.