पचनाच्या आरोग्याबाबत लोकांच्या मनात अनेक समज आणि गैरसमज असतात. जेवण करताना अनेकांना पाणी पिण्याची सवय असते. याबाबत काही लोकांची समजूत आहे की जेवताना किंवा जेवणानंतर पाणी प्यायल्याने त्याची पोटातील आम्लाबरोबर प्रक्रिया होऊ शकते; ज्यामुळे अन्नाचे नीट विघटन होऊ शकत नाही. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोट फुगणे (ब्लॉटिंग) आणि गॅस यांसारख्या इतर समस्या उद्भवतात.

पण सत्य हे आहे की, पोटातील आम्ल हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून, प्रभावीपणे कार्य करण्यासाठी तयार झालेले असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे आणि ते पचनास अडथळा आणण्याऐवजी खरोखर मदत करू शकते.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

पोटामध्ये गॅस्ट्रिक अॅसिड, प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होते; जे अन्नाचे विघटन करते, ते पाचक एंझाइम सक्रिय करते आणि हानिकारक जीवाणू नष्ट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पोटाचे आरोग्य अत्यंत अम्लीय असते, ज्याचा pH सामान्यत: १.५ ते ३.५ पर्यंत असतो आणि तो योग्य पचनासाठी आवश्यक असतो.

पोटातील आम्ल आणि पाणी यांच्यातील संबध (Stomach acid versus water)

पोट हा एक स्नायूयुक्त अवयव आहे, जो मोठ्या प्रमाणात अन्न आणि द्रव सामावून घेतो. जेव्हा तुम्ही अन्न खाता किंवा पाणी पिता, तेव्हा पोटात जाणारे पदार्थ सामावून घेता यावेत यासाठी पोटाचा विस्तार होतो. पाणी पोटात जाते आणि ते पोटातील घटकांमध्ये मिसळते; परंतु ते जठरासंबंधी रसांच्या (gastric juices) एकूण आम्लपणामध्ये लक्षणीय बदल करीत नाही.

पोटात अम्लीय वातावरण राखण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. अन्नाची उपस्थिती पोटाला अधिक गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्यास चालना देते, पचनासाठी योग्य पीएच निर्माण करण्यास मदत करते. पाणी पिण्याने पोटातील घटकांचे प्रमाण तात्पुरते वाढू शकते; परंतु गॅस्ट्रिक अॅसिडचे उत्पादन ही एक सतत प्रक्रिया आहे, जी शरीराच्या गरजा पूर्ण करते.

पचनक्रियेत पाण्याची भूमिका काय?

पाचक आरोग्यासह संपूर्ण आरोग्यासाठी शरीरात पाण्याचे योग्य ते प्रमाण राखले जाणे अत्यावश्यक आहे. जेवण करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर पा(णी पिणे अनेक प्रकारे पचनास समर्थन देऊ शकते. पाणी पोषक घटकांचे विघटन करण्यास मदत करते आणि पोटातील एन्झायमॅटिक प्रक्रियेस समर्थन देते. हे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवते, बद्धकोष्ठतेचा धोका कमी करते. पचनानंतर संपूर्ण शरीरात पोषक द्रव्ये वाहून नेण्यास पाणी मदत करते.

जेवताना पाणी पिण्याचे फायदे

पाणी पिण्याने अन्न मऊ होण्यास मदत होते आणि त्यामुळे त्याचे विघटन करणे सोपे होते. पाणी तुम्हाला पोट भरण्यास मदत करू शकते, जे जास्त खाणे टाळू शकते आणि वजन नियंत्रणास मदत करू शकते. तसेच जेवताना पाणी प्यायल्याने तोंडाची स्वच्छता राखतील जाते आणि अन्नाची चव वाढवू शकते आणि तुमचे जेवण अधिक आनंददायक बनवू शकते.

जर तुम्हाला सातत्याने पचनविषयक समस्यांचा त्रास होत असेल, तर हेल्थकेअर प्रोफेशनलचा सल्ला घेणे ही नेहमीच चांगली बाब असते. पाणी आणि पोटातील आम्ल यांच्यातील संबंध समजून घेण्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराच्या सवयींबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम होऊ शकता.

(वरील माहिती नवी दिल्लीतीव इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स येथी अंतर्गत औषध विशेषज्ञ (Internal Medicine Specialist) डॉ. गुप्ता यांनी दी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

Story img Loader