Can Bananas Help You Lose Weight: रोज एकाच प्रकारचे अन्न पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते का? मोनोट्रॉपिक आहार, ज्याला एकल-खाद्य आहार म्हणूनदेखील ओळखले जाते. काही लोक त्यांच्या आहारासाठी एका प्रकारच्या फळाला चिकटून राहतात, जसे की केळी. बरेच लोक एकाच प्रकारची फळे खाण्यास प्राधान्य देतात; पण एकाच प्रकारच्या फळाच्या सेवनाने तुमचे वाढलेले वजन कमी होऊ शकते का, चला तर याविषयावर सविस्तर जाणून घेऊया…
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक भाज्या आणि फळांचे अधिक सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी देतात. फळे आणि भाज्यांकडे आरोग्यदायी पर्याय म्हणून पाहिले जाते. केळेही त्यापैकीच एक आहे. अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा साठा असलेले सुपरफूड म्हणजेच केळे हे अगदी स्वस्त दरात मुबलक पोषण पुरविणारे फळ आहे. वजन वाढविण्यापासून ते पचन सुरळीत करण्यापर्यंत अनेक कामांमध्ये केळ्याची मदत होऊ शकते. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असते.
सकाळी उठल्यावर नाश्त्यादरम्यान केळ खाणे फायदेशीर असते, असे म्हणतात. कारण- केळ्यात पोषक घटक असण्यासोबत फायबर, व्हिटॅमिन बी६ आणि पोटॅशियमदेखील असते. केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात, त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात. त्यामध्ये ठरावीक कालावधीसाठी फक्त एकाच प्रकारचे अन्न खाणे समाविष्ट आहे. केळी किंवा सफरचंद यांसारख्या फळांपासून ते बटाटे किंवा रताळ्यांसारख्या पिष्टमय भाज्यांपर्यंत हे कोणतेही अन्न असू शकते.
(हे ही वाचा : ‘या’ वेळात शेंगदाणे खाल्ल्यास झपाट्याने होणार वजन कमी? सेवनाची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या… )
मोनोट्रॉपिक आहाराची उदाहरणे खालीलप्रमाणे पाहा
१. बटाटा आहार : यामध्ये काही काळासाठी फक्त बटाटे खाणे समाविष्ट आहे. कारण- ते जटिल कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि काही आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे यांचे चांगले स्रोत मानले जाते.
२. केळी आहार : ठराविक कालावधीसाठी फक्त केळी खाणे आवश्यक आहे. कारण- ते पोटॅशियम, जीवनसत्त्वे- क व बी६ व फायबर यांचा चांगला स्रोत आहे.
३. अंडी आहार : प्रथिने, जीवनसत्त्वे डी व बी १२ आणि जस्त व लोह यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत असलेल्या ठराविक कालावधीसाठी फक्त अंडी खाणे चांगले आहे.
फक्त एकाच प्रकारचे अन्न खाल्ल्याने पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. कारण- कोणतेही एक अन्न सर्व आवश्यक पोषक घटक पुरवू शकत नाही. त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एकच अन्न वारंवार खाल्ल्याने कंटाळा येऊ शकतो आणि विशिष्ट आहाराला चिकटून राहणे आव्हानात्मक बनू शकते. प्रतिबंधात्मक आहारामुळे आतड्यांतील जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे पचन समस्या आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
सरतेशेवटी केवळ संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहारामध्ये संपूर्ण अन्नपदार्थ, नियमित व्यायाम व झोप यांचा समावेश आहे आणि त्यामुळेच उत्तम आरोग्य आणि वजन कमी होऊ शकते.