डिजिटल क्रिएटर टेड कार (Ted Carr) यांच्या मते, स्नायू वाढवण्यासाठी पपई आणि आंब्यावर अवलंबून राहणे शक्य आहे. हे ऐकून आम्हालाही तितकेच आश्चर्य वाटले, जितके तुम्हाला वाटेल!
स्नायू वाढवण्यासाठी पपई-आंबा खरोखरच प्रथिनांना चांगला पर्याय असू शकतात का हे समजून घेण्यासाठी, इंडियन एक्स्प्रेसने एकाहोलिस्टिक न्यूट्रिशनिस्टशी संवाद साधला.
न्यूट्रिशनिस्ट आणि आयुर्वेदिक वेलनेस कोच ईशा लाल यांनी स्नायूंच्या वाढीसाठी प्रथिनांचे महत्त्व अधोरेखित केले. जेव्हा स्नायूंच्या वाढीचा प्रश्न येतो तेव्हा प्रथिने हा सर्वात महत्त्वाचा घटक (MVP) असतो.
पपई-आंबा प्रथिनांची जागा घेऊ शकतात का, या प्रश्नाचे उत्तर देताना ईशा लाल सांगतात की, “अगदी नाही.” याचा अर्थ असा की,पपई-आंबा हे पौष्टिक फळ असले तरी स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रथिनांसाठी ते पुरेसे पर्याय नाहीत.
पण, ही स्वादिष्ट फळे स्नायूंच्या निर्मितीसाठी उपयूक्त नसले तरी तुमच्या फिटनेस प्रवासात पपई-आंबा च्या आरोग्यदायी फायद्यांचा आढावा घेऊया.
स्नायूंच्या निर्मितीसाठी उपयूक्त नसले तरी आहारात पपईचा समावेश का करावा?
लालने सांगितले की, ती पपईला ‘देवदूतांचे फळ’ (the fruit of angels’) म्हणते.
“पपईमध्ये पपेन असते, एक एंजाइम जो प्रथिने पचवण्यास किंवा विघटन करण्यास मदत करतो. पपई स्वतः प्रथिनांचा स्रोत नसली तरी ते तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेल्या प्रथिनांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत करते,” असे तिने स्पष्ट केले.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते आणि त्यात दाहक-विरोधी प्रभावदेखील असतो. हे सर्व स्नायूंच्या दुरुस्तीसाठी, दाहकता कमी करण्यासाठी आणि स्नायू लवकर बरे होण्याचा वेळ जलद करण्यासाठी उपयुक्त ठरते.
स्नायूंच्या निर्मितीसाठी उपयूक्त नसले तरी आहारात आंब्याचा समावेश का करावा?
लाल यांच्या मते, “आंब्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. “कार्ब्स हे प्रथिने नसले तरी ते तुमच्या व्यायामासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करतात.”
तिने सांगितले की, आंबे अ आणि क जीवनसत्त्वांनी समृद्ध असल्याने ते स्नायूंच्या दुरुस्ती आणि स्नायू बरे होण्यासाठी मदत करतात. विशेषतः व्हिटॅमिन सी हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे स्नायूंच्या वेदना कमी करते. आयुर्वेदानुसार, ही दोन्ही फळे सात्विक अन्न आहेत. याचा अर्थ असा की, ती ऊर्जा वाढवणारे अन्न आहेत आणि कमी प्रमाणात खाल्ल्यास शरीराची ऊर्जा संपवत नाही उलट वाढवतात.
“स्नायूंच्या संश्लेषणासाठी (muscle synthesis) म्हणजेच स्नायूंच्या प्रथिनांमध्ये अमिनो आम्ल समाविष्ट करून स्नायू तयार करण्याची प्रक्रिया करण्यासाठी आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यासाठी, वजन व्यवस्थापनात मदत करण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनांची कमतरता कशानेही भरून काढता येत नसली तरी पपई-आंबा हे संतुलित आहारात फक्त एक उत्तम भर घालू शकतात. ते ऊर्जा प्रदान करतात, पचनास मदत करतात आणि स्नायू बरे होण्यास मदत करतात,” असेही लाल यांनी सांगितले.
तुम्ही ही फळे किती वेळा खाऊ शकता?(How often can you eat these fruits?)
लाल यांनी आठवड्यातून सुमारे तीन-चार वेळा आंब्याच्या प्रत्येक सर्व्हिंगसाठी एक कप (सुमारे १५०-१६० ग्रॅम) आणि पपईच्या प्रत्येक सर्व्हिंगसाठी एक कप (सुमारे १४०-१५० ग्रॅम) खाण्याचा सल्ला दिला.
तुम्ही काय लक्षात ठेवले पाहिजे?
संतुलन महत्त्वाचे आहे : पपई-आंबा उत्तम आहेत, परंतु ते प्रथिनांची जागा घेऊ शकत नाहीत. पुरेशा प्रथिन स्रोतांसह संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा समावेश करा.
साखरेकडे लक्ष द्या : दोन्ही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. जास्त खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते