Light Drinking Cancer Risk: मध्यम प्रमाणात मद्यपान करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे म्हटले जायचे. पण, आता या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या विश्वासाला एका नवीन अभ्यासाने आव्हान दिले आहे. संशोधकांना आढळून आले की, कमी प्रमाणातील मद्यपानही वृद्धांमध्ये कर्करोगाची लक्षणे वाढवते.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या अहवालानुसार ६० आणि त्याहून अधिक वयाच्या १,३५,००० लोकांवरील १२ वर्षांच्या अभ्यासात हृदयविकाराच्या मृत्यूंच्या संख्येवर मध्यम मद्यपानाचा कोणताही चांगला प्रभाव दिसून आला नाही. परंतु, अल्कोहोलच्या वाढत्या सेवनाने कर्करोगाच्या मृत्यूचा धोका वाढला आहे.

how to stop alcohol cravings | 5 Ways to Manage Alcohol Cravings
Alcohol Cravings : दारू पिण्याची लालसा काही दिवसांत होईल कमी; फक्त डॉक्टरांचे ‘हे’ सोपे उपाय पाहा करून, जगाल निरोगी जीवन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं? (फोटो सौजन्य @freepik)
Coffee Benefits : कॉफी प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो? अभ्यासातून नेमकं काय समोर आलं?
Rajiv Kapoor alcohol addiction heart disease cardiovascular health
अभिनेता राजीव कपूर यांच्या मृत्यूसाठी मद्याचे व्यसन ठरले कारणीभूत; हृदय आणि रक्तवाहिन्यांवर कसा परिणाम झाला? वाचा डॉक्टर काय सांगतात
Alcohol consumption also increases the risk of cancer What is the warning from the US Surgeon General
मद्यसेवनामुळेही कर्करोगाचा धाेका? अमेरिकी सर्जन जनरलचा इशारा काय? बाटल्यांवर वैधानिक उल्लेख अनिवार्य?
A single cigarette costs men 17 minutes of their life and women
एका सिगारेटमुळे पुरुष गमावतात आयुष्यातील १७ मिनिटे आणि महिला २२ मिनिटे; संशोधनातून धक्कादायक खुलासा….
alcohol
Alcohol Causes Cancer : मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका? अमेरिकेतील डॉक्टरांच्या अहवालाने मद्यप्रेमींना दिला सावधानतेचा इशारा
Action against drunk drivers in raigad
मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा…

युनिव्हर्सिडॅड ऑटोनोमा डी माद्रिद येथील प्रतिबंधात्मक औषध आणि सार्वजनिक आरोग्याचे सहायक प्राध्यापक व अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. रोझारियो ऑर्टोला म्हणाले, “कमी मद्यपान करणे आणि मृत्युदर यांच्यात फायदेशीर संबंध असल्याचा पुरावा आम्हाला आढळला नाही.” ते पुढे म्हणाले, “कदाचित अल्कोहोल त्याच्या पहिल्या थेंबापासूनच कर्करोगाचा धोका वाढवते.”

या अभ्यासातील अल्कोहोल संशोधन प्रतिमान बदलणाऱ्या पुराव्याच्या वाढत्या भागामध्ये योगदान देतो. पूर्वीच्या अभ्यासात जाणवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नवीन पद्धती वापरल्या जात आहेत आणि त्यात अल्कोहोल पिण्याचे फायदे सुचवले होते. संशोधनात मध्यम आणि अधूनमधून मद्यपान करणाऱ्यांची तुलना मद्यपान न करणाऱ्यांशी करण्यात आली. त्यात आजारपणामुळे मद्यपान करणे थांबवले आहे अशा व्यक्तींचाही समावेश असू शकतो, जे पूर्वीचे परिणाम कमी करू शकतात.

हा अभ्यास अशा वेळी आला आहे की, ज्यावेळी अल्कोहोलच्या सेवनावरील यूएस मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन केले जात आहेत. दोन वैज्ञानिक गट यूएस आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल तयार करीत आहेत. एक गट आरोग्य एजन्सीच्या प्रतिनिधींसह एक आंतर-सरकारी उपसमिती आहे; तर दुसरा ज्याला काँग्रेसद्वारे निधी देण्यात आला आहे, जो नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनियरिंग आणि मेडिसिनद्वारे आयोजित केला जातो.

सुरुवातीला हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या शिक्षणाशी संलग्न असलेल्या बेथ इस्रायल डेकोनेस मेडिकल सेंटरमधील डॉ. केनेथ मुकामल यांना एका समितीमध्ये नामांकित करण्यात आले होते. त्यांनी अल्कोहोल उद्योगाकडून निधी मागितल्याचे उघड झाल्यानंतर २०१८ मध्ये मध्यम मद्यपानावरील $१०० मिलियनची चाचणी थांबवण्यात आली. NASEM ने त्यांचे नामांकन मागे घेतले; परंतु त्यांच्या जागी उद्योगांशी संबंधित असलेल्या हार्वर्ड शास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली.

यूएस आहार मार्गदर्शक तत्त्वांसंबंधित सल्ला देतात, “अधिक पिण्यापेक्षा कमी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे, तसेच महिलांसाठी दररोज एक पेय आणि पुरुषांसाठी दोन अशी शिफारस करण्यात आली आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, “यूएसमध्ये अल्कोहोल वापरात वाढ झाल्यामुळे २०१६-२०१८ आणि २०२०-२०२१ या कालावधीत अति मद्यपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.”

आंतरराष्ट्रीय स्तरावर शिफारशी अधिक रूढीवादी होत आहेत. कॅनेडियन सेंटर ऑन सबस्टन्स युज अॅण्ड ॲडिक्शन आता सल्ला देतात, “कोणतेही अल्कोहोल आरोग्यासाठी फायदेशीर नाही, हे लक्षात घेऊन की अगदी कमी प्रमाणातदेखील हानिकारक असू शकते.” तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) सांगतात, “अल्कोहोलचे कमी प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जास्त मद्यपान केल्यामुळे जास्त हानी होते.”

हेही वाचा: केसांच्या वाढीसाठी केस सतत धुणे गरजेचे आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

या अध्ययनामध्ये आढळले की, जे वृद्ध कमी प्रमाणात मद्यपान करायचे आणि ज्यांना आरोग्य किंवा सामाजिक-आर्थिक जोखमीचा सामना करावा लागतो, त्यांच्यात मृत्यूची जोखीम अधिक होती. परंतु, वाइन पिणे आणि फक्त जेवणाबरोबर अल्कोहोलचे सेवन केल्याने कर्करोगाच्या मृत्यूचा धोका कमी होतो. याची कारणे पूर्णपणे स्पष्ट नाहीत.

त्यामुळे तुम्ही जर दररोज मद्यपान करीत असाल, तर पुरुषांसाठी दररोज २० ते ४० ग्रॅम आणि महिलांसाठी १० ते २० ग्रॅम घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे सर्व कारणांमुळे आणि कर्करोगामुळे मृत्यूच्या उच्च जोखमीशी संबंधित होते. जास्त मद्यपान हे कर्करोग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाशी संबंधित होते.

Story img Loader