Green Coffee Benefits for Weight Loss: वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रासलेले आहेत. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे. शरीराचे वजन वाढणे एकूणच आरोग्यासाठी घातक आहे. निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली चांगली असली पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते, यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, ब्रेन स्ट्रोकसह इतरही अनेक समस्या होऊ शकतात.

वजन कमी करणे ही आजच्या काळात गरज बनली आहे. कारण वाढलेल्या वजनामुळे अनेक आजार होऊ लागतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं तासनतास व्यायाम करतात, तर काही लोकं लठ्ठपणावर मात करण्यासाठी डाएटिंग करायला लागतात. अशा प्रकारचे अनेक उपाय करतात, परंतु वजन कमी होत नाही. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी वाढते वजन कमी करण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसला एका सुपरफूडबद्दल माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया डॉक्टर काय सांगतात.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Radish leaves are more beneficial
वजन कमी करण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत; मुळ्याची पाने आहेत अधिक फायदेशीर
Six reasons to start chewing guava leaves every day
फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे
Rujuta Diwekar shared weight loss tips
वजन कमी करायचंय आणि चेहऱ्यावर ग्लोसुद्धा हवाय? मग वाचा Rujuta Diwekar च्या ‘या’ तीन टिप्स

डॉक्टर सांगतात, ग्रीन कॉफी अलीकडे सुपरफूड म्हणून लोकप्रिय झाली आहे. हिरव्या रंगाच्या कॉफी बीन्स पूर्णपणे न भाजता बनवलेल्या कॉफीला ग्रीन कॉफी म्हणतात. हिरव्या रंगाच्या कॉफीच्या बियांपासून तयार करण्यात येणारी ग्रीन कॉफी पिणे हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. ग्रीन कॉफीमध्ये अँटीओबेसिटी फॅक्टर असते, ज्यामुळे ती वजन कमी करण्यास मदत करू शकते. ग्रीन कॉफी पोषक तत्त्वांचा खजिना असल्याचे म्हटले जाते.

(हे ही वाचा : चॉकलेट्स, चीज, ​कॅफिनमुळे सतत डोके दुखते का? डाॅक्टरांनी सुचवले ‘हे’ उपाय )

डॉक्टर म्हणतात की, अनेक अभ्यासातून असे आढळले आहे की, ग्रीन कॉफी बीन्सचे सेवन वजन कमी करण्यासदेखील मदत करते. ग्रीन कॉफी बीन्समध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट घटक असतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. या कॉफीच्या बीन्स नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. ते शरीरातून टॉक्सिन, अतिरिक्त चरबी आणि कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करू शकतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही ही कॉफी फायदेशीर ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

डॉ. रोहतगी यांनी नमूद केले की, लठ्ठपणासाठी हा काही चमत्कारिक उपाय नाही. त्याचे परिणाम व्यक्तींमध्ये वेगवेगळेही असू शकतात. खरंतर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामही करणे आवश्यक आहे. ग्रीन टीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ग्रीन कॉफी बिन्समध्ये आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. या कॉफीच्या नियमित सेवनाने मेटॅबॉलिझम गतिमान होते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. कारण यामधील क्लोरोजेनिक ॲसिड हे चरबी बर्न करण्यास मदत करते.

आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. कॉफीमध्ये व्हिटॅमिन बी, फोलेट, मॅग्नेशियम आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करणे, हृदयाचे कार्य सुधारणे यासाठीही मदतशीर ठरू शकते. वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर ग्रीन कॉफी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण, तुमच्या आहारात ग्रीन कॉफीचा समावेश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही त्या सांगतात.

Story img Loader