वाढते शहरीकरण, आजचे धकाधकीचे जीवन, त्यात खराब जीवनशैली, खाण्याच्या सवयी, शारीरिक व्यायामाचा अभाव आणि कमी पौष्टिक आहार या गोष्टी सध्या तरुणांमध्ये दिसत आहेत. आजच्या व्यस्त जीवनात आरोग्याची काळजी घेणे खूप कठीण आहे. वृद्धांबरोबरच तरुणांमध्येही अनेक आजार दिसून येत आहेत. त्यापैकी बहुतेक तरुण आणि वृद्ध उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. आता तर तरुण वयात देखील हृदयविकाराचा झटका, मधुमेह आणि कमी रक्तदाब अशा समस्या पुढे येत आहेत. चुकीच्या आहारामुळे वाढणारे कोलेस्ट्रॉल हे यामागचे एक कारण आहे. तर दुसरीकडे मधुमेह हा जीवनशैलीमुले झपाट्याने वाढणारा आजार आहे. मधुमेहादरम्यान, खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण थोडीशी निष्काळजीपणा आपल्या रक्तातील साखर वाढवू शकते. लसणाच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही कमी होऊ शकतात का? यावर अभ्यासातून काय दिसून आले याविषयी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण सविस्तर जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. मुकेश गोयल म्हणतात, “अभ्यासात असे आढळून आले आहे की, सध्याच्या मेटा-विश्लेषणामध्ये १,५०० हून अधिक सहभागींच्या एकत्रित एकूण २९ अभ्यासांचे परिणाम एकत्रित केले आहेत. हे दर्शविते की, लसणामुळे HbA1C पातळी कमी होते आणि कमी घनतेच्या लिपोप्रोटीन (LDL) किंवा खराब कोलेस्ट्रॉलमध्ये थोडीशी घट होते.”

(हे ही वाचा: तुम्ही रोज रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा चघळल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…)

लसण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. लसणाच्या सेवनाने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. एलिसिन सारखे अनेक घटक लसणात आढळतात, जे रक्तातील साखर आणि चरबी संतुलित ठेवण्यास मदत करतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की लसूण पूरक आहार घेतल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.  रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी लसूण खूप उपयुक्त असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. 

लसणामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते, जी मधुमेह व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहे, परंतु कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. त्यामुळे धमन्यांमध्ये प्लेक तयार होणे आणि हृदयविकाराचा झटका येणे टाळता येईल, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

रक्तातील साखरेचे प्रमाण आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी लसणाच्या दोन पाकळ्या कोमट पाण्याने धुवा आणि चावून घ्या. अशाप्रकार कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी लसणाच्या पाकळ्यांचे सेवन करु शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can having 2 garlic cloves daily reduce both blood sugar and cholesterol know from expert pdb