Tips for Fast Constipation Relief: कुठल्याही आजारांची सुरुवात पोटापासून होते, असे म्हटले जाते. पोट साफ नसेल, तर दुसऱ्या आजारांचीही लागण होते. बद्धकोष्ठता किंवा ज्याला इंग्रजीत Constipation कॉन्स्टिपेशन म्हणतात, हे शब्द आपल्या कानावरून गेले नाहीत, असं होणारच नाही. बद्धकोष्ठता ही पोट आणि पचनाशी संबंधित समस्या आहे. बद्धकोष्ठतेचा जवळपास सर्वच वयोगटांतील लोकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनपद्धती, चुकीच्या जेवणाच्या सवयी, सकस आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव आदी विविध कारणांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागत असतो. बद्धकोष्ठता ही आजच्या काळातील सर्वांत सामान्य आरोग्य समस्या आहे.

बद्धकोष्ठता ही आपल्या पचनक्रियेशी संबंधित समस्या असल्यामुळे हा त्रास असलेल्या व्यक्तीला सकाळी मलविसर्जनामध्ये समस्या येते. बहुतांश घटनांमध्ये मोठ्या आतड्यात येणाऱ्या अन्नातील पाणी जास्त शोषल्यामुळे ही समस्या उदभवते. कमकुवत आहार, कमी पाणी पिणे, मूळव्याध, पोटातील कमकुवत स्नायू, ताणतणाव, अनियमित शौचाची सवय यांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. बद्धकोष्ठता म्हणजे आतड्यांमधील हालचालींमध्ये अडचण किंवा सामान्यापेक्षा कमी मलत्याग होणे. जेव्हा पचनतंत्र क्षीण होते तेव्हा बद्धकोष्ठताची स्थिती उदभवते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण ती सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

संपूर्ण आरोग्यासाठी सकाळी तुमची आतडी साफ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण जर तुम्हाला असे करायला त्रास होत असेल, तर आहारतज्ज्ञ सोनिया नारंग यांनी “आतड्याची हालचाल आणि त्वचेच्या आरोग्यासाठी पारंपरिक उपाय” शेअर केला आहे. सोनिया नारंग यांच्या मते, एक ग्लास पाण्यात एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळावा. एकत्र करण्यासाठी नीट ढवळून घ्यावे. सर्वोत्तम परिणामांसाठी हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्रथम प्या. त्याचा परिणाम चार आठवड्यांत दिसून येतो, अशा त्या सांगतात.

(हे ही वाचा: तुम्हीही रोज सकाळी कॉफी प्यायल्यानंतर दात घासताय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची ‘ही’ सूचना; अन्यथा…)

आतड्याची हालचाल आणि चमकदार त्वचेसाठी लिंबाचा रस

  • लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. लिंबू पाणी आपण दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता.
  • लिंबाच्या रसातील सायट्रिक अॅसिड पाचक एन्झाइम्सना उत्तेजित करते. तसेच चांगले पचन होऊन, आतड्याची हालचाल वाढवते.
  • त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक आहे, जे कोलेजन उत्पादनासाठी महत्त्वपूर्ण आहे, त्वचेची लवचिकता आणि दृढता टिकवून ठेवण्यास मदत करते.
  • त्यात नैसर्गिक तुरट आणि उजळ करणारे गुणधर्म आहेत, जे त्वचेचा रंग सुधारण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात.
  • या मिश्रणाने तुमचा दिवस सुरू केल्याने तुमचे शरीर हायड्रेट होण्यास मदत होते, जे पचन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे,” असे नारंग यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले.

आतड्याची हालचाल आणि चमकदार त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईल

  • दुसरीकडे सकाळी एक चमचा ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइल पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते.
  • ऑलिव्ह ऑईल हे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि पोटासाठी खूप चांगले मानले जाते. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. अशा स्थितीत ऑलिव्ह ऑईल रोज वापरल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
  • या तेलामुळे आपली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते.

अशा प्रकारे तुम्ही लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईलच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर करू शकता. परंतु ते संयमाने वापरा. लिंबाच्या रसाचे जास्त सेवन केल्याने दातांवरील संरक्षक आवरण नष्ट होऊ शकते आणि जास्त प्रमाणात ऑलिव्ह ऑइल जास्त प्रमाणात कॅलरी घेण्यास कारणीभूत ठरू शकते, असेही आहारतज्ज्ञ नारंग सांगतात.