वजन वाढणे ही आजकाल सर्वांत मोठी आरोग्य समस्या आहे. वाढलेले वजन अनेकांची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे तुम्हाला विविध आजार जडतात, लठ्ठपणा वाढल्यास उच्च रक्तदाब, कंबरदुखी, हृदयाचे आजार, गुडघेदुखी यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तासन् तास जिममध्ये घाम गाळतात; परंतु तरीही वजन कमी होत नाही. खरं तर वजन कमी करताना नकळत आपल्याकडून होणाऱ्या चुकांमुळेसुद्धा वजन वाढतं.

आता वाढत्या वजनानं त्रस्त झालेले लोक जिममध्ये जाऊ लागले आहेत. अशा वेळी जर कोणी झटपट वजन कमी करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त व्यायाम करीत असेल, तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणं हे चांगलं आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यानं तुमचं वजन वाढू शकतं का? उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे वजन वाढू शकतं का? याच विषयावर AASRA हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. जगदीश जे. हिरेमठ यांनी याबाबत माहिती दिल्याचं वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

almond gum, benefits, Health Special,
Health Special : बदाम डिंकाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Hair Grown Inside Throat
‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या
DCM Ajit Pawar
सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर ४८ तासांच्या आत अजित पवारांचा मोठा निर्णय, युगेंद्र पवारांना पहिला झटका
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

फिटनेस मिळविण्यासाठी आरोग्यदायी आहारासोबत रोजचा व्यायामही महत्त्वाचा असतो; पण विचार न करता, व्यायाम केल्यास तोही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. व्यायामशाळेमध्ये वजन उचलून वजन कमी करण्याचा किंवा तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अनेकदा शंका असते की, जड वजन उचलून व्यायाम करणं योग्य आहे की नाही?

(हे ही वाचा : भोपळ्याच्या बिया अन् निळ्या रंगाच्या ‘या’ फळामुळे होणारे फायदे वाचा, सेवन करण्याची योग्य वेळ कोणती?)

जपानमधील सुकुबा विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड स्पोर्ट्स सायन्सेसचे प्रमुख संशोधक ताकाशी मात्सुई, पीएचडी यांनी मेडिसिन अॅण्ड सायन्स इन स्पोर्ट्स अॅण्ड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासाचे प्रमुख निष्कर्ष मेडिकल न्यूज टुडेकडे स्पष्ट केले आहेत. त्यानुसार, “आमच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, वजन कमी करण्यासाठी व्यायाम ही एक शक्तिशाली रणनीती आहे; परंतु उच्च तीव्रतेच्या व्यायामामुळे जास्त घाम येतो. त्यानंतरच्या शारीरिक हालचाली आणि मुख्य शरीराचं तापमान लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतं; ज्यामुळे वजन वाढतं. विशेष म्हणजे वजन वाढण्याची ही स्थिती अन्नाच्या सेवनात कोणताही बदल न झाल्यासही उद्भवते.”

तर दुसरीकडे AASRA हॉस्पिटल्सचे वैद्यकीय संचालक डॉ. जगदीश जे. हिरेमठ म्हणतात की, उच्च तीव्रतेचा व्यायाम (HIE) काही विशिष्ट परिस्थितीत शरीराचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. जसं तुम्ही पुरेशी झोप न घेता, उच्च तीव्रतेचा व्यायाम करीत असाल, तर त्यामुळे तुमच्या आरोग्याबरोबरच तुमच्या वजनावरसुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो. उच्च तीव्रतेचा व्यायाम फक्त वजनच वाढवत नाही, तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्यासाठीही कारण ठरतं. खरं तर संयम ठेवून व्यायाम केल्यानं आपल्या शरीराला आराम मिळतो.