WHO च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नॉन-शुगर स्वीटनर (एनएसएस) म्हणजेच कृत्रिम साखरेचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. WHOने दिलेल्या माहितीनुसार, प्रौढ आणि मुलांसाठी शरीरातील फॅट्स कमी करण्याकरिता (एनएसएस) कृत्रिम साखर वापरणे शरीराला दीर्घकालीन फायदे देत नाही. याशिवाय, निष्कर्षांमध्ये कृत्रिम साखर असलेल्या पदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्याने संभाव्य प्रतिकूल परिणाम होऊ शकतात असे सांगितले आहे. ज्यामध्ये टाइप-२ मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा जास्त धोका असल्याचे सांगितले आहे.
‘इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल’मधील एंडोक्रिनोलॉजीमधील वरिष्ठ सल्लागार, डॉ.ऋचा ऋग्वेदी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’सोबत (एनएसएस) कृत्रिम साखरेवरील नवीन WHO मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यांचे सेवन करणार्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्या परिणामांविषयी माहिती दिली आहे.
साखरेसाठी पर्यायी असलेले हे पदार्थ आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात का? शुगर फ्री पदार्थांऐवजी (एनएसएस) कृत्रिम साखर वापरल्याने एखाद्या व्यक्तीला दीर्घकालीन वजन नियंत्रण करण्यासाठी फायदे मिळत नाहीत का?
शुगर फ्री पदार्थांऐवजी (एनएसएस) कृत्रिम साखर वापरल्याने एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ वजन नियंत्रण करण्यासाठी मदत होत नाही, हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत. WHOचा अभ्यास, वजन कमी करण्यासाठी साखरेचे पर्याय फायदेशीर असल्याच्या सामान्य समजाला आव्हान देतो. यामध्ये पुढे असे स्पष्ट केले आहे की जे लोक (एनएसएस) कृत्रिम साखरेचे सेवन करतात ते इतर उच्च-कॅलरी पदार्थांचा वापर वाढवून कमी झालेल्या कॅलरीजची भरपाई करतात. साखरेसाठी पर्यायी पदार्थ एकूण साखरेचे सेवन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, परंतु ते दीर्घकाळ वजन कमी करण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत. साखरेऐवजी (एनएसएस) कृत्रिम साखर वापरणे हे वजन नियंत्रणासाठी पुरेसे असू शकत नाही.
जर वजन कमी करणे हे ध्येय नसेल, तर कृत्रिम साखरेचे सेवन करणे सुरक्षित मानले जाते का?
जर वजन कमी करणे ही प्राथमिक चिंता नसेल, तरीही साखरेसाठी पर्यायी पदार्थ वापरणे सुरक्षित आहे का याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. साखरेसाठी पर्यायी पदार्थ वापरण्याबाबत दीर्घकाळासाठी होणाऱ्या परिणामांबद्दल वादविवाद आहेत पण ते सामान्यतः वापरासाठी सुरक्षित आहेत, असे यूएस फूड ॲण्ड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA) आणि युरोपियन फूड सेफ्टी ऑथॉरिटी (EFSA) यांसारख्या नियामक प्राधिकरणांद्वारे सांगण्यात आले आहे.
साखरेसाठी विविध पर्यायांवर विस्तृत संशोधन केले गेले आहे, ज्यामध्ये कृत्रिम गोड पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये हे सातत्याने दिसून आले आहे की, कृत्रिम गोड पदार्थांचे स्वीकार्ह दैनंदिन मर्यादेनुसार सेवन केल्यास साखरेसाठी पर्याय म्हणून सामान्य लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक नाही.
पण, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की साखरेसाठीच्या पर्यायांचा प्रत्येक व्यक्तीसाठी मिळणारा प्रतिसाद भिन्न असू शकतो. काही लोकांना पाचक समस्या किंवा इतर सौम्य दुष्परिणामांचा अनुभव येऊ शकतो, परंतु हे विशेषत: दुर्मिळ आहेत आणि त्याला मुख्य चिंता मानली जात नाही. एस्पार्टमसाठी फिनाइलकेटोन्यूरिया (पीकेयू) सारख्या विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि साखरेसाठी पर्याय म्हणून विशिष्ट पदार्थांच्या वापराबाबत वैद्यकीय सल्ल्याचे पालन केले पाहिजे.
हेही वाचा – Diet tips : तुमच्या यकृताची काळजी घेण्यासाठी जीवनशैलीत करा ‘हे’ बदल
प्रौढ आणि मुलांसाठी कृत्रिम साखरेची शिफारस केलेली दैनिक सेवनाची मर्यादा किती आहे?
साखरेची स्वीकार्ह दैनंदिन सेवन मर्यादा विशिष्ट प्रकारच्या गोड पदार्थांवर अवलंबून असते. FDA आणि EFSA सारख्या नियामक प्राधिकरणांनी प्रत्येक गोड पदार्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि कमाल प्रमाणात सेवनाची शिफारस केली आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, शिफारस करण्यात आलेले हे प्रमाण बहुसंख्य लोकसंख्येसाठी सुरक्षित मानले जाते.
प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये सामान्यतः स्वीकार्ह दैनिक सेवन पातळी कमी असते. या मर्यादा त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या लहान शरीराच्या आकारासाठी सेट केल्या आहेत.
तात्पुरते वजन कमी करण्यात मदत करण्याची क्षमता आहे का?
साखरेसाठीचे पर्यायी पदार्थ तात्पुरते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, जसे की कॅलरी कमी करणे किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे. जास्त-कॅलरीज असलेले साखरेऐवजी कमी-कॅलरी किंवा शून्य-कॅलरी पर्याय वापरल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकूण कॅलरी वापरामध्ये तात्पुरती घट येऊ शकते. हे अल्पमुदतीचे किंवा तात्पुरते वजन कमी करण्यासाठी किंवा चांगल्या ग्लायसेमिक नियंत्रणासाठी हातभार लावू शकते. पण, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, वजन नियंत्रित करताना संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि शाश्वत जीवनशैलीच्या सवयी यांसारख्या घटकांचा यात समावेश आहे. तात्पुरते फायदे एकूण आरोग्यासाठी योग्य आहेत का हेदेखील पाहिले पाहिजे.
हेही वाचा – ह्रदय विकार टाळण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत करा हे ५ बदल
मध आणि खजूर यांसारखे नैसर्गिक पर्याय किती सुरक्षित आहेत?
मध आणि खजूर यांसारखे नैसर्गिक पर्याय हे कृत्रिम साखरेसाठी पर्यायी पदार्थ असू शकतात आणि त्यांच्या नैसर्गिक रचना आणि संभाव्य अतिरिक्त पौष्टिक फायद्यामुळे अनेकदा आरोग्यदायी पर्याय मानले जातात.
मध हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे पण तो अजूनही साखरेचा एक प्रकार मानला जातो आणि त्याचे सेवन कमी प्रमाणात असले पाहिजे. जरी मध काही पौष्टिक मूल्य देत असला, तरीही तो कॅलरी आणि कर्बोदकांमध्ये एक मुख्य स्रोत आहे.
खजूर आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा चांगला स्रोत आहे. खजुरामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहासारख्या इतर पोषक तत्त्वांबरोबरच नैसर्गिक गोडवादेखील आहे. पण एकूण सेवनाचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, कारण खजुरातील नैसर्गिक साखरेमुळे त्याच्यातील कॅलरीज तुलनेने जास्त आहेत.
मध आणि खजूर यांसारखे नैसर्गिक पर्याय हे परिष्कृत साखरेसाठी पर्यायी पदार्थ असू शकतात, पण, त्याच्या सेवनाचे प्रमाण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, असे ‘इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल’मधील एंडोक्रिनोलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. रिचा चतुर्वेदी सांगतात.