काही दिवसांपूर्वी मोठ्या मॉलमध्ये नैसर्गिक मध आणि वेगेवेगळ्या ऑर्गनिक मध असणाऱ्या ब्रँडचं प्रदर्शन पाहायला मिळालं. फ्लोरल मध, जांभूळ मध, आल्याचा अर्क असणारा मध, तुळशीचा अर्क असणारा मध , फळांचे अर्क असणारा मध, चॉकलेट मध, स्ट्रॉबेरी मध असे मधाचे विविध प्रकार तिथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते . मधातील साखरेचे प्रमाण आणि त्यासोबत एकत्र केल्या जाणाऱ्या इतर उपयुक्त किंवा गुणकारी पदार्थांमध्ये किमान ग्लुकोज किंवा फ्रुकटोजचे प्रमाण शक्य तितके समान असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जांभूळ वगळता फळांचे अर्क असणारा मध विशेषतः आधीच असणारे मधातील ग्लुकोज आणि फ्रुकटोज चे प्रमाण वाढवू शकते . आणि साखरेऐवजी मधाचा वापर करणाऱ्या वर्गाला फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते . कारण मध साखरेतून जास्त गोड़ असतो.
अलीकडे साखरेला पर्यायी गोडव्यासाठी मधाचा वापर केला जातो. बाजारात विविध प्रकारचे मध उपलब्ध आहेत. खरंतर मधाचा उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांमध्येदेखील केलेला आढळून येतो. पूर्वीच्या काळी राज दरबारात बलवर्धक आणि गुणकारी म्हणून मधाचे सेवन नित्यनेमाने केले जात असे. आजच्या लेखात याच बहुगुणी मधाबद्दल जाणून घेऊ.
मधामध्ये २५ हून जास्त प्रकारची साखर आढळून येते. प्रथिने आणि अमिनो ऍसिड्स मधामध्ये अत्यंत कमी प्रमाणात प्रथिने आढळून येतात. मधातील डायस्टेस स्टार्चसे विघटन करतात, गयकोजेन सुकरेज ग्लूकोसीडीज यामुळे फ्रुकटोज , ग्लुकोज यांचे विघटन कारण्यासाठी मदत करते.
ज्यांना वजन सहज वाढवायचे आहे त्यांना दररोज मध खाण्याने उत्तपा परिणाम मिळू शकतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी पाण्याबरोबर मधाचे सेवन केल्यास त्यांना उत्तम परिणाम मिळतात. रक्तपेशी वाढण्यासाठी तसेच रक्तातील लोहासह प्रमाण वाढविण्यासाठी मध गुणकारी आहे.
बाजारात सहज मिळणाऱ्या मधाची सध्या वेगवेगळं रूपं उपलब्ध आहेत. मधाची गंमत अशी आहे कि मध खाल्ल्याने उलटीसुद्धा होऊ शकते आणि उलटी थांबू सुद्धा शकते. सगळ्या कफ प्रकृती असणाऱ्यांना उत्तम परिणाम देणारे आणि पित्त प्रकृती असणाऱ्यांना देखील मध गुणकारी असतो.
पोषण आणि मध यांचा अनादी अनंत काळापासून खूप जवळचा संबंध आहे . शरीरात पोटात , आतड्यात रक्त वाहिन्यांमध्ये असणारा कफ दोष दूर करण्यासाठी मध उपायकारक आहे . मध योग्य प्रमाणात ऊर्जा देऊ शकतो . मात्र त्यासाठी मध पाण्यातून पिणे जास्त उपयुक्त आहे. चमचाभर मध तसाच खाणे तितकेसे परिणामकारक ठरत नाही. उचकी लागल्यास वेलची पूड आणि मध असे चाटण खाल्यास त्वरित आराम पडतो. एखादी जखम किंवा व्रण भरून काढण्यासाठी मधाचा कलप त्वचेवर लावल्यास लागलीच फरक जाणवतो.
मध आणि लिंबू यांचे पाण्यातून सेवन केल्यास अजीर्ण , बद्धोष्ठ ,तत्वचेचे विकार दूर होण्यास मदत होते. खोकला झाल्यास तुळशीच्या रसासोबत मध घेतल्याने त्वरित आराम पडू शकतो. अतिशय बारीक चणीच्या व्यक्तींसाठी वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करताना कोणत्याही औषधी टॉनिकपेक्षा मध हे नैसर्गिक आणि सोपे औषध आहे. मधाचा आहारात समावेश करताना तो त्यासोबत केला जातो त्या पदार्थाचे गुणधर्म देखील वाढवू शकतो .
तोंडाच्या अनेक विकारांसाठी मधाचा वापर केला जातो . विशेषतः मनुका असणारे मध अत्यंत प्रभावी मानला जातो. विशेषतः फ्लोरल मधासोबत काही प्रिबायोटिक्सच्या प्रमाणसह वापरता येऊ शकतो. जेव्हा आपण बाजारात मिळणाऱ्या मधाबद्दल विचार करतो तेव्हा नेहमी त्यात भेसळ तर नसेल असा विचार मनात येतोच. मध खरेदी करताना मी अत्यंत सजग असते. अनेकदा नैसर्गिक मध असं लिहिलेल्या मधामध्ये नैसर्गिक मक्याचे सिरप , साखरेची सिरप असे पदार्थ वापरले जातात. कोणतेही सिरप न वापरलेला मध पटकन पाण्यात विरघळत नाही आणि बराच वेळ पाण्यात स्थिर राहतो.
व्यायामाआधी प्यायल्या जाणाऱ्या कॉफीसह , सलाड साठी ड्रेसिंग म्हणून, तेलबियापासून तयार केल्या जाणाऱ्या लाडू किंवा बार्समध्ये गोडव्यासाठी मध जरूर वापरावा. डायबिटीस असणाऱ्यांसाठी केवळ आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच मधाचे सेवन करावे. धावणाऱ्यांनी किंवा पोहणाऱ्यांसाठी मधाचे नियमित सेवन गुणकारी आहे. मधाचे लेप ज्याप्रमाणे त्वचेचे सौंदर्य वाढवितात तसेच मधाचे नियमित सेवन त्वचा तजेलदार करु शकते.
काय मग तुम्ही घरी मध वापरणार की नाही?