keto-friendly oils is beneficial :वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. कोणी व्यायाम करतो तर कोणी आहारात बदल करतो. अनेक जण केटो डाएट, दीक्षित डाएटसारखे आहाराच्या पद्धती निवडतात. तुम्ही जर केटो डाएट करत असाल तर नेहमी वापरले जाणारे स्वयंपाकांचे तेल खाणे सोडून देता, जेणेकरून तुमचे वजन कमी होईल. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात केटो फ्रेंडली तेल निवडा. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना Fiteloच्या क्लिनिकल डायटिशियन उमंग मल्होत्रा यांच्याकडून केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरचं वजन कमी करण्यास मदत करू शकते का, हे जाणून घेतले.

मल्होत्रा यांच्या मते, “केटो-फ्रेंडली तेल हेल्दी फॅट्स, विशेषत: सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये समृद्ध असतात, जे शरीराला केटोसिस राखण्यास मदत करतात. केटोसिस ही एक चयापचय स्थिती आहे, जिथे ते कार्बोहायड्रेट्सऐवजी ऊर्जा निर्माण करण्यासाठी फॅट्सचा वापर केला जातो. एमसीटी तेल (Medium Chain Triglycerides), खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, ॲव्होकॅडो तेल आणि तूप किंवा स्पष्ट केलेले बटर हे सामान्यत: केटो डाएटसाठी अनुकूल तेल आहेत.

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

केटो फ्रेंडली तेल नेहमीच्या खाद्यतेलांपेक्षा वेगळे कसे आहेत?

केटो फ्रेंडली तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स (जसे खोबरेल तेल आणि बटरमध्ये असतात) आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (जसे की ऑलिव्ह आणि ॲव्होकॅडो तेल). असतात. हे फॅट्स शरीराच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करतात आणि अधिक चांगल्या प्रकारे पौष्टिक मूल्य टिकवतात. याउलट, नियमित खाद्यतेल वनस्पती तेलांमध्ये (जसे की कॅनोला, सोयाबीन आणि सूर्यफूल पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे चांगल्या प्रकारे पौष्टिक मूल्य टिकवून ठेवत नाही आणि शरीराच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत नाही.

“कोल्ड-प्रेस्ड ऑलिव्ह ऑईल किंवा व्हर्जिन कोकोनट ऑईलसारख्या अनेक केटो-फ्रेंडली तेलांवर त्यांची नैसर्गिक पोषक तत्वे टिकवून ठेवण्यासाठी कमीत कमी प्रक्रिया केली जाते. नियमित खाद्यतेलांवर ब्लिचिंग आणि डिओडोरायझिंगसह मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केली जाते, ज्यामुळे ते मौल्यवान पोषक घटक काढून टाकले जातात,” असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.

केटो फ्रेंडली तेलांचे आरोग्यासाठी फायदे काय आहेत?

एमसीटी (Medium Chain Triglycerides) तेल : नारळ किंवा पाम तेलापासून मिळवलेले एमसीटी तेल शरीराद्वारे वेगाने शोषले जाते आणि केटोन्समध्ये रूपांतरित होते, जलद ऊर्जा स्त्रोत प्रदान करते. केटो डाएट करणाऱ्यांमध्ये हे विशेषतः लोकप्रिय आहे.
ऑलिव्ह ऑईल : मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, ऑलिव्ह ऑईल हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते, दाहकता कमी करते आणि जुनाट आजारांच्या कमी जोखमीशी संबंधित आहे.
ॲव्होकॅडो तेल : हृदयासाठी आरोग्यदायी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमिन ईचे प्रमाण जास्त आहे, ॲव्होकॅडो तेल त्वचेच्या आरोग्यास समर्थन देते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते.
तूप आणि लोणी : दोन्ही संतृप्त फॅट्स आणि स्निग्धांशांतून (फॅट्स) विरघळणारी जीवनसत्त्वे (ए, डी, ई, के) समृद्ध आहेत.
मॅकाडॅमिया नटस् तेल : मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे उच्च प्रमाण असते, जे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते आणि एक स्थिर ऊर्जा स्त्रोत प्रदान करते.

संभाव्य आरोग्य धोके

केटो फ्रेंडली तेल शरीराच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहेत, परंतु त्यांच्या उच्च संतृप्त फॅट्स घटकांमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग यांसारख्या विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो, असे मल्होत्रा म्हणाले. “एमसीटी तेल, विशेषतः मोठ्या प्रमाणात किंवा एकदम केल्यास पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो आणि अतिसार आणि क्रॅम्पिंग होऊ शकतेा, त्यामुळे सुरुवातीला या तेलाचे कमी प्रमाणात सेवन करावे अशी शिफारस त्यांनी केली.

केटो फ्रेंडली तेलाचा उष्मांक जास्त असतो, ज्यामुळे एकूण उष्मांकाचे प्रमाण संतुलित न राहिल्यास जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.

कोणी सावध रहावे?

मल्होत्रा यांनी सांगितले की, एमसीटी तेल आणि इतर उच्च फॅट्सयुक्त तेल काही लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (पोटाच्या समस्या) अस्वस्थता निर्माण करू शकतात, विशेषत: जेव्हा आहारात पहिल्यांदा समाविष्ट करताना काळजी घ्या. अशाप्रकारे ज्यांना हृदयविकाराचा इतिहास आहे किंवा उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आहे, त्यांनी संतृप्त फॅटस किंवा अगदी केटो-अनुकूल तेलांचे सेवन लक्षणीयरीत्या वाढवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.