कृत शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे, जो डिटॉक्सिफिकेशन, प्रथिने संश्लेषण व पचन यांसह ५०० पेक्षा जास्त आवश्यक कार्ये करतो. आधुनिक जीवनशैली, खराब आहाराच्या निवडी, प्रदूषण व तणाव यांमुळे यकृताला अनेकदा विषाक्त आणि हानिकारक पदार्थसेवनाचा फटका बसतो. तुमच्या नित्यकर्मात यकृताची सफाई करणारे हे पेय समाविष्ट केल्याने त्याच्या कार्यांना समर्थन मिळू शकते आणि संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

डॉ. सुदीप खन्ना सांगतात की, कित्येकांकडून अनेकदा लिंबू-आले पाणी, बीटरूट ज्यूस यांसारख्या पेयांसह यकृतासाठी अनुकूल असलेल्या पेयांबद्दल विचारणा केली जाते. ही पेये यकृताची सफाई करू शकतात किंवा डिटॉक्स ड्रिंक्स प्रभावी असल्याचे कोणत्याही अभ्यासातून दिसून आलेले नाही आणि तसा कोणताही पुरावा त्यांच्या बहुतेक दाव्यांचे समर्थन करत नाही. निरोगी प्रौढांमध्ये यकृत विषाक्त पदार्थांना निरुपद्रवी बनविण्यास आणि ते आपल्या शरीरातून काढून टाकण्यास सक्षम असते. लिव्हर क्लीन्स आणि डिटॉक्स ड्रिंक्समध्ये आरोग्याला चालना देणारे घटक असू शकतात; परंतु तुमच्या आरोग्यामध्ये लक्षणीय फरक आणण्यासाठी त्यामध्ये पुरेसे आवश्यक घटक नसू शकतात. पण, ही पेये निरोगी जीवनशैलीला पूरक ठरू शकतात आणि आपल्या यकृताला पोषक घटकांसह आधार देऊ शकतात.

curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
liquor ban Nandurbar loksatta
नंदुरबार जिल्ह्यातील गावात दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर बाटली झाली आडवी
inspirational Story of Prashant Sharma
फेनम स्टोरी : पाण्याच्या समस्येवरचा प्रशांत उपाय
Indian dals ranked based on their protein content
Indian Dals : मूग, मसूर, उडीद डाळ, कोणत्या डाळीतून किती मिळते प्रोटीन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
benefits of custard apple cultivation
लोकशिवार : फायदेशीर सीताफळ

हेही वाचा – बीटचे सेवन केल्याने रक्तातील सारखेवर नियंत्रित करता येईल का? मधुमेही रुग्णांनी बीटचे सेवन कसे करावे

यकृताच्या आरोग्यासाठी डिटॉक्स पेय

निरोगी लोकांमध्ये यकृत शरीरातील विषाक्त घटक शरीराबाहेर काढण्याचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने करते. पण, जर आपण खराब अन्नपदार्थ खाल्ले, जास्त मद्यपान केले किंवा काही औषधे घेतली, तर यकृताला योग्यरीत्या काम करणे कठीण होऊ शकते. यकृताची सफाई करणारे पेय आणि डिटॉक्स ड्रिंक्समध्ये आरोग्याला चालना देणारे घटक असू शकतात; परंतु तुमच्या आरोग्यामध्ये लक्षणीय फरक घटक घडवून आणण्यासाठी त्यामध्ये पुरेसे आवश्यक घटक नसू शकतात. पण, ही पेये निरोगी जीवनशैलीला पूरक ठरू शकतात आणि आपल्या यकृताला पोषक घटकांसह आधार देऊ शकतात.

लिंबू-आले पाणी : लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे यकृताला डिटॉक्सिफिकेशनसाठी आवश्यक एन्झाइम तयार करण्यास मदत करू शकते. दुसरीकडे आल्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि ते पचनास प्रोत्साहन देते. त्यामुळे यकृताला फॅट्सवर प्रक्रिया करण्यास आणि विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते.

हेही वाचा – नाश्ता किंवा रात्रीचे जेवण न करणे; उपवास करण्याची कोणती पद्धत तुमच्या आरोग्यासाठी आहे उत्तम?

बीटाचा रस : बीटरूट हे यकृतासाठी सुपरफूड आहे, जे यकृताचे कार्य उत्तेजित करण्याच्या आणि पेशी पुन्हा निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. बेटेन (एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट), नायट्रेट्स व फायबरने समृद्ध, बीटर पित्त प्रवाहास समर्थन देते, जे फॅट्स नष्ट करण्यासाठी आणि विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तसेच यकृतातील दाहकता कमी करते.

हळदीचा चहा : हळदीतील कर्क्युमिन हे सक्रिय संयुग पित्त उत्पादनास उत्तेजन देते आणि यकृताच्या पेशींना विषामुळे होणार्‍या नुकसानापासून वाचवते. हे दाहकता कमी करण्यास मदत करते आणि यकृताच्या पेशींच्या पुनरुत्पादनात मदत करते.

ग्रीन टी : हे एक सुप्रसिद्ध अँटिऑक्सिडंटयुक्त पेय आहे. ग्रीन टीमधील कॅटेचिन्स हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट यकृतातील फॅट्स कमी करण्यास आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. ग्रीन टीच्या नियमित सेवनाने विषाक्त घटक तयार होण्यास प्रतिबंध होतो.

काकडी आणि पुदीनायुक्त डिटॉक्स वॉटर : काकडी हायड्रेटिंग आहे आणि त्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात; ज्यामुळे विषाक्त घटक बाहेर टाकण्यास मदत मिळते. पुदीना पाचन तंत्राला आणि यकृताच्या कार्यास समर्थन देतो. यकृताची सौम्यपणे सफाई होण्यासाठी दिवसभर हे पेय प्या.

प्रथम आपल्या आहाराकडे लक्ष द्या. कारण- आहार आपल्या शरीरकार्यांना पूरक ठरू शकतो. संतुलित जेवण घ्या, पालेभाज्या, लसूण व काजू यांसारख्या संपूर्ण आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करा. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. यकृतावर ताण आणणारे साखरयुक्त, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले जेवण कमी करा. हायड्रेटेड राहा. कारण- शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पाणी आवश्यक आहे. अल्कोहोल यकृताचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरू शकतो. म्हणून ते कमी प्रमाणात प्या किंवा ते पूर्णपणे टाळा.

(डॉ. सुदीप खन्ना, नवी दिल्ली येथे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार आहेत.)

Story img Loader