उन्हाळ्यात आंब्याचा हंगाम असतो. वर्षभर वाट पाहिल्यानंतर जेव्हा आपण पहिला आंबा खातो तेव्हा मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण या काळात आंब्यावर ताव मारतात पण ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे अशांना कितीही इच्छा असली तरी आंबा खाता येत नाही. तुम्हालाही जर आंबा खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची चिंता वाटत असेल तर तुम्ही नाश्त्याच्या वेळी आंबा खाऊ शकता पण त्याची एक योग्य पद्धत आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असते पण त्यामध्ये अनेक न्यूट्रिशन्स, काही ठराविक व्हिटॅमिन्स आणि काही महत्त्वाची मिनरल्स असतात. आंबा हा संतुलित आहारासाठी चविष्ट पदार्थ म्हणूनदेखील उत्तम पर्याय आहे.
तुम्ही स्ट्रॅटेजिक ईटर व्हायला हवे! म्हणजे तुम्ही काय खात आहात, किती प्रमाणात खात आहात याकडे लक्ष द्यावे लागेल. अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही किती प्रमाणात आंबा खाता हे नियंत्रित करण्याचा सराव करा, प्रथिने आणि हेल्दी फॅटसह आंब्याचे सेवन करा आणि आंबा खायचा असेल तर नेहमी तुम्ही दिवसभरात इतर किती कार्बोहायड्रेटचे सेवन करता याकडे लक्ष द्या!
तुम्ही तुमच्या आहारात किती कार्ब्सचे सेवन करता याकडे लक्ष द्या! आणि तुमच्या दिवसाची सुरुवात आंबा खाऊन कशी करू शकता हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
आंब्याच्या सेवनाचे प्रमाण नियंत्रित करा!
संपूर्ण आंबा खाण्याऐवजी ठराविक प्रमाणात आंब्याचे सेवन करा. आंब्याच्या आकारानुसार त्याचे योग्य प्रमाणात मोजमाप करा. साधारणतः एक कप किंवा सुमारे १५० ग्रॅम आंब्याचे सेवन केले पाहिजे. जर तुमच्या रक्तात साखरेची पातळी जास्त असेल, तर फळांच्या सेवनातून तुम्हाला कार्बोहायड्रेटचे मिळणारे प्रमाण मोजा आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात आंब्याचे सेवन करा.
हेही वाचा – तुम्हाला मध्यरात्री भुक लागते का? मग, पोषणतज्ज्ञांनी सांगितलेले ‘हे’ पाच हेल्दी पदार्थ खा
तुम्ही आंबा केव्हा खाता याकडे लक्ष द्या!
आंब्याच्या सेवनामुळे साखरेच्या पातळीत वाढ होऊ शकते, म्हणून आंबा उपाशी पोटी खाऊ नये. आंबा हे फळ म्हणून नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता. पण चुकूनही जेवणानंतर गोड पदार्थ म्हणून आंबा कधीही खाऊ नका. कारण जेवणात आपण पुरेशा प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे सेवन करतो त्यामुळे नंतर आंबा खाऊन त्यामध्ये तुम्ही आणखी भर घालता आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील फक्त कॅलरीजचे प्रमाण वाढते.
प्रथिने आणि हेल्दी फॅट्स असलेल्या पदार्थांसोबत करा सेवन
प्रथिने आणि हेल्दी फॅट्ससह आंब्याचे सेवन केल्याने कार्बोहायड्रेट्सची पचनक्रिया मंदावते आणि परिणामी रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणामदेखील कमी होतो. तुम्ही आंब्याच्या फोडी दही, चीज किंवा मूठभर काजूसह खाण्याचा विचार करू शकता.
हेही वाचा – गूळ की साखर, तुमच्या त्वचेसाठी काय आहे चांगले? डॉक्टरांकडून जाणून घ्या
ग्लायसेमिक इंडेक्स विचारात घ्या:
ग्लायसेमिक इंडेक्स (GI) अन्नपदार्थ किती लवकर रक्तातील साखरेची पातळी वाढवतात यावर आधारित आहे. आंब्यामध्ये मध्यम प्रमाणात GI असते, याचा अर्थ ते रक्तातील साखर मध्यम प्रमाणात वाढवू शकते. पण, आंब्यामध्ये फायबर असल्यामुळे ते साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत करते. विशेषतः जर तुम्ही साखरेची पातळी वाढण्याबाबत संवेदनशील असाल, तर तुम्ही आंब्याचे आणखी कमी प्रमाणात सेवन करू शकता किंवा आधी सांगितल्याप्रमाणे आंबा तुम्ही प्रथिने आणि फॅट्ससह सेवन करू शकता.
कैरी खाऊ शकता:
पिकलेल्या, गोड आंब्याच्या तुलनेत कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. कैरी ही फायबरने समृद्ध असते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते. तुम्ही सॅलड, चटणी किंवा साइड डिश म्हणूनही कैरीचा उपयोग करू शकता. आंब्याचा आस्वाद घेतल्यास जो किंचित टणक असेल तो तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम कमी करतो आणि फायबरच्या प्रमाणात समतोल राखतो.
तुमच्या एकूण कार्बोहायड्रेट्सच्या सेवनाकडे लक्ष द्या!
दिवसभरात तुमच्या कार्बोहायड्रेट्सचे सेवन संतुलित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नाश्त्यासाठी आंबा खाण्याचा विचार करीत असाल तर तुम्ही दिवसभरात किती प्रमाणात कार्बोहायड्रेसचे सेवन करता याकडे लक्ष द्या! तुम्हाला जर आंबा खायचा असेल तर दिवसभरात कमी प्रमाणात कार्बोहायड्रेसचे सेवन करा. अशा प्रकारे, तुम्ही तुमचे एकूण कार्बोहायड्रेट्सचे सेवन नियंत्रित करू शकता आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवू शकता. एका मध्यम आकाराच्या आंब्यामध्ये सुमारे ४५-५० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असू शकतात, म्हणून तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करता हे तपासा