तुम्ही या उन्हाळ्यात आंबे खाण्यास उत्सुक आहात का? तुमच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि बाजारात सगळीकडे आता आंबा दिसत आहे. आबा हे सर्वांचे आवडते फळ आहे. त्यांचा सुंदर पिवळा रंग आणि त्यांच्या गोड चव आठवून आपल्या तोंडाला पाणी सुटते. पण प्रत्येकाने आंबा खाणे योग्य आहे का? या फळाबद्दल आणि त्याचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम याबद्दल अनेक गैरसमज आहेत. जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल, तर तुम्ही ते सेवन करू शकता की नाही याबद्दल तुमचा गोंधळ होऊ शकतो. आंब्यामुळे तुमचे वजन वाढते का असा प्रश्न तुम्हाला पडत असे? या प्रश्नाचे उत्तर पोषणतज्ज्ञां सिमरन चोप्राने अलीकडेच या इंस्टाग्राम रील पोस्ट करुन दिले आहे.

वजन कमी करण्यासाठी आंबा चांगला आहे का?

आंब्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर फायदे मिळू शकतात आणि काही विशिष्ट परिस्थितीत वजन कमी करण्यासही ते हातभार लावू शकतात. त्याच्या वजन वाढवणाऱ्या गुणधर्मांबद्दल, काही मुद्दे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे

dead butt syndrome
तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

प्रथम, संयम ही मुख्य गोष्ट आहे. असंख्य आंबे खाण्याची इच्छा होणे कितीही मोहक वाटत असले तरी तुम्ही किती आंबे खाता याकडे लक्ष द्या. दुसरे म्हणजे, “जास्त आंबे किंवा केळी खाल्ल्याने लठ्ठपणा किंवा वजन वाढत नाही. तुम्ही तुम्ही वापरत असलेल्या कॅलरीपेक्षा जास्त कॅलरी खाण्याचा थेट परिणाम म्हणजे वजन वाढणे आहे.” असे पोषणतज्ञ स्पष्ट करतात. आंब्यामध्ये कमी-कॅलरी घनता आणि उच्च फायबर घटत असतात. यामुळे भूकेचीड जाणीव दूर राहते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. फायबरची ही एकमेव भूमिका नाही.

हेही वाचा : त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे का आहे गरजेचे? जाणून घ्या कारण

पोषणतज्ञ चोप्राच्या मते, “फळे फायबरने समृद्ध असतात ज्यामुळे शरीराला नैसर्गिक साखरेवर प्रक्रिया करता येते.” आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. पण, आंब्यातील फायबर घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत करू शकते.

शरीरातील फायबर टिकविण्यासाठी फळे खा आणि त्याचा रस पिऊ नका, असा सल्ला पोषणतज्ञ देतात. तिने असेही लिहिले, “सर्व फळे आणि भाज्या “सुपरफूड” आहेत. तुम्हाला गोजी बेरी आणि क्विनोआची गरज नाही. त्यापेक्षा स्थानिक आणि हंगामी फळांपासून सुरुवात करा. फळे आणि भाज्यांचे ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले रंग त्यांच्या “सुपर पॉवर्स” ची गोष्ट सांगतात. , हे त्यांचे “फायटोन्युट्रिएंट्स” किंवा वनस्पती पोषक आहेत, जे आपल्याला रोगाशी लढण्यास आणि दीर्घकाळ मजबूत राहण्यास मदत करतात. कोणताही आहार जो फळे कमी करतो तो आरोग्यदायी असू शकत नाही. लेबल आणि ट्रेंडमुळे दिशाभूल करून घेऊ नका. जर तुमचे शरीर सर्वांगीण निरोगी असेल, तर तुम्हाला असे दिसून येईल की तुमचे वजन नियंत्रित करणे सोपे आहे.

वजन कमी करण्यासाठी आंबा चांगला आहे का? (Freepik)
वजन कमी करण्यासाठी आंबा चांगला आहे का? (Freepik)

वजन कमी करण्यासाठी आंबा खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

आपल्यापैकी बरेच जण जेवणानंतर आंब्याचा आस्वाद घेतात. पण, हे चांगल्यापेक्षा अधिक नुकसानदायी ठरू शकते. जेवणाच्या शेवटी आंबे खाणे टाळा कारण यामुळे वजन वाढू शकते. विशेषत: जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल तर तज्ज्ञांनी सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता म्हणून आंबा खाण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने इतरही फायदे आहेत. आंबा तुम्हाला नैसर्गिक उर्जा देऊ शकतो आणि तुम्हाला हायड्रेट ठेवू शकतो. त्यामुळे अस्वास्थ्यकर स्नॅक्स घेण्याऐवजी, तुमची लालसा पूर्ण करण्यासाठी ताज्या आंब्याची वाटी निवडा. परंतु तुम्ही दररोज किती प्रमाणात वापरत आहात हे नेहमी लक्षात ठेवा.

आंबे निरोगी आहेत का? आंबा खाण्याचे आरोग्य फायदे

जर तुम्ही आंब्याचा आस्वाद घेत असाल, तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, ते चवीष्ट तर आहेत पण त्यासोबत त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत:

रोगप्रतिकारशक्ती वाढवते:

“आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात,” असे पोषणतज्ञ चोप्रा सांगतात. आंबा विशेषतः व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतो, जो तुमच्या शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतो. त्यात तांबे आणि फोलेटसोबत जीवनसत्त्वे के, ई आणि बी देखील असतात, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असतात.

हेही वाचा ; रोज दही खावे का? तुम्हाला माहित असले पाहिजेत ‘हे’ फायदे-तोटे

तुमच्या डोळ्यांसाठी चांगले असतात:

आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारते आणि रातांधळेपणा सारख्या परिस्थिती टाळता येते. यामध्ये इतर पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात जे डोळ्यांचे आरोग्य वाढवतात.

आंब्यामुळे वजन वाढते का? ( Freepik)
आंब्यामुळे वजन वाढते का? ( Freepik)

हृदयाच्या आरोग्यास समर्थन देऊ शकते:

आंब्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्त प्रवाह आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. हे फळ इतर विविध अँटिऑक्सिडंट्स आणि संयुगे देखील समृद्ध आहे जे केवळ निरोगी हृदयच नाही तर निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढवते.

हेही वाचा : दीर्घआयुष्यी व्हायचंय? मग आजच दारू सोडावी लागेल! जाणून घ्या काय सांगते संशोधन

पचन सुधारण्यास मदत होऊ शकते:

पोषणतज्ञांच्या मते, आंब्यासारख्या फळांमध्ये भरपरू पाणी आणि फायबर घटक आतड्याच्या आरोग्यास समर्थन देऊ शकते. आंब्यामध्ये अमायलेसेस नावाचे पाचक एंझाइम देखील असतात, जे जटिल कार्बोहायड्रेट्सचे विघटन करण्यास मदत करतात आणि पचन सुरळीत होण्यास मदत करता

पोषणतज्ञ चोप्रा सांगतात की, “कृपया तुमची फळे खा. तुम्हाला तुमच्या वजनाबद्दल काळजी वाटत असेल, तर प्रक्रिया केलेले अन्न आणि मिष्टान्न सोडून द्या, फळ नाही.” त्यामुळे आता तुम्हाला आंबे खाण्याची चिंता करण्याची गरज नाही हे कळले आहे. फक्त हे मुद्दे लक्षात ठेवा आणि स्वादिष्ट फळांचा आस्वाद घ्या!