Haircare: लांबसडक केस कोणाला आवडत नाही. लांब केसांसाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेक महिला मजबूत आणि लांब केसांसाठी शाम्पू, कंडिशनर आणि तेल वापरतात. केसांसाठी खोबरेल तेलाचा वापर प्रामुख्याने होतो. आपली आजी किंवा आई आपल्याला केसांना तेल लावत असतं. लहानपणापासूनच आपल्यापैकी बहुतेकांना असं सांगितलं जातं की, केसांना नियमितपणे तेल लावल्याने केसांची वाढ होते. हीच परंपरा तुम्हीदेखील पुढे चालवत असाल. केसांना तेल लावणे ही गोष्ट खूप चांगली आहे, मात्र वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. जर तुम्हीही केसांना रात्रभर तेल लावत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. तेल फक्त केसांना ओलावा आणि धुळीपासून संरक्षण करते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या केसांचे संरक्षण करू शकते. मात्र, केसांची वाढ होण्यामागे तेलाची काहीही भूमिका नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्वचाविज्ञान सल्लागार डॉ. सीमा ओबेरॉय लाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे, जाणून घेऊयात.

आपल्या केसांच्या मुळांना रक्तवाहिन्यांद्वारे पोषण मिळते. पोषण, संपूर्ण आरोग्य स्थिती आणि हार्मोनल संतुलन आपल्या केसांचे आरोग्य आणि तेज टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. टायफॉइड, डेंग्यू, गर्भधारणेनंतरचे हार्मोनल बदल केस गळण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे केस गळणे हे जीवनसत्वाच्या कमतरतेवर अवलंबून असते. केसांच्या वाढीसाठी विशेषत: व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, बायोटिन आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिडची आवश्यकता असते.

रात्रभर केसांना तेल लावून ठेवताय?

पण, रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने आणखी काही फायदा होत नाही. या गोष्टीमुळे डोक्यातील कोंडा वाढू शकतो. ज्यामुळे ते ठिसूळ आणि तुटण्याची शक्यता असते. तुम्हाला जर केसांना चमक आणण्यासाठी तेल लावायचं असेल तर केसांच्या लांबीला तेल लावा. केसांच्या मुळांना तेल लावून मसाज करू नका. केसांना मसाज करताना अनेकदा केस एकमेकांमध्ये गुंततात. मग कंगव्याने सरळ करताना ते खूप तुटतात. केसांना रात्रभर तेल लावण्याची आपल्याला सवय असते. तेलाचा कंडिशनिंग प्रभाव असतो, पण रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. केस गळणे आणि इतर समस्या होऊ शकतात. त्यामुळे दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ तेल केसांना लावून ठेवू नका. तेल लावल्यानंतर केस धुणे आवश्यक असते. केसांची काळजी घेण्यासाठी आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे योग्य शॅम्पू वापरणे. केसांना तेल लावल्यानंतर एका तासानंतर शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून दोनदा असे तेल केसांना लावा, केसांची वाढ चांगली होईल आणि केस निरोगी राहतील.

हेही वाचा >> गरोदरपणात नाशपती खाणं योग्य की अयोग्य? स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिलं उत्तर…

तुमच्या डोक्यात कोंडा किंवा केस सारखे तेलकट होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा परिस्थितीत सौम्य कंडिशनर किंवा मॉइश्चरायझर हे सुरक्षित पर्याय म्हणून काम करू शकतात, ज्यामुळे तेलकट त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can oiling hair help you grow it back heres what you should know for your hair care routines srk
Show comments