संत्री हे एक स्वादिष्ट आणि बहुगुण संपन्न फळ आहे ज्याचा अनेक प्रकारे आनंद घेतला जाऊ शकतो. पण त्याच बरोबर त्याचे अनेक संभाव्य आरोग्य फायदे देखील आहेत. हेल्दी स्नॅक असण्याव्यतिरिक्त, सॅलडची चव वाढविण्यासाठी किंवा स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच वेगवेगेळे ज्यूस, स्मूदी आणि कॉकटेल यांसारख्या विविध पेयांमध्ये संत्री हा लोकप्रिय घटक आहेत. इतकेच काय, तज्ञांच्या मते, संत्र्याचे सेवन केल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
संत्री आहे आरोग्यासाठी लाभदायी
संत्री खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते कारण त्यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात जे पेशींचे पुनरुत्पादन करू शकतात आणि तुम्हाला सर्दी आणि फ्लूचा प्रतिकार करण्यास मदत करतात. संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे आतड्याचे आरोग्य राखण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी चांगले असते. विशेष म्हणजे संत्री खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
मोफत फूड देणाऱ्या रेस्टॉरंटला नेटकरी का करतायेत ट्रोल? काय आहे विचित्र ऑफर जाणून घ्या
रोज संत्री खाल्ल्याने तुमचा ताण आणि चिंता होईल कमी
रोज संत्री खाल्ल्याने तुमचा ताण कमी होतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की संत्री खाल्ल्याने तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही व्यवस्थित राहते. हे महत्त्वाचे आहे कारण सतत तणावामुळे कोर्टिसोलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे शरीराच्या आवश्यक कार्यावर परिणाम होऊ शकतो.
संत्र्यामुळे तुमचा ताण आणि चिंता अशी होते कमी?
संत्री खाणे किंवा संत्र्याचा रस पिण्यामुळे तुमचा मूड त्वरित सुधारू शकतो आणि तुम्हाला तणाव कमी होतो आणि तुम्हाला चिंता कमी करण्यास मदत करतो. याचे कारण असे की, संत्र्याची ताजी, लिंबूवर्गीय चव मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवू शकते. नियमितपणे संत्री खाल्ल्याने मेंदूतील पेशींचे पुनरुत्पादन देखील सुधारू शकते, ज्यामुळे अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला जर कशाचेही दडपण जाणवत असेल तर कॉर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी आणि सेरोटोनिनची पातळी वाढवण्यासाठी संत्री खाण्याचा किंवा त्याचा रस पिऊ शकता.