Can Precum Cause Pregnancy: कुटुंब नियोजन हा प्रत्येक जोडप्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो. बाळासाठी प्रयत्न करणे असो किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी प्रयत्न असो दोन्ही गोष्टींसाठी योग्य उपायोजना करणे हे खूप गरजेचे असते. अनेकदा ज्या जोडप्यांना गर्भधारणा टाळायची असते किंवा पुढे ढकलायची असते त्यांना गर्भनिरोधक उपायांबाबत पुरेशी माहितीच नसते. यामुळे त्यांना निर्धास्त शारीरिक संबंध प्रस्थापित करता येत नाहीत. प्रत्येक जोडप्याने आपल्याला पडणारे प्रश्न हे तज्ज्ञांकडूनच सोडवून घ्यायला हवेत अन्यथा ऐकलेल्या- बोललेल्या गोष्टी अनपेक्षित गर्भधारणेच्या रूपात आश्चर्याचा धक्का ठरू शकतात किंवा प्रचंड प्रयत्न करूनही आपल्याला हवे ते परिणाम मिळू शकत नाहीत. असाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ‘प्री कम’ पूर्वस्खलनामुळे म्हणजे संपूर्ण वीर्यस्खलनाआधी गर्भधारणा होऊ शकते का? आज आपण याविषयी तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत.

केअर वात्सल्य (प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग), केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबादच्या क्लिनिकल डायरेक्टर आणि प्रमुख डॉ. मंजुला अनगाणी यांनी स्पष्ट केले की, पूर्वस्खलना (प्रीकम)मध्ये सामान्यत: शुक्राणू नसतात पण आधीच्या स्खलनानंतर मूत्रमार्गात उरलेले शुक्राणू त्यात मिसळल्यास गर्भधारणेची शक्यता असते.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
four days week in japan
विश्लेषण : जन्मदर वाढविण्यासाठी जपानमध्ये चार दिवसांचा आठवडा..! काय आहेत कारणे? योजना कशी राबवणार?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

याचा अर्थ असा की जरी जोडप्याने “पुल-आउट पद्धत” (स्खलनापूर्वी शिश्न मागे घेणे) असा मार्ग अवलंबला तरीही गर्भधारणा होण्याचा धोका असतोच. नियोजित पालकत्वाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की या पद्धतीवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या १०० पैकी २२ जोडप्यांना एका वर्षाच्या आत अनपेक्षित गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

डॉ. प्रियंका सुहाग, सल्लागार, सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली येथील प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, गर्भधारणा होण्यासाठी नेहमीच लिंगाचा पूर्ण प्रवेश आवश्यक नसतो. पूर्ण संभोग न करताही शुक्राणू प्रीकममधून प्रवास करू शकतात आणि योनीमध्ये प्रवेश करू शकतात.असुरक्षित संभोगाच्या तुलनेत ही शक्यता कमी असू शकते, परंतु तरीही धोका नाहीच असे म्हणता येणार नाही. जर नुकतेच स्खलन झाले असेल तर हा धोका आणखी वाढतो, कारण प्रीकममध्ये सक्रिय शुक्राणू असू शकतात.

डॉ अनगानी आणि डॉ सुहाग दोघेही गर्भनिरोधक उपायांसाठी केवळ पुल-आउट पद्धतीवर अवलंबून न राहण्याचा सल्ला देतात. प्रीकम सह गर्भधारणेची शक्यता वीर्यस्खलन पेक्षा कमी असली तरी ती नक्कीच नगण्य नाही. आश्चर्य टाळण्यासाठी, कंडोम, हार्मोनल गोळ्या किंवा इंट्रायूटरिन उपकरण (IUD) सारख्या अधिक विश्वासार्ह गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करा.

जन्म नियंत्रणाचे योग्य उपाय हे कोणत्याही व्यक्तीला, जोडप्यांना त्यांच्या कुटुंब नियोजनाबाबत स्वेच्छेने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतात. निरोगी व निश्चिन्त लैंगिक संबंधासाठी सुद्धा हे उपाययोजना कामी येतात. सध्या बर्थ कंट्रोलचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत व प्रत्येकाचे फायदे व तोटे वेगवेगळे आहेत. तुमच्या वैद्यकीय स्थितीनुसार व पूर्व वैद्यकीय रेकॉर्ड्सनुसार आपण तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य तो पर्याय निवडू शकता.

Story img Loader