Know About Cashews Heath Benefits From Expert : काजू खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? काजू खाल्ल्याने वजन वाढण्यात मदत होते का? १०० ग्रॅम काजू खाल्ल्यावर काय फायदा होतो? तुम्हाला पडलेल्या अशा महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील डाएटिशीएन आणि क्लिनीकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. उशाकिरण सिसोदिया यांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजूमध्ये हेल्दी फॅट्स असून त्यांच्या सेवनामुळे अनेक फायदे होतात. पण याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही खूप जास्त काजू खाल्ले पाहिजेत. विशेषत: पावसाळ्यात काजू खाताना काळजी घेतली पाहिजे.

पावसाळ्यात पचनक्रिया धीम्या गतीनं होत असते. त्यामुळे काजूचं सेवन कमी प्रमाणात करणं महत्वाचं असतं. काजू खाल्ल्यावर पचनक्रिया व्यवस्थीत होत नाही. काजू योग्य प्रमाणात खाल्ल्यावर शरीराला एनर्जी आणि न्यूट्रिशन्स मिळतात. पावसाळ्यात काजू कोरड्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. ओलसर ठिकाणी काजू ठेवल्यावर ते खराब होऊ शकतात.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
diabetes patient can eat diabetic friendly jackfruit ladoo know how to make Green Moong ladoo recipe in marathi
रक्तातील साखर न वाढवता घ्या ‘गोडा’चा आस्वाद! डायबिटीज रुग्णांसाठी खास हिरव्या मुगाचे लाडू
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला

१०० ग्रॅम काजूमध्ये किती न्यूट्रिशन्स असतं?

१) कॅलरी – ५५३
२) टोटल फॅट – ४४ ग्रॅम
३) सॅच्यूरेटेड फॅट – ८ ग्रॅम
४) मोनोअनसॅच्यूरेटेड फॅट – २४ ग्रॅम
५) पॉलिअनसॅच्यूरेटेड फॅट – ८ ग्रॅम
६) टोटल कार्बोहायड्रेट – ३० ग्रॅम
७) डाएटरी फायबर – ३.३ ग्रॅम
८) शुगर – ५.९ ग्रॅम
९) प्रोटिन – १८ ग्रॅम
१०) मॅग्नेशियम -२९२ मेगाग्रॅम
११) पोटॅशियम – ६६० मेगाग्रॅम
१२) लोह – ६.६८ मेगाग्रॅम
१३) फॉस्परस – ५९३ मेगाग्रॅम
१४) झिंक – ५.७८ मेगाग्रॅम
१५) तांबे – २.२ मेगाग्रॅम

नक्की वाचा – कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवायचीय? फक्त ‘या’ ५ पदार्थांचं सेवन करा अन् हृदय ठेवा निरोगी

काजू खाल्ल्याने आरोग्याला काय फायदा मिळतो?

काजूचं सेवन केल्यावर आरोग्याला अनेक प्रकारेच फायदे होतात. काजूमध्ये मोनोअनसॅच्यूरेटेड आणि पॉलिअनसॅच्यूरेटेड फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. मॅग्नेशिअममुळे हाडांना मजबूती मिळते, असं डॉ. सिसोदिया सांगतात. तसंच काजूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं. डोळ्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काजूमध्ये असलेले अॅंटिऑक्सिडन्ट्स, लुटेईनचा फायदा होतो.

मधुमेह झालेले रुग्ण काजू खाऊ शकतात का?

हो, मधुमेह झालेले रुग्ण काजू शकतात पण प्रमाणात. काजूमध्ये साखरेचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असल्याने मधुमेह झालेल्या रुग्णांना ते फायदेशीर ठरू शकतं. परंतु, काजूचं सेवन करताना ते योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजेत आणि डाएटरी गाइडलाइन्सला योग्यप्रकारे फॉलो केलं पाहिजे.

गरोदर महिलेसाठी काजू फायदेशीर आहेत का?

काजूमध्ये फोलिक अॅसिड असल्याने ते गरोदर महिलेसाठी फायदेशीर ठरू शकतात. बाळाच्या वाढीसाठी काजूचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. पण लोहाचं प्रमाण असल्याने गरोदरपणात अशक्तपणाही जाणवू शकतो. गरोदर महिलांनी याबाबत स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसंच एखाद्या नवीन पदार्थाचं आहारात समावेश करायचा असेल, तर न्यूट्रिशनिस्टचा सल्लाही घेऊ शकतात.

Story img Loader