Saffron Benefits: गरोदर स्त्रिया बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. त्यात काही जण गर्भवती महिलांनी दुधात केशर टाकून प्यावे. मग गोरे बाळ जन्माला येते, असा सल्ला देतात. पण, हा सल्ला खरेच योग्य आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सुरभी सिद्धार्थ (सल्लागार आणि प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, खारघर) यांनी सांगितले, “केशरामध्ये बाळाच्या त्वचेचा रंग सुधारतील असे कोणतेही गुणधर्म नसतात. केशर अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते आणि त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. तसेच ते आई आणि बाळ अशा दोघांचेही आरोग्य उत्तम ठेवू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी केशराचे सेवन केल्यास, त्याचा आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो.”

डॉ. सीमा शर्मा (सल्लागार, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो क्रॅडल चिल्ड्रन हॉस्पिटल, मोती नगर, नवी दिल्ली) यांनी सांगितले, “त्वचेचा रंग आनुवंशिक घटकांवर अवलंबून असतो. गर्भधारणेदरम्यान विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने बाळाचा रंग गोरा होत नाही.”

प्रसूती शिक्षिका राधिका कल्पथरू यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “केशराच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते; जी गरोदरपणात कमकुवत होते. त्यामुळे दुधात किंवा डाळीमध्ये केशर मिसळल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेसह पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.”

कल्पथरूने यांनी सांगितले, “केशरमध्ये अवसादविरोधी घटक असतात; जे मूड स्विंग होणे आणि मानसिक तणाव नियंत्रित करतात. त्यामुळे आई आणि बाळ आनंदी राहते.” याच मुद्द्यावर डॉ. सुरभी यांनीही सहमती दर्शवली आणि सांगितले की, केशरमध्ये मूड चांगला करणारे गुणधर्म आहेत जे तणाव कमी करण्यास मदत करतात.आणि गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये असलेली चिंता देखील यामुळे कमी होते”

कल्पथरूच्या मते, “केशरामुळे गर्भधारणेदरम्यान रक्तदाबासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवता येते. पहिल्या तीन महिन्यांत मॉर्निंग सिकनेस मोठ्या प्रमाणात जाणवतो. अशा वेळी मध्यम प्रमाणात केशराचे सेवन केल्यास मॉर्निंग सिकनेस कमी होईल आणि उलटी होण्यापासूनही आराम मिळेल. जसजसे बाळ गर्भाशयात वाढते, तसतसे आईच्या शरीराचे स्नायू ताणतात आणि ते जागा समायोजित करतात. या प्रक्रियेदरम्यान, आईला पाठ, पोट आणि पायांमध्ये तीव्र वेदना होतात. केशराचे मध्यम प्रमाणात सेवन केल्याने या वेदनांपासून आराम मिळेल.”

गर्भधारणेदरम्यान महिलांना ॲनिमियाचाही सामना करावा लागतो. कल्पथरू यांच्या मते, “गर्भवती महिलांनी गर्भधारणेदरम्यान लोहयुक्त अन्न आणि पूरक आहार घ्यावा. काही प्रमाणात केशराचेही सेवन करावे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याने दररोज व्यायाम केल्यामुळे आयर्न व हिमोग्लोबिनचा स्तर कायम राहतो आणि त्यामुळे शरीर अधिक निरोगी राहते.”

प्रसूती तज्ज्ञांनी सांगितले, “गर्भवती महिलांचे वाढणारे पोट आणि श्वासोच्छवासामुळे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवू शकतो.” तसेच कल्पथरू यांनी सांगितले, “तुम्ही झोपण्यापूर्वी केशरयुक्त दूध प्यायल्यास तुम्हाला चांगली झोप येईल.” डॉ. शर्मा यांनी याबाबत सहमती देत सांगितले, “केशराच्या सौम्य प्रभावामुळे शांत झोपेसाठी ते फायदेशीर ठरू शकते.”

हेही वाचा: वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

गर्भवती महिलांना या काळात पिंपल्स, पिगमेंटेशन या सामान्य समस्या जाणवतात. त्याबाबत सल्ला देताना, “केशराचे नियमित सेवन केल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचा चमकदार होते,” असे कल्पथरू म्हणाल्या.

कल्पथरू यांच्या मते, “गर्भधारणेमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. ते लक्षात घेता, केशराचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ॲलर्जीपासून सुरक्षित राहाल आणि हवामानातील बदल आणि इतर सामान्य संक्रमणांमुळे तुमचे संरक्षण होईल. त्यामुळे तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने मध्यम प्रमाणात केशराचे सेवन केल्यास, गर्भधारणेदरम्यान ते आई आणि बाळासाठी खूप फायदेशीर ठरेल.”

केशराचे किती प्रमाणात सेवन करावे?

डॉ. सुरभी यांनी सांगितले, “दुधात केशराच्या दोन-तीन काड्या टाकाव्यात. पण, केशरयुक्त दूध पिणे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असेल. केशरामुळे गर्भवती महिलांना मळमळ, चिंता आणि नाकातून रक्त येणे यांसारखे दुष्परिणामांचाही त्रास होऊ शकतो. म्हणून सावधगिरी बाळगा आणि जोपर्यंत तज्ज्ञ तुम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत त्याचे सेवन करू नका.”