Honey and Metal: आयुर्वेदामध्ये धातूचा चमचा मधाच्या भांड्यात बुडवू नये असे सांगितले जाते. अगदी पूर्वीच्या काळापासून आयुर्वेदाचा हा नियम घरोघरी पाळला जातो. यामागचे कारण म्हणजे धातूमुळे मधावर प्रक्रिया होऊन ते विषारी बनू शकते किंवा त्याचे आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

जर तुम्ही धातूचा चमचा थोडा वेळ मधात सोडला तर खरोखर काय होते? ते हानिकारक ठरू शकते का? हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही आरोग्यतज्ज्ञांशी संपर्क साधला.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

ईशा लाल, पोषणतज्ज्ञ आणि आयुर्वेदिक वेलनेस कोच म्हणाल्या की, “धातूचा चमचा मधात काही क्षण वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, मध किंचित आम्लयुक्त आहे आणि हे खरे आहे की ॲसिड धातूंवर विपरीत परिणाम करू शकतात, स्टीलचा चमचा बुडवून कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया होणार नाही.”

यामागचे सत्य काय?

पूर्वीच्याकाळी तांबे, पितळ किंवा लोखंडासारख्या प्रतिक्रियाशील धातूंनी चमचे बनले जायचे आणि मधात सोडल्यास ते कालांतराने खराब किंवा त्यांना गंज लागायचा. परंतु, आताच्या आधुनिक स्टेनलेस स्टीलच्या चमच्यांना गंज लागत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दमट स्थितीत जरी काही आठवडे मधात हे चमचे सोडले तरी या चमच्यांना कोणताही मोठा गंज लागू शकत नाही आणि त्याचा मधावर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.

हेही वाचा: उपवासामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते? करवा चौथचा उपवास करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता?

ईशा लाल यांच्या मते, धातूच्या चमच्याऐवजी तुम्ही एक उत्तम पर्याय म्हणून लाकडी चमचा वापरू शकता. लाकडाचे चमचे तुमच्या स्वयंपाकघरात जुने नैसर्गिक वातावरण आणतात.

आयुर्वेदामध्ये मधाला एक सामर्थ्यवान “योगवाही” मानले जाते, जे त्याच्याशी एकत्रित असलेल्या कोणत्याही गोष्टीचे औषधी गुणधर्म वाढवते. आयुर्वेद मध गरम करण्यापासून सावध करतो, कारण ते त्याची रचना बदलते आणि विष तयार करते. धातूच्या चमच्यांच्या तुलनेत मधात ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टील सुरक्षित आहे.

Story img Loader