पुरुषांसाठी वडील होणे ही खूप सुंदर भावना आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासह बाळाला जन्म देण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका असतील. काळजी करू नका. तुमच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचे मत जाणून घेतले. सध्या सोशल मीडियावर प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात. त्यापैकीच एक म्हणजे कोमट दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते, असा दावा केला जातो. पण, या दाव्यात काही तथ्य आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.

कोमट दुधात भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते का? (Does eating raisins soaked in warm milk improve male fertility?)

इम्युनोसायन्स सप्लिमेंट्स’च्या व्यवस्थापकीय संचालक, हेल्थ स्ट्रॅटेजिस्ट व वेलनेस कोच डॉ. दीपिका कृष्णा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “होय, दुधात भिजवलेले मनुके शुक्राणूंची संख्या वाढविण्यास आणि पुरुष प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. मनुका हे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि झिंक व सेलेनियम यांसारख्या खनिजांनी समृद्ध असतात; जे शुक्राणूंचे उत्पादन आणि त्यांची हालचाल करण्याची क्षमता (motility) यांसाठी आवश्यक असतात.”

Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Lancet study finds iron calcium and folate deficiency among Indians
भारतीयांमध्ये आहे लोह, कॅल्शियम व फोलेटची कमतरता; लॅन्सेट अभ्यासाचा धक्कादायक निष्कर्ष, जाणून घ्या, तुम्ही कोणते पदार्थ खावेत?
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
kutuhal
कुतूहल: प्रगत हयूमनॉइड
Nisargalipi lesson in nature education
निसर्गलिपी – निसर्ग शिक्षणाचा धडा
Onion Mahabank is not viable even easier viable storage of onion is possible
कांदा महाबँक व्यवहार्य नाही, त्यापेक्षा ‘हे’ व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत
Loksatta kutuhal Humanoids Computer Vision Computational vision Human humanoid
कुतूहल: ह्युमनॉइडचे प्रशिक्षण

डॉ. कृष्णा यांच्या मते, “दुधात प्रथिने आणि कॅल्शियम असते, जे संपूर्ण आरोग्य आणि संप्रेरक संतुलनास समर्थन देते. दूध आणि मनुका एकत्र केल्यावर पोषक घटकांचे शोषण वाढते आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारू शकते. हे घटक चांगल्या पुनरुत्पादक (प्रजनन प्रणाली आणि तिच्या कार्ये आणि प्रक्रिया) आरोग्यासाठी योगदान देतात.”

हेही वाचा – पावसात भिजल्यानंतर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

“ दूध आणि मनुका हे मिश्रण तुमच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी मूठभर मनुके एक ग्लास कोमट दुधात रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे मिश्रण खा. आठवड्यातून दोन-तीन वेळा ते तुमच्या नियमित आहाराचा भाग बनवा. पण, याबाबत सातत्य ही मुख्य गोष्ट आहे आणि त्यामुळे संभाव्य फायदे मिळविण्यासाठी अनेक महिने नियमितपणे त्यांचे सेवन आवश्यक असू शकते”, असे डायट एक्सपर्ट्सचे संस्थापक व आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांनी सांगितले.

हेही वाचा – तुमच्या डोकेदुखीचे कारण तुम्हाला माहिती आहे का? या लक्षणांवरून ओळखा, तज्ज्ञांनी केला खुलासा

सर्व पुरुषांनी दूध आणि मनुका सेवन करणे सुरक्षित आहे का? (Is milk and raisins safe for all men?)

कथुरिया आणि कृष्णा या दोघांनीही मान्य केले, “लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींनी दूध आणि मनुका खाणे टाळावे किंवा लॅक्टोज नसलेल्या दुधाचा पर्याय निवडावा.”

तज्ज्ञांच्या मते, “फायबरचे प्रमाण जास्त असल्याने जास्त प्रमाणात मनुका खाल्ल्याने पोट फुगणे किंवा जुलाब यांसारख्या पाचक समस्या उद्भवू शकतात. मधुमेह असलेल्या लोकांनीदेखील सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण- मनुक्यांमध्ये नैसर्गिक शर्करा जास्त असते आणि त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो.”

“दुध आणि मनुका सेवनाचे फायदे मिळत असल्याचे समर्थन करणारे काही पुरावे असले तरी ते किती प्रभावी आहेत याची खात्री करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या अधिक संशोधन होणे आवश्यक आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.