“तरुण वयात सक्रिय न राहिल्यास (व्यायाम न केल्यास) हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये मध्यम वयात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आणि चयापचय आजार यांचा समावेश असू शकतो,” असे एका अभ्यासात सांगितले आहे. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्यात नियमित व्यायाम करण्यास सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही हृदयविकार टाळण्यास सक्षम असाल.
“नियमित व्यायाम करणे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सुरक्षा देऊ शकते आणि शरीराची तंदुरुस्ती वाढवणाऱ्या कोणत्याही व्यायामामुळे लहानपणी व्यायाम न करण्यामुळे होणारा त्रास कमी केला जाऊ शकतो. पण, खूप उशिरा सुरुवात करण्यापेक्षा तरुण वयात व्यायाम करण्यास सुरुवात करणे योग्य आहे,” असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे मानद प्रोफेसर हदयरोगतज्ज्ञ डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
अभ्यास काय सांगतो? (What does the study say?)
ज्यवास्कला (Jyväskylä) विद्यापीठाच्या संशोधकांनी असे दाखवून दिले की, “किशोरवयात हृदय व श्वसनसंस्थेच्या तंदुरुस्तीची पातळी कमी ( low cardiorespiratory fitness) होणे हे ५७ ते ६४ वयोगटात कार्डिओमेटाबॉलिक (cardiometabolic) स्थितीचा जास्त त्रास असण्याशी संबंधित आहे. हा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे, कारण तो ४५ वर्षांपेक्षा जास्त काळ करण्यात आला होता. ज्यामध्ये सहभागींच्या फिटनेस चाचणीसंबंधित माहिती गोळा केली होती. यामध्ये किशोरवयापासून (१२-१९ वर्षे) मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोरोनरी हृदयविकारासंबंधित आजार याबाबतची माहिती होती. दरम्यान, ३७ ते ४४ आणि ५७ ते ६४ वयामध्ये त्यांच्या कंबरेचा घेर मोजण्यात आला होता. आजारामुळे होणाऱ्या त्रासाचे मूल्यांकन करण्यासाठी कार्डिओमेटाबॉलिक धोकादायक घटकाचा यात समावेश करण्यात आला. डॉ. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, “हे एक चांगले भविष्यातील आरोग्य स्थिती दर्शवणारे मॉडेल आहे.”
हेही वाचा – रोज ओट्स खाल्यामुळे खरेच वजन कमी होऊ शकते? ओट्स का आणि कसे खावेत; जाणून घ्या तज्ज्ञांकडून….
किशोरवयातील हृदय व श्वसनसंस्थेच्या तंदुरुस्तीची पातळी कमी असण्याची कारणे कोणती आहेत? (What are reasons for low levels of cardiorespiratory fitness in adolescence?)
डॉ. रेड्डी यांच्या मते, “गर्भाशयात आणि बालपणात मिळालेले खराब पोषण किंवा शालेय आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम या कारणांमुळे किशोरावस्थेत हृदय व श्वसनसंस्थेच्या तंदुरुस्तीची पातळी कमी (Low levels of cardiorespiratory fitness) होऊ शकते. वाढत्या वयात तरुणांना आरोग्याशी तडजोड करणे टाळण्यासाठी आणि नंतरच्या आयुष्यात त्याची किंमत मोजावी लागू नये, यासाठी अशा सर्व घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हेही वाचा – कोमट दूध प्यायल्यास खरेच शांत झोप लागते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या काय आहे सत्य….
३ ते ६ वयोगटातील मुलांनी व्यायाम केला पाहिजे का? (Should cardio-vascular fitness be stepped up at the preschool level?)
केईएम रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गडकरी सांगतात, “शाळांनी विद्यार्थ्यांना व्यायामासाठी सातत्याने प्रोत्साहित केले पाहिजे. केवळ शैक्षणिकच नव्हे, तर खेळ आणि व्यायामावरही लक्ष केंद्रित करणारे अनुकूल वातावरण असणे आवश्यक आहे.”
व्यायाम करण्यासाठी ६० मिनिटे आदर्श मानली जात असली, तरी किशोरवयीन मुलांनी आठवड्यातून ५ ते ६ दिवस किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. कधी कधी घरातील कामामध्ये मदत करणेदेखील फायदेशीर ठरू शकते.