मधुमेह हा आजार का होतो हे जाणून घेताना आपण जे अन्न खातो, त्याचा मधुमेहाशी संबंध आहे का याची पडताळणी केली जाते. पण, या पडताळणीदरम्यान मधुमेही व्यक्तीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या एका सवयीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ती म्हणजे धूम्रपान.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना मधुमेह होण्याचा तिप्पट धोका असतो,” असे डॉ. व्ही. मोहन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. व्ही. मोहन हे चेन्नईच्या डॉ. मोहन डायबिटीज स्पेशालिटी सेंटरचे अध्यक्ष आहेत. धूम्रपान आणि टाईप-२ मधुमेह यांच्यातील संबंध स्पष्ट करताना त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अनेक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे, “धूम्रपानामुळे टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका ३० ते ४० टक्के आहे. ज्यांना प्री-डायबेटिस (मधुमेहाच्या पूर्वीची स्थिती) आहे, ते मधुमेह होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असतात. ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यामध्ये HbA1c (सरासरी तीन महिन्यांची) पातळी जास्त वाढण्याची शक्यता असते.”
मधुमेहाचा प्रसार आणि तंबाखूचा वापर या दोन्ही समस्या भारतात झपाट्याने वाढत आहेत. २००३ मध्ये इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (IDF) आणि २००४ मध्ये अमेरिकन डायबिटीज असोसिएशन (ADA) यांनी, “आणखी गुंतागुंत होण्याच्या धोक्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी धूम्रपान करू नये”, अशी शिफारस केली होती.
धुम्रपानामुळे मधुमेह होण्याचा धोका कसा वाढतो? (How does smoking increase diabetes risk?)
सिगारेटमध्ये चार हजारहून अधिक रसायने आहेत आणि त्यापैकी ५१ रसायने कर्करोगास कारणीभूत आहेत. या रसायनांमुळे जळजळ होते आणि अनेक अवयवांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो. ही रसायने यकृत, स्नायू व अॅडिपोज टिश्यूमध्ये (adipose tissue) इन्सुलिन प्रतिरोध (insulin resistance) निर्माण करतात. ती स्वादुपिंडाच्या (pancreas) कार्यावरदेखील परिणाम करतात आणि तीव्र स्वादुपिंडाचा दाह (chronic pancreatitis) होण्याचा धोका वाढवतात; जे टाईप २ चा मधुमेह होण्याचे कारण आहे.
इन्सुलिन रक्तातील साखरेला पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करू शकते; परंतु निकोटीनमुळे पेशींमध्ये बदल होतो. त्यामुळे त्या इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
मधुमेह असूनही जे धूम्रपान आणि मद्यपान करतात अशा व्यक्तीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
मद्यपानामुळे आधीच स्वादुपिंडाचा दाह होण्याचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका दुप्पट होतो.
धुम्रपान करण्यामुळे इतर कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो? (What are other complications triggered by smoking?)
- धूम्रपानामुळे मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतीची आरोग्य स्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यांच्यातील संबंध आधीपासून माहीत आहे. जर तुम्हाला आधीच टाइप २ मधुमेह असेल आणि तुम्ही धूम्रपान करीत असाल, तर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका तिप्पट किंवा चौपट होऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे हृदयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते.
- निकोटीन एक व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर (vasoconstrictor) आहे आणि त्याचा अर्थ ते रक्तवाहिन्या अरुंद करते; ज्यामुळे इस्केमिया (ischemia) होतो. जेव्हा हृदयाच्या बाहेर अस्तित्वात असलेल्या सर्व रक्तवाहिन्या (peripheral blood vessels) अरुंद होतात; ज्यामुळे पाय आणि तळव्यांना रक्तपुरवठा होतो, तेव्हा परिधीय रक्तवहिन्यांसंबंधीचे रोग (peripheral vascular disease) आणि गँगरीन (gangrene) विकसित होण्याचा धोका जास्त असतो.
- योग्य रीत्या काळजी न घेतल्यास धूम्रपानामुळे दीर्घकालीन गुंतागुंत वाढू शकते. जसे की, हृदयविकार, मूत्रपिंड रोग (nephropathy), मज्जातंतू रोग (neuropathy), डोळ्यांचे रोग (retinopathy) व पायांचे आजार (foot disease) यांचा धोका वाढतो.
- अत्यंत गंभीर परिस्थितीत धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांच्या बाबतीत शरीराचा अवयव गमावण्याचा किंवा काढून टाकण्याचा धोका (risk of amputation) जास्त असतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, धूम्रपानामुळे स्वादुपिंडाचा कर्करोग (pancreatic cancer), तसेच इतर प्रकारच्या कर्करोगास चालना मिळते.
“म्हणूनच मी माझ्या रुग्णांना त्यांच्या भल्यासाठी धूम्रपान सोडण्यास सांगतो,” असे डॉ. व्ही. मोहन यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “त्यांच्यापैकी बरेच जण मला विचारतात की, धूम्रपान करण्यासाठी काही सुरक्षित मर्यादा आहे का? वस्तुस्थिती अशी आहे की, अशी कोणतीही मर्यादा नाही. दिवसातून एक सिगारेटसुद्धा आरोग्याचे नुकसान करते.”