Can Spicy Food Cause Stomach Ulcers: मसालेदार पदार्थ, लाल मिरच्या, तिखट झणझणीत पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडतं, अल्सर होऊ शकतो असा एक समज वर्षानुवर्षे व पिढ्यानपिढ्या पसरत आला आहे. त्यामुळे अनेकदा तिखट खाण्याची इच्छा असूनही आपल्या मनाला मारून जगावं लागतं पण आज आपण तज्ज्ञांनी दिलेली एक अशी माहिती पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमच्या आवडीचा झणझणीत मिसळीचा रस्सा, पाणीपुरी, कालवणावर ताव मारू शकणार आहात. चला तर मग..

पोटाच्या अल्सरचे खरे कारण काय?

मसालेदार पदार्थ अल्सरचे प्राथमिक ट्रिगर नाहीत. त्याऐवजी, बहुतेक अल्सर हेलिकोबॅक्टर पायलोरी (एच. पायलोरी) बॅक्टेरियाच्या उपस्थितीमुळे किंवा आयबुप्रोफेन आणि ऍस्पिरिन सारख्या नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) च्या दीर्घकाळापर्यंत वापरामुळे उद्भवतात. हे बॅक्टरीया पोटातील संरक्षणात्मक अस्तरांचे नियमन करणाऱ्या रसायनांच्या उत्पादनात अडथळा आणतात. दूषित अन्न आणि पाणी पोटात गेल्याने हा त्रास वाढतो.

tomato ketchup adulteration
टोमॅटो सॉसमधील भेसळ कशी ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
This is what happens to the body when you consume expired biscuits
एक्सपायरी डेट संपल्यानंतर बिस्किटे खाल्ल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
delicious oatmeal poha
ओट्स खायचा कंटाळा येतोय? मग ट्राय करा ओट्सचे चविष्ट पोहे
Yogic treatment method with science can cure even incurable diseases says acharya upendra
आचार्य उपेंद्र म्हणतात, ‘मधुमेह, गुडघादुखी मंत्र साधना, अंतर योगातून उपचार…’
metal spoon in honey
धातूचा चमचा मधात ठेवणे विषारी ठरू शकते? तज्ज्ञ काय सांगतात…

खराब बॅक्टरीया पोटाच्या भिंतीच्या अस्तरांना चिकटून राहतात व अल्सर वाढवतात. यामुळे पोटात जळजळ निर्माण होते, ही स्थिती पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढवते व त्यांमुळे पोटाच्या अस्तराचे सहज नुकसान होते. याशिवाय तोंडाच्या अल्सरच्या काही कारणांमध्ये आघात, संक्रमण आणि केमोथेरपी यांचा सुद्धा समावेश होतो.

मसालेदार पदार्थ काय करतात?

आता प्रश्न हाच उरतो की, मग मसालेदार पदार्थ काय करतात? मसालेदार पदार्थ आधीच अल्सरने ग्रस्त असलेल्या लोकांमधील त्रासदायक लक्षणे वाढवू शकतात, परंतु ते या स्थितीचे मूळ कारण नाहीत. किंबहुना, संशोधन असे सूचित करते की मसालेदार पदार्थांमध्ये उष्णतेसाठी जबाबदार असलेले कॅपसायसिन, हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (पोटाच्या व आतड्यांच्या) आरोग्यासाठी काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकते.

अभ्यासांत असे दिसून आले आहे की, कॅप्सेसिन एच. पायलोरी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करू शकते, त्यामुळे अल्सर होण्याचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त, कॅप्सॅसिन पोटाच्या अस्तरात संरक्षणात्मक श्लेष्माच्या उत्पादनास प्रोत्साहन देते हे अल्सरपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.

बीएमजे मधील २०१५ च्या अभ्यासात असे दिसून आले होते की, आठवड्यातून सात दिवस मसालेदार पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये आठवड्यातून एक किंवा दोन वेळा मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांची तुलनेत मृत्यूची जोखीम १४ टक्के कमी झाली होती. यात मद्यपान न करणाऱ्यांना धोका कमी असल्याचे सुद्धा आढळून आले.

शरीराचे संकेत ओळखणे आवश्यक!

अर्थात हे सगळे मुद्दे खरे असले तरी मसालेदार पदार्थ सहन करण्याची क्षमता प्रत्येकाच्या शरीरानुसार बदलू शकते, काहींना अगदी कोणताही त्रास न सहन करता तिखट, झणझणीत पदार्थ खाऊन छान पचवता येतात, तर काहींना तिखट खाल्ल्याने पोटाच्या व आतड्याच्या विकारांमध्ये वाढ झाल्याचे जाणवू शकते. अशावेळी आपल्या शरीराची गरज ओळखून स्थिती बिघडवणारे पदार्थ टाळायला हवेत.

हे ही वाचा<< ६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व

दूध प्यायल्याने अल्सर बरा होतो का?

तुम्हाला, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, डिस्पेप्सिया किंवा इन्फ्लेमेटरी बोवेल डिसीज (IBD) असल्यास मसालेदार पदार्थांपासून दूर रहा कारण ते अस्वस्थता वाढवू शकतात. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मसालेदार पदार्थांमुळे मूळव्याध होत नाही, परंतु जळजळ होऊ शकते. अल्सरच्या कारणांविषयीच नव्हे तर उपचारांविषयी सुद्धा काही प्रमाणात गैरसमज आहेत. तुमच्या पोटात अल्सर होत असल्यास किंवा जळजळ होत असल्यास थंड दूध प्यायल्याने आराम मिळतो असं सांगितलं जातं पण याउलट दुधामुळे अनेकदा पोटात ऍसिड तयार होऊन स्थिती बिघडू शकते.