Mental Stress: तणाव हा जीवनाचा एक भागच आहे. चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे; परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो. कारण- त्याचा रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो. तणाव हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू असून, त्यामुळे जगभरातील लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. मनावर ताण येत असेल, तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. अलीकडील अभ्यासात असे आढळून आले की, योगाने इतर तणाव व्यवस्थापन तंत्रांच्या तुलनेत तणाव, नैराश्य व चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. योगसाधनेमुळे मानसिक थकवा कमी होतो, स्मरणशक्ती वाढते, असे योगातज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी या संदर्भात सविस्तर माहिती देताना स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूतकाळ किंवा कोणी काय बोलले ते तुमच्या मनातून निघून जात नसेल आणि तुम्ही रात्रंदिवस त्याचाच विचार करीत राहिल्यास काही योगासनांमुळे तुमचे मन ‘रिलॅक्स फील’ करू शकते. चला तर मग जाणून घेऊ कोणती योगमुद्रा तुम्हाला जास्त विचार करण्यापासून वाचवू शकते.

योगमुद्रा आसन : हे आसन केल्याने मन शांत होते आणि मेंदूला चांगला रक्तपुरवठा होण्यास मदत होते.

योगा मॅटवर सरळ बसा, डोळे बंद करा. खोल श्वास घ्या आणि आपले हात आपल्या डोक्यावर सरळ करा. सुरुवातीला हे योगासन दररोज दोन ते तीन मिनिटे करण्याचा सराव करा. नंतर हळूहळू १० मिनिटांपर्यंत वाढवा. हळूहळू सामान्य स्थितीत या आणि काही वेळ बसून श्वासोच्छवासाचा व्यायाम करा.

भुजंगासन

भुजंगासन केल्यानेही आपल्याला बरेच फायदे होतात. भुजंगासन हे मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असे आसन आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचे शरीराला नेमके कोणते फायदे होतात ते पाहू.

१. पोटावर झोपावे आणि आपले कपाळ जमिनीवर टेकवावे.

२. पाय एकत्रित ठेवावेत किंवा पायांत अंतर असू द्यावे. शरीराचा छातीकडील भाग पाय जमिनीला समांतर ठेवत वर उचलावा.

. आपली कोपरे शरीरालगत ठेवावीत आणि हातांनी वरचा तोल सांभाळून ठेवावा.

४. आपले डोके वर उचलावे आणि अधिकाधिक मागे न्यावे. तसेच छाती शरीरापासून अधिकाधिक वर ताणावी. ही आसनाची पहिली पायरी आहे.

५. तीन ते पाच वेळा श्वासोच्छवास करेपर्यंत या अवस्थेत राहावे. हळूहळू श्वास सोडत जमिनीकडे यावे.

६. आसन सोडताना पाठीच्या स्नायूंना आराम द्यावा. पोट, बरगड्या, छाती व खांदे एकामागून एक पूर्वस्थितीत आणावेत.

आसन करताना या गोष्टी लक्षात घ्या

१. श्वासोच्छवास नियमित करावा आणि आसन करताना पाठ, मान व खांदे यांना ताण बसायला हवा.

२. शरीर पटकन उचलू नये किंवा जोर लावूनही उचलू नये.

३. आसन करताना डोळे किंवा भुवया उंचावल्या जातात. त्यामुळे डोळ्यांमध्ये ताण निर्माण होतो. ही कृती टाळावी.

४. एका वेळेस तीन ते पाच वेळा आसन करावे. त्यापेक्षा जास्त करू नये.

५. योगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच हे आसन करावे.

६. गर्भवती महिलांनी पोटाला ताण बसेल अशी कुठलीही कृती करू नये; तसेच ज्यांना मधुमेहासोबत आरोग्याच्या इतर तक्रारी आहेत, त्यांनीही हे आसन तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये.

हेही वाचा >> गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम

भुजंगासनाचे फायदे

१. या आसनात पाठीच्या कण्यांवर ताण येतो. त्यामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. दीर्घकाळ काम केल्याने पाठीला लागलेली रग आणि दुखणे कमी होते.

२. श्वसनविषयक आणि पचनप्रक्रियेत सुधारणा होतात. मधुमेहींसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते.

वर सांगितल्याप्रमाणे रोज ३० ते ९० सेकंदांचा रोज सराव केला तरी ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Can these yoga asanas lower your stress levels cortisol heres what a study shows mental stress these 2 pranayama routines control anxiety srk
Show comments