Side Effects Of Consuming Too Much Turmeric : हळद एक असा मसाला आहे; ज्याचा वापर आहारामध्ये तर होतोच, तसेच अनेक आजारांमध्ये उपचार म्हणूनसुद्धा हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणारे करक्युमिन नावाचे तत्त्व त्याला पिवळा रंग प्रदान करते आणि हेच तत्त्व हळदीची सगळ्यात मोठी ताकदसुद्धा आहे. हळदीचा वापर आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये अगदी जुन्या काळापासून केला जात आहे आणि आजसुद्धा भारतातील कित्येक घरांमध्ये विविध उपायांसाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत बोलायचे झाले, तर यामध्ये अँटीऑक्सिडंड, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-म्युटाजेनिक व अँटी-इंन्फ्लमेट्री अशा गुणधर्मांचे भांडार आढळते.
हळदीचे एवढे सारे लाभ नक्कीच आहेत. पण तुम्हालासुद्धा माहीत आहे की, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट बाजू! हळदीचीही एक वाईट बाजू आहे. तुम्ही एका मर्यादित प्रमाणात उपयोग केला, तर नक्कीच हळदही लाभदायक आहे. पण, अतिप्रमाणात वापर केला, तर त्याचे तोटेसुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात..
तुम्हीही हळदीच्या कॅप्सूल घेता का?
यकृत स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर करा. तसेच हळद चरबी कमी होण्यासही उपयुक्त ठरते. मात्र, त्याचे प्रमाणात सेवन केले पाहिजे. अग्रगण्य ‘गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीरी सायन्सेस’चे संचालक डॉ. एस. के. सरीन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली. आले किंवा काकडीसारखे कच्चे आणि ताजे सेवन केल्यास हळद सर्वांत सुरक्षित असते. कारण- त्यात सायटोकाइन्स असतात; जे रस किंवा कच्च्या स्वरूपात जास्त काम करतात. हळद आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचे काम करते. कॅप्सूल स्वरूपात हळदीचे सप्लिमेंट्स घेत असाल, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की, त्यामध्ये हळदीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे हळदीचे सप्लिमेंट्स घेताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
हळदीचे सेवन कसे करावे?
हळद पावडरपेक्षा कच्ची हळद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कच्च्या हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठीही कच्ची हळद मदत करते. कच्च्या हळदीच्या वापरामुळे त्वचा चमकदार व निरोगी राहते. हळद यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे, असे बर्याच संशोधनात समोर आले आहे. त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते.
हळदीचे सेवन केल्याने काय फायदे होतात?
मधुमेह –
जे लोक शुगर पेशंट आहेत; अर्थात ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी हळदीचे सेवन केले, तर रक्तातील साखरेची मात्रा खूप कमी होऊ शकते आणि ही गोष्ट मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात योग्य नाही. साखरेचे शरीरातील प्रमाण हे नियंत्रितच असले पाहिजे; ना जास्त ना अतिशय कमी. ते मध्यम असायला हवे. म्हणूनच मधुमेहाचा तुम्हाला त्रास असेल, तर तुम्ही हळदयुक्त आहार न घेणेच उत्तम!
रोगप्रतिकारशक्ती –
रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीपासून तयार होणारे ‘गोल्डन ड्रिंक’ पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात हळद उकळवून तयार होणारे मिश्रण प्यावे. त्याशिवाय मध वा पाण्यामध्येही हळद टाकून, ती चांगली उकळवूनही तुम्ही हळदीचे सेवन करू शकता. त्यामुळेसुद्धा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मासिक पाळी
काही महिलांना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो. मासिक पाळीत ओटी पोट, पाठ आणि पोटदुखीचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचे पाणी किंवा हळदीचे दूध पिऊ शकता.
हळदीचे सेवन किती प्रमाणात करावे?
आरोग्य अहवालांनुसार, एखादी व्यक्ती एका दिवसात सुमारे 25-50 ग्रॅम हळद खाऊ शकते.जर तुम्ही याचे जास्त सेवन केले तर यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळे हळदीचा कमी प्रमाणात वापर करा, जेणेकरून तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.