हिवाळा सुरू झाला आहे आणि देशभरात कडाक्याची थंडी पसरत आहे. दरम्यान, हार्ट अटॅकचे प्रमाणदेखील वाढत आहे. अनेक अभ्यासातील माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये हिवाळ्यात येणारे हार्ट अटॅक आणि मृत्यूच्या दरामध्ये समान स्वरूप असल्याचे दिसते. खरं तर उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचा दर जास्त आहे. शरीरामध्ये अनेक बदल होत असतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलच्या इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट विभागाचे सल्लागार, डॉ सैकत कांजीलाल हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग याबाबत इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

poster on the rickshaw
मीठ अन् साखर नव्हे हा आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ, रिक्षावरील पोस्टरमुळे रंगली चर्चा, पाहा Viral Post
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar
Blood Sugar : ग्रीन टी, डार्क चॉकलेट, दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते का? काय खरं काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Viral video 91 year old marathi aaji swimming wearing nauvari saree in deep lake video
“काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेतात बहरून आले जणू” आजीनं नववारी नेसून खोल तळ्यात मारला सूर; VIDEO पाहून व्हाल अवाक्
Weight Lose Tips
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ५ गोष्टी; महिनाभरात कमी होईल वजन, दिसाल फिट
banana diet weight loss
रोज रोज केळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते? जाणून घ्या अन् गोंधळ दूर करा
Fennel seeds carom seeds water benefits
आरोग्याच्या ‘या’ ५ समस्या होतील झटक्यात दूर; जाणून घ्या ओवा, बडीशेपच्या मॅजिक ड्रिंकचे फायदे
Leopard funny video
‘भूक कंट्रोल करता आली पाहिजे…’ तळ्यात मासा सापडला समजून बिबट्याने स्वतःची शेपूट पकडली अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून हसाल पोट धरून

नक्की कशामुळे येतो हार्ट अटॅक?
व्यक्तीचे सभोवतालचे तापमान कमी असू शकते हे पहिले कारण ठरू शकते. हे शरीरातील सहानुभूतीशील प्रणाली (sympathetic system) सक्रिय करते, जे अँड्रेनालाईन (adrenaline) पंप करते, तुमच्या हृदयाची गती वाढवते आणि ते शरीराला गरम ठेवण्यासाठी विविध अवयवांपर्यंत अधिक ऑक्सिजनयुक्त रक्त पोहचवते. आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि अरुंद होतात, याचा अर्थ रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक जोरात पंप करावे लागते. यामुळे थंडीच्या काळात जवळजवळ प्रत्येकाचा रक्तदाब वाढतो.

अशा वेळी शरीर उच्च रक्तदाबाशी तडजोड करत असलेल्या स्थितीमध्ये किंवा आधीपासून प्लेक (underlying plaque condition) असलेल्या स्थितीमध्ये शरीरात होणारा उच्च रक्त प्रवाह कोरोनरी धमन्या (Coronary arteries) अरुंद करू शकतो, ज्यामुळे हृदय आणि त्याच्या स्नायूंना पुरवले जाणारे रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो.

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 

आपल्या रक्ताचे प्रमाण हिवाळ्यात जास्त असते. शरीरातील पाणी धरून ठेवण्याच्या शक्तीमुळे (fluid retention) उच्च रक्तदाबदेखील होतो. ही स्थिती हृदयावर ताण निर्माण करते, ज्यामुळे हृदयात असलेल्या प्लेकस् काढून टाकल्या जाऊ शकतात, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो.

२) हॉर्मोनल बदलांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, रक्त गोठण्याचे घटक आणि प्लाझ्मा फायब्रिनोजेनची (Plasma fibrinogen) पातळी वाढते. जसे प्लेटलेट्सच्या गुठळ्या तयार करतात, त्यामुळे रक्त चिकट होते. या गुठळ्या लहान असल्या तरी त्या आधीच दबलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात आणि रक्त पुरवठा आवश्यक आहे तिथपर्यंत पोहचत नाही.

३) जर तुम्ही सर्दी, अॅलर्जी आणि संसर्गाच्या भीतीने व्यायाम करणे थांबवले तर तुम्ही तुमच्या हृदयाचे नुकसान करत आहात. व्यायामाचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा तो सातत्याने केला जातो.

४) शरीराचे वेळपत्रक : धावपळीच्या जीवनात अनेकदा शरीराचे वेळापत्रक बिघडते, ज्यामुळे शरीरातील रसायने असंतुलित होतात किंवा संतुलन बिघडते. संशोधकांना असे आढळून आले आहे की, सकाळी शरीरातून पीएआय १ पेशी मोठ्या प्रमाणात बाहेर सोडल्या जातात. या पेशींचे कार्य रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्याचे असते. शरीराचे वेळापत्रक बिघडल्याने पीएआय १ पेशींचे प्रमाण कमी होते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

५) हवेतील प्रदूषक घटकांमुळेच श्वसनसंसर्ग आणि अॅलर्जी झाल्यास शरीरात जळजळ होण्याची स्थिती वाढवते, जो हार्ट अटॅक येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

६) जर तुमचे थायरॉईड सामान्यपणे कार्य करत नसेल, तर तमच्या शरीरातील सीरम TSHची पातळी वाढते आणि हृदयावर जास्त काम करण्याचा ताण येतो.

हेही वाचा – झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हा’ आहार घेतल्याने तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम होतो? डाॅक्टर काय सांगतात…

७) दिवसभर सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न आल्यास व्हिटॅमिन डीचे शोषण बिघडते. त्याच्या कमतरतेमुळे कॅल्शियम पचनावर परिणाम होतो, जे विद्युत आवेगांचे (electrical impulses) नियंत्रित करतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा एरिथमिया ( heartbeats or arrhythmia) होऊ शकतो.

८) पुरेश्या प्रमाणात पाणी न पिणे : तुम्हाला तहान लागत नाही म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याची आवश्यकता नाही असे नसते. असे केल्यास निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो आणि रक्ताचे प्रमाणही कमी होते, ते चिकट आणि गुठळ्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

हेही वाचा – Heart Attack : हिवाळ्यात हृदय सांभाळा! हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

हार्ट अटॅक कसा टाळता येईल?
कृपया आठवड्यातून एकदा तरी तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा, २४ तासांच्या कालावधीने लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टाइम स्लॉटमध्ये तपासा. बाहेर पडताना कपड्यांचे एकावर एक थर चढवा. घराबाहेर व्यायाम करणे कधीही थांबवू नका, परंतु जेव्हा तुम्हाला थंडी वाजत असेल तेव्हा तुम्ही घरामध्ये व्यायाम करा. वृद्ध प्रौढांना ट्रेडमिलच्या तुलनेत एक चांगली कार्डिओ-व्हस्कुलर अ‍ॅक्टिव्हिटी (Cardio-vascular activity म्हणून स्टॅटिक सायकलिंग (Static cycling) करता येईल, कारण त्यामुळे गुडघा आणि सांध्यावर दबाव पडत नाही. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यातील तपासणी करणे अधिक आवश्यक आहे, म्हणून नियमित तपासणी चुकवू नका. श्वसनाचा संसर्ग होण्यापासून (respiratory infection) स्वतःचे संरक्षण करा.