one legged balances can help lower death risks : तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड ‘एका पायावर किमान १० सेकंद उभे राहणे’ कधी करून पहिला आहे का? हा ट्रेंड करण्यात तुम्ही यशस्वी ठरलात का अयशस्वी… या प्रश्नावरचं तुमचं उत्तर, तुमचं आयुष्य किती असेल हा अंदाज लावू शकतो; असे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या पेपरनुसार, १० सेकंदचा वन-लेग्ज स्टँड (OLS) ट्रेंड यशस्वीरित्या पूर्ण करण्याची तुमची क्षमता, मृत्यूदरासह, वय, लिंग आणि इतर अनेक मानववंशीय आणि क्लिनिकल व्हेरिएबल्सच्या पलीकडे संबंधित रोगनिदानविषयक माहिती सांगते.

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने हैदराबाद मलाकपेट येथील केअर हॉस्पिटल्सच्या सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मुरली कृष्णा यांच्याशी चर्चा केली आणि एका पायावर किमान दहा सेकंद उभे राहणे मृत्यूचे धोके कमी करण्यास, वृद्ध, प्रौढांना निरोगी, सुरक्षित ठेवण्यास कशी मदत करू शकतात, हे समजून घेतलं आहे.

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
I don’t believe in work-life balance Narayana Murthy stands firm on 70-hour workweek
“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
Shocking viral video of a person broke his neck during a massage at a salon watch video
PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीराचे संतुलन बिघडते. हा घटक केवळ तुमच्या दीर्घायुष्याचा अंदाज लावू शकत नाही, तर तुमच्या शरीराच्या आरोग्याबद्दलसुद्धा माहिती देऊ शकतो. एखादी व्यक्ती जर एका पायावर दहा सेकंदांपेक्षा जास्त वेळ स्थिर उभी राहू शकते तर ती दीर्घ आयुष्य जगू शकते,” असे डॉक्टर मुरली कृष्णा म्हणाल्या आहेत.

हेही वाचा… Masaba Gupta: मसाबा गुप्ता तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी ‘अशा प्रकारे’ खाते पोळी; पण हे खरंच फायदेशीर ठरते का? आहारतज्ज्ञ म्हणतात की…

एका पायावर उभे राहण्यासाठी मेंदूचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे. मेंदू अनेक अवयवांना कार्य करण्यासाठी परवानगी देतो; जसे की तुमच्या स्नायूंचा अभिप्राय समजून घेणे, कानात द्रवाद्वारे पाठवलेले सिग्नल, तुमच्या डोळ्यांची हालचाल इत्यादी. एका पायावर तुमचा तोल राखण्यासाठी डोळ्यातून पाठवलेले सिग्नल महत्त्वपूर्ण असतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही हा व्यायाम करताना डोळे बंद करता, तेव्हा हा व्यायाम करणे आणखीन कठीण जाते, असे डॉक्टर मुरली कृष्णा म्हणाल्या आहेत.

एका पायावर संतुलन राखण्यासाठी मेंदू व शरीराच्या कार्यांमध्ये पुढील गोष्टी असणे महत्वाचे आहे…

सेरेबेलम – मेंदूच्या मागील भागाला सेरेबेलम असे म्हणतात. हे मोटर कंट्रोल आणि संवेदनशील सिग्नलवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार आहे.

मोटर कॉर्टेक्स – मोटर कॉर्टेक्स शरीराला हालचाल करण्यासाठी सिग्नल पाठवते.

बेसल गँगलिया – हालचाली नियंत्रित करते.

वेस्टिब्युलर सिस्टम – वेस्टिब्युलर सिस्टम हा कानाचा आतील भाग मेंदूला गती समजण्यास मदत करतो.

प्रोप्रिओसेप्टिव्ह सिस्टम – मेंदू स्नायूंमध्ये उपस्थित असलेल्या शरीराच्या हालचालींबद्दल माहिती देण्यास मदत करते.

रिफ्लेक्सेस – ताणणे किंवा संतुलन राखणे.

हेही वाचा…Vinesh Phogat : विनेश फोगटनं स्टीम बाथच्या मदतीनं वजन केलं कमी; एक तासात किती किलो वजन होईल कमी; डॉक्टरांकडून जाणून घ्या

वयानुसार शरीराचा समतोल कसा राखता येईल?

डॉक्टर कृष्णा यांनी पुढे सांगितले की, तुम्ही न डगमगता एका पायावर उभे राहण्याचा सराव सुरू ठेवा. कारण तुमच्या प्रत्येक सरावात मेंदूची क्षमता सुधारण्याची एक नवीन संधी असते. मेंदू नवीन मज्जातंतू कनेक्शन तयार करण्यास सक्षम असतो आणि तो वेगवेगळ्या अवयवांमधील समन्वय पुन्हा कॅलिब्रेट करण्यास शिकू शकतो. आपल्या स्नायूंना अधिक सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण दिल्यास संतुलन आणि स्थिरता सुधारू शकते; असे डॉक्टर मुरली कृष्णा म्हणाल्या आहेत.

यासाठी कोणता सराव ठरेल बेस्ट ?

डॉक्टर कृष्णाने सर्फिंग आणि स्केटबोर्डिंगसारख्या खेळ, नृत्य यामध्ये संतुलन आवश्यक असते असे पर्याय सरावासाठी सुचवले आहेत. तसेच तुम्ही स्क्वॅट्स आणि लेग प्रेस यांसारखे व्यायाम किंवा स्टॅबिलिटी बॉलसह सराव करू शकता. तसेच पायांचे संतुलन सुधारण्यासाठी योगासन हा उत्तम पर्याय आहे. तसेच पिलेट्स शरीरात अधिक संतुलन राखण्यास मदत करू शकतात, असे डॉक्टर मुरली कृष्णा म्हणाले आहेत.