Navratri 2023 : नवरात्रोत्सव सध्या सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करतात. काही लोक उपवासाला फळांशिवाय काहीही खात नाहीत; पण काही लोकांना उपवास करताना स्वादिष्ट पदार्थ खाण्याची आवड असते.
उपवासादरम्यान आपण तांदूळ, गहू, कडधान्ये खात नाही. पण, यातून मिळणाऱ्या पोषक घटकांची कमतरता सुका मेवा भरून काढू शकतो. त्यात असलेले प्रोटिन्स, फायबर आणि फॅट्स उत्तम ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यामुळे उपवासादरम्यान तुम्ही सुका मेवा भरपूर खाऊ शकता. नवरात्रीच्या उपवासासाठी सुका मेवा हा खूप चांगला पर्याय आहे.

मधुमेह असणाऱ्या आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी सुका मेवा खावा का?

सुका मेवा हा जास्त काळ टिकणाऱ्या फळांचा प्रकार आहे. त्यात द्राक्षे, सफरचंद, खजूर, अंजीर, मनुका इत्यादींचा समावेश असतो. नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशन सेंटरच्या डॉ. सीमा गुलाटी सांगतात, “सुका मेवा हा जेवणासाठी एक चांगला पर्याय आहे. त्यात असलेल्या साखरेमुळे आपल्या शरीराला प्रोटिन्स मिळतात. बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा सुका मेवा खाणे नेहमी चांगले. शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू नये म्हणून सुका मेवा दूध आणि दह्यामध्ये मिसळून खाऊ शकता.”

Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
coconut prices increased loksatta news
बदलत्या हवामानामुळे नारळ उत्पादन घटले, श्रीफळ (नारळ) महागले
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन

सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स कॅरोटिनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. सूर्यप्रकाशात वाळवलेली द्राक्षे म्हणजेच मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते.

हेही वाचा : Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

मधुमेहींनी सुका मेवा खावा का?

डॉ. गुलाटी सांगतात, “नियमित थोड्या प्रमाणात मूठभर सुक्या मेव्याचे सेवन केल्याने तुम्हाला चार ते पाच तासांसाठी ऊर्जा मिळू शकते. सुक्या मेव्यामध्ये पोटॅशियमसारखे पोषक घटक आहेत. मनुका शरीरात GLP -1 नावाचे हार्मोन्स वाढवतात; जे स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे ठरावीक प्रमाणात मनुका खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.”
गुलाटी पुढे सांगतात, “प्रोटिनयुक्त आणि फॅट्सयुक्त बदाम खावेत. मूठभर बदाम खाल्ल्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळू शकते. मर्यादित प्रमाणात खजूर खाल्यामुळे रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉलची पातळी अनियंत्रित होत नाही आणि वजनसुद्धा वाढत नाही.

बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट वाणी कृष्णा यांनी भोपळा आणि टरबूजबरोबर सुका मेवा एकत्रित खाण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात, “तुम्ही आहारात २५ ग्रॅम सुका मेवा घेऊ शकता. नवरात्रीत उपवासामुळे शरीराला ग्लुटेन मिळत नाही; पण साबुदाणा खिचडीबरोबर तुम्ही सुका मेवा खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.”

हेही वाचा : World Sight Day 2023 : डोळ्यांमध्ये काजळ घालायला आवडते? जाणून घ्या फायदे अन् दुष्परिणाम; नेत्रतज्ज्ञ काय सांगतात….

सुका मेवा नियमितपणे खाऊ शकतो का?

मर्यादित प्रमाणात सुका मेवा खाल्याने रक्तातील साखरेची पातळी किंवा वजन वाढत नाही. सुक्या मेव्याबरोबर चांगली झोप आणि नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. भरपूर पाणी प्या.

Story img Loader