70 Hours Work Week Mental Effect: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा विचार करायला हवा अशी टिप्पणी केल्यानंतर ऑनलाइन वादाला तोंड फुटले आहे. पॉडकास्टमध्ये, मूर्ती म्हणाले की भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे आणि देशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करणे आवश्यक आहे. नारायण मूर्ती यांच्या विधानावरून वाद सुरु असताना सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती हे स्वतः आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात असे म्हणत ट्रोलर्सना उत्तर दिले होते. तर अन्यही काही व्यावसायिकांनी मूर्ती यांच्या विधानाला अनुमोदन दिले आहे.

आठवड्याला ७० तास काम केल्याने शरीरावर काय परिणाम होऊ शकतो शिवाय अशावेळी आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला हवी हे आपण मागील लेखात जाणून घेतले. तर आज आपण आठवड्याला आपण ७० तास काम करणे हे मानसिक आरोग्यावर काय प्रभाव करू शकते हे पाहणार आहोत. आजवर झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, आठवड्याला ५० तास काम केल्यानंतर उत्पादकता लक्षणीयरीत्या कमी होते आणि ५५ तासांनंतर पूर्णपणे थांबू शकते. याशिवाय, प्रत्येक आठवड्यात किमान एक पूर्ण दिवस सुट्टी न घेतल्याने इतर दिवसांच्या कामातील प्रत्येक तासाभराच्या उत्पादकतेमध्ये घट होऊ शकते.

MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Vinod Kambli Reaction , Bhiwandi Hospital,
मी धावायला तयार.. रुग्णालयात उपचारासाठी दाखल विनोद कांबळी यांची पहिली प्रतिक्रिया
Vinod Kambli Admitted To Hospital After Suddenly Health Deteriorated in Thane
Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
akash fundkar loksatta news
मंत्री आकाश फुंडकर म्हणतात, “पालकमंत्रिपदावर दावा नाही, पण पक्षादेश…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!

७० तासांचा कामाचा आठवडा, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दिवशी निदान १० तास किंवा आठवड्यातून सहा दिवस जवळपास १२ तास काम करणे आवश्यक ठरू शकते. अशा रुटीनचा तुमच्या आरोग्यवर काय परिणाम होऊ शकतो याविषयी इंडियन एक्सस्प्रेसने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर (संस्थापक, संचालक, मनस्थळी) यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे.

डॉ. कपूर सांगतात की, काही व्यक्तींना काही विशिष्ट परिस्थितींमुळे किंवा नोकरीच्या गरजेमुळे अधिक तास काम करावे लागू शकते, परंतु हे रुटीन सहसा दीर्घकाळ टिकत नाही, कारण त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तर डॉ हनी सावला, अंतर्गत औषध सल्लागार, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी सांगितले की, अधिक तास काम केल्यामुळे शरीर पूर्णपणे थकून जाते त्यामुळे कामाबद्दल वाटणारा उत्साह कमी होऊ शकतो. सतत कामाबाबत विचार करताना मेंदूवर तणाव वाढू शकतो.

गायत्री मेहरा, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक, यांनी ७० तासांच्या कामाच्या आठवड्यात एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर होणारे परिणाम सांगितले आहेत.

  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो
  • लठ्ठपणामुळे लोक फास्ट फूड आणि जेवणाच्या अनियमित वेळेचा अवलंब करतात
  • समस्या दीर्घकाळ बसून राहणे आणि व्यायामासाठी मर्यादित वेळ दिल्याने स्नायू व सांधे नाजूक होऊ शकतात
  • मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की वाढलेली तणाव पातळी, चिंता आणि नैराश्य
  • थकवा, अलिप्तता आणि कमी आत्मविश्वास/ संतुष्टी
  • निद्रानाश

हे ही वाचा<< शरीर आठवड्याला ७० तास काम करू शकतं का? डॉक्टर सांगतात, मेंदूला सतर्क ठेवण्यासाठी किती व कसं काम करावं?

डॉ अंकिता प्रियदर्शिनी, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ आणि डॉ सम्राट शाह, सल्लागार, भाटिया हॉस्पिटल, मुंबई, यांनी आठवड्यात मर्यादेपेक्षा अधिक काम करणाऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी हे सांगितले आहे. यानुसार, व्यायाम टाळू नका. छंद जोपासा, आणि प्रियजनांसह वेळ घालवून मनाला रिफ्रेश करा. तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांतीसाठी दररोज रात्री किमान ७-८ तास झोप घ्या. दिवसभरात लहान लहान ब्रेक घ्या व नियमित आरोग्य तपासणी आणि तणाव पातळीचे निरीक्षण करा. ही काळजी घेऊनही काही वेळा कार्य उत्पादकतेच्या मर्यादा व्यक्तिपरत्वे बदलू शकतात

Story img Loader