आजकाल बऱ्याच मुलींना त्यांचा बॉयफ्रेंड हा दाढीवाला असावा असे वाटत असते. महिलांमध्येही दाढी-मिश्या असलेल्या पुरुषांबद्दलचे आकर्षण वाढत असल्याचे पाहायला मिळते. तुम्हाला प्रिय असलेली तुमच्या प्रियकराची दाढी ही तुमच्या चेहऱ्यावर अ‍ॅक्ने, पिंपल्स येण्याचे कारण ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना वैद्यकीय संशोधक डॉ. मेहस यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी, “जेव्हा पुरुषांच्या दाढीचा स्पर्श महिलांच्या चेहऱ्याला होतो, त्या वेळी दाढीच्या केसांमुळे महिलांच्या चेहऱ्यावर खूप घर्षण होण्याची शक्यता असते. याने त्यांच्या त्वचेवरील सीबम या तेलाचे उत्पादन वाढू शकते. असे झाल्याने अ‍ॅक्ने, पिंपल्स येऊ शकतात,” असे म्हटले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दीपा कृष्णमूर्ती यांनी डॉ. मेहस यांच्या मताचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, “पुरुषांच्या दाढीच्या संपर्कामुळे महिलांच्या चेहऱ्यावर पुरळ येऊ शकते. दाढीमुळे चेहऱ्यावरील त्वचेवर सूक्ष्म ओरखडे येऊ शकतात. शिवाय सीबमच्या निर्मितीमध्ये वाढ होऊ शकते. याने मुरुम, पुरळ येतात. दाढीमध्ये घाण, कचरा (काही वेळेस जिवाणू) असू शकतात. दाढीच्या स्पर्शाने या गोष्टी त्यांच्या जोडीदाराच्या चेहऱ्यापर्यंत पोहचू शकतात.”

त्या पुढे म्हणाल्या, “पुरुष दाढीवर तेल, बाम अशा ग्रूमिंग उत्पादनांचा वापर करत असतात. या द्रव्यांमुळे महिलांच्या त्वचेवर रासायनिक प्रक्रिया होऊन अ‍ॅलर्जी होऊ शकते. पुरुषांच्या दाढीच्या संपर्कात आल्याने महिलांच्या सीबमचे उत्पादन करणाऱ्या ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात. सीबमचे उत्पादन वाढल्याने त्वचेवरील सूक्ष्म छिद्रे बंद होतात आणि त्यामुळेच अ‍ॅक्ने, पिंपल्सची समस्या उद्भवते.”

आणखी वाचा – Mono Diet म्हणजे काय? हा डाएट प्लॅन फॉलो करणे शरीरासाठी योग्य असते की अयोग्य?

या समस्येवर उपाय काय आहे?

डॉ. दीपा कृष्णमूर्ती यांनी या समस्येवरील उपायदेखील सांगितला आहे. त्या म्हणाल्या, क्लेंजरने दाढी स्वच्छ केल्याने हा त्रास नाहीसा होऊ शकतो. याशिवाय ट्रीमिंग आणि शेपिंग करणेही फायदेशीर ठरू शकते. पुरुषांनी त्यांच्या दाढीची निगा राखल्याने महिलांच्या चेहऱ्यावर अ‍ॅक्ने, पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

Story img Loader