उन्हाळ्यात बहुतेक लोक इतर पेयांपेक्षा सोडा पिणे पसंत करतात. सोड्याची लोकप्रियता पाहता, बरेच लोक आहारासोबतदेखील सोडा पितात. कारण त्यात साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. परंतु, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सोडा आपल्या आरोग्यासाठी हानिकारकदेखील आहे. त्यात अनेक प्रकारची रसायने आढळतात, जी शरीरासाठी हानिकारक असू शकतात. दररोज सोडा प्यायल्यामुळे केवळ वजनच वाढत नाही, तर त्याचा परिणाम हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील होतो. रोज सोडा प्यायल्याने शरीरातील हाडे कमकुवत होण्याप्रमाणेच अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही रोज सोडा पित असाल, तर ही बातमी वाचाच…

वरिष्ठ सल्लागार डॉ. ऋचा चतुर्वेदी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

anger
जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा शरीरावर कसा परिणाम होतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
According to chess player arjun Erigesi success comes from not thinking about results
दडपण झुगारणे महत्त्वाचे! निकालांबाबत विचार न केल्याने यश; बुद्धिबळपटू एरिगेसीचे मत
Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
Best time for Job Hunting
Best time for Job Hunting : कोणत्या महिन्यांमध्ये नोकरी शोधावी? जाणून घ्या, नोकरी शोधण्याची सर्वोत्तम वेळ
What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत

दाह वाढवण्यास कारणीभूत

सोड्यामुळे शरीरात केवळ जळजळच होत नाही, तर त्याचा रोगप्रतिकारशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. त्याव्यतिरिक्त जीवघेणा आजार होण्याचा धोकाही वाढतो. या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक दररोज सोडा पितात त्यांच्या शरीरात युरिक आम्ल जास्त प्रमाणात वाढलेले असते; जे शरीराचा दाह वाढवते.

हाडे कमकुवत होण्यास चालना

जे लोक जास्त सोडा पितात, त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. कारण सोड्यात आढळणारे फॉस्फरिक अॅसिड शरीरातून कॅल्शियम हळूहळू काढून टाकते.

मुतखडा ही एक अशी सामान्य समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते. या स्टोनचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. शिवाय स्टोन हा एक असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त असू शकतो. झिरो शुगर सोडा प्यायल्यानं याचाही धोका वाढतो. सोडा प्यायल्यानं भूक लागण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे वजन वाढते.

हृदयरोगाचा धोका

रोज सोडा प्यायल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे रोज सोडा पिणे टाळावे.

हेही वाचा >> Low back pain: पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही? चिंता करु नका! डॉक्टरांनी सांगितले सोपे उपाय

सोड्याऐवजी फळांचा रस प्या

सकाळी रिकाम्या पोटी रस पिणे टाळावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने पोटातील ॲसिडिटीची समस्या वाढू शकते, त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच रस प्यावा. दुपारी रस पिणे फायदेशीर आहे.