तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटते का? विश्रांती घेऊनही तुम्हाला आराम मिळत नाही असे वाटते का? जर तुम्हाला ही लक्षणे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ जाणवत असतील तर तुम्हाला तीव्र थकव्याचा आजार म्हणजेच Chronic Fatigue Syndrome (CFS) झाला आहे. या आजाराला मायल्जिक न्सेफॅलोमायलिटिस [Myalgic Encephalomyelitis (ME)] असेही म्हणतात. ही एक क्लिष्ट आणि अशक्त करणारी स्थिती आहे, ज्यामध्ये तीव्र आणि सातत्याने थकवा जाणवतो. यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, काही संशोधनामध्ये याचा संबंध खनिजांच्या कमतरतेशी अर्थात झिंकच्या कमतरतेबरोबर जोडला आहे.

“खनिजांची कमतरतेमुळे शरीराच्या अनेक कार्यांवर परिणाम होतो आणि यामुळे तीव्र थकव्यासारख्या आजाराचा धोका वाढतो. यामुळे खनिजांची भूमिका समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे. ‘रोगप्रतिकारकशक्ती, चयापचय प्रक्रिया आणि डीएनए संश्लेषण( DNA synthesis) सारख्या विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एक आवश्यक खनिज म्हणजे झिंक. झिंकच्या कमतरतेमुळे थकव्यासह अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात”, असे नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या इंटरनल मेडिसिन विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
liquor ban Nandurbar loksatta
नंदुरबार जिल्ह्यातील गावात दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर बाटली झाली आडवी

हेही वाचा – झटपट वजन कमी करण्यासाठी आणि ह्रदयाच्या आरोग्यासाठी स्नॅक्स म्हणून खा बदाम! संशोधनात सांगितले कारण; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

आपल्या आरोग्यामध्ये झिंकची भूमिका

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे : झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती, अँटीबॉडीज आणि साइटोकिन्सचे उत्पादन निंयत्रित करते. त्याच्या कमतरेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकूवत होऊ शकते आणि व्यक्तीला संक्रमणास अधिक संवेदनाक्षम बनविते. CFS रूग्ण वारंवार होणाऱ्या संसर्गाची तक्रार करतात.

पेशींमध्ये ऊर्जा निर्मिती : कर्बोदके, फॅट्स आणि प्रथिनांच्या चयापचय प्रक्रियेत म्हणजेच पचनामध्ये झिंक महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले एन्झाईमसाठी सह-घटक म्हणून काम करते. जेव्हा तुम्हाला CFS आजार असतो तेव्हा ऊर्जा निर्माण करण्याची ही प्रक्रिया विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे थकवा निर्माण होतो.

ऑक्सिडेटिव्ह तणाव : झिंक हे महत्त्वाचे अँटीऑक्सिडेंट आहे, जे तुमच्या पेशींना ऑक्सेटिव्ह नुकसान पोहचवण्यापासून रोखते. झिंकच्या कमतरतेमुळे CFS रूग्णांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू शकतो.

झिंक सेवन कसे करावे?

वय, लिंग आणि आयुष्याचा कोणता टप्पा सुरू आहे यावर झिंकच्या दैंनदिन सेवनाबाबत शिफारस केली जाते. सर्व सामान्यत: प्रौढ पुरुषांना दररोज सुमारे ११ मिलीग्राम झिंक वापरण्याचा सल्ला दिला जातो, तर प्रौढ स्त्रियांना अंदाजे ८ मिलीग्राम झिंक आवश्यक असते. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना अधिक झिंकची आवश्यकता असू शकते.

झिंकसाठी मांसहार, मासे, चिकन, अंडी आणि शेंगा अशा पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पण, CFS रूग्णांना अन्नातून झिंकचे सेवन करण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे झिंकची कमतरता निर्माण होऊ शकते.

हेही वाचा – स्मृतीभ्रंश झालेल्या रुगांची काळजी घेणाऱ्यांनी कशी घ्यावी स्वत:ची काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स

स्वत:च झिंक सप्लिमेंट घेणे ठरू शकते धोकादायक

झिंक हे अत्यावश्यक खनिज असले तरी जास्त प्रमाणात झिंकचे सेवन करणे शरीरासाठी विषारी ठरू शकते, ज्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. योग्य मार्गदर्शनाशिवाय झिंक सप्लिमेंटस स्वत:चं घेणं हे जास्त नुकसान करू शकते, विशेषत: CFS रूग्णांसाठी.

कसे ठरू शकते विषारी : झिंक सप्लिमेंट्स केमिस्ट किंवा मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवाय सहज उपलब्ध होतात आणि काही व्यक्तींना झिंकच्या कमतरतेची लक्षणे कमी करण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करण्याचा मोह होऊ शकतो. पण, जास्त प्रमाणात झिंकचे सेवन केल्याने मळमळ, उलट्या, अतिसार आणि रोगप्रतिकारक शक्ती बिघडणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. बराच काळ जास्त प्रमाणात झिंक सप्लिमेंट घेतल्यामुळे शरीरातील तांबे (copper) कमीदेखील होऊ शकते, ज्यामुळे आणखी गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

प्रत्येक व्यक्तीसाठी झिंकची आवश्यकता वेगवेगळी असते: झिंकची आवश्यकता प्रत्येक व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळी असू शकते. आनुवंशिकता, आहाराच्या सवयी आणि आरोग्य स्थिती यांसारखे घटक एखाद्या व्यक्तीला किती झिंकची गरज आहे यावर प्रभाव टाकू शकतात. स्वत: झिंकचे सप्लिमेंट घेणे एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार ठरवले जाऊ शकत नाही आणि CFS च्या मूळ कारणांना नष्ट करण्यात हे मदत करू शकत नाही.

डॉक्टरांकडून याबाबत योग्य मार्गदर्शन घ्या, जे संपूर्ण मूल्यांकन करू शकतात आणि योग्य उपचार योजना देऊ शकतात.

Story img Loader