वॉशिंग्टन : मेणबत्तीच्या मंद प्रकाशात रात्रभोजन करण्याचा आनंद अनेक जण घेतात. मात्र ज्यांना सौम्य दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी मेणबत्तीचा धूर धोकादायक आहे, असे अमेरिकेतील आरहूस विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी अभ्यासाअंती सांगितले. या विभागातील पोस्टडॉक आणि अभ्यासाचे सह-लेखक कॅरिन रोसेनकिल्ड लॉर्सन म्हणाले, ‘‘आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्वयंपाक आणि मेणबत्त्यांच्या धुरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
हेही वाचा >>> आरोग्य वार्ता : कर्करोग टाळण्यासाठी दालचिनी उपयुक्त
सौम्य दमा असणाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच तरुणांची चिडचिड आणि जळजळ यांसारखे प्रतिकूल परिणामही दिसून येतात. मेणबत्तीच्या धुरात अतिसूक्ष्म कण आणि वायू असतात, जे श्वासावाटे शरीरात जातात. हे कण आणि वायू आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात.’’ या संशोधकांनी १८ ते २५ वयोगटातील सौम्य दमा असलेल्या तरुण व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे लॉर्सन यांनी सांगितले.